Wonder Boy| आइन्स्टाइनपेक्षा बुद्धिमान आहे हा १२ वर्षांचा मुलगा, IQ मध्ये भल्या भल्यांना सोडले मागे

Intelligence : आयक्यु म्हणजे इंटेलिजन्स कोशन्ट. बुद्धिमत्ता मोजण्याचे परिणाम. या टेस्टद्वारे माणसाची बुद्धी, विवेक आणि तर्कशक्ती यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत या १२ वर्षांच्या मुलाने महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइनचा स्कोअर मागे टाकला आहे, म्हणजे आयक्यु टेस्टमध्ये या मुलाने आइन्स्टाइनलादेखील मागे टाकले आहे. बार्नाबी स्विनबर्न (Barnaby Swinburn)असे या मुलाचे नाव आहे.

12 year old boy has higher IQ than Einstein
आइन्स्टाइनपेक्षा बुद्धिमान १२ वर्षांचा मुलगा 
थोडं पण कामाचं
  • इंग्लंडमधील बार्नाबी स्विनबर्न याने आयक्यू टेस्टमध्ये आइन्स्टाइनला टाकले मागे
  • १८ वर्षांखालील वयोगटातील सर्वाधिक आयक्यू स्कोअरची केली नोंद
  • बार्नाबीला गणित आणि रसायनशास्त्राची आवड

Intelligent Boy | नवी दिल्ली : आइन्स्टाइन हे नाव बुद्धिमत्तेचे प्रतिक आहे. जेव्हा जेव्हा तर्कशक्ती, बुद्धिमत्ता आणि बुद्धीची चमक (Intelligence and Reasoning) यांचा विषय येतो तेव्हा महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन (Albert Einstein)यांचा उल्लेख येतो. आपण कोणाच्याही बुद्धिमत्तेची तुलना करताना आइन्स्टाइनचे नाव घेत असतो. मात्र जर एखाद्याने बुद्धिमत्तेत आइन्स्टाइनलादेखील मागे टाकले तर त्याच्यासमोर सर्वच नतमस्तक होतील. एका १२ वर्षांच्या ब्रिटिश मुलाने (12 year old boy has higher IQ than Einstein)अशीच जादू केली आहे. या मुलाने सिद्ध केले आहे की त्याच्या बुद्धिमत्तेचा स्तर आइन्स्टाइनपेक्षा वरचा आहे. (This 12 boy is shocked everyone, has more intelligent than Einstein)

आइन्स्टाइनपेक्षा जास्त आयक्यू स्कोअर

तुम्ही अनेकवेळा आयक्यू टेस्टबद्दल ऐकले असेल. आयक्यु म्हणजे इंटेलिजन्स कोशन्ट. बुद्धिमत्ता मोजण्याचे परिणाम. या टेस्टद्वारे माणसाची बुद्धी, विवेक आणि तर्कशक्ती यांची परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत या १२ वर्षांच्या मुलाने महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइनचा स्कोअर मागे टाकला आहे, म्हणजे आयक्यु टेस्टमध्ये या मुलाने आइन्स्टाइनलादेखील मागे टाकले आहे. बार्नाबी स्विनबर्न (Barnaby Swinburn)असे या मुलाचे नाव आहे. आइन्स्टाइनच्या आयक्यू स्कोअरला मागे टाकत हा मुलगा मेन्सा (MENSA)या आयक्यू सोसायटीचा सदस्य बनला आहे.

मुलाच्या बुद्धिमत्तेने व्हाल थक्क

डेली स्टारने दिलेल्या माहितीनुसार युनायटेड किंग्डममधील ब्रिस्टल येथे राहणारा बार्नाबी स्विनबर्न याने आयक्यू टेस्टमध्ये १६२ अंक मिळवले आहेत. आयक्यू टेस्टमध्ये एवढा मोठा स्कोअर मिळवून त्याने सर्वांनाच थक्क केले आहे. फक्त १२ व्या वर्षी त्याच्याकडे ही आश्चर्यकारक बुद्धिमत्ता आहे. असे समजले जाते की अल्बर्ट आइन्स्टाइन यांच्या आयक्यूचा स्तर १६० इतका होता. या मुलाला त्यापेक्षा दोन अंक जास्त मिळाले आहेत. १८ वर्षांखालील वयोगटातील हा सर्वात मोठा स्कोअर आहे. बार्नाबीला गणित आणि रसायनशास्त्राची आवड आहे. त्याला व्यवसायातदेखील रस आहे आणि तो खूपच महत्त्वाकांक्षी आहे. भविष्यात बार्नाबीला कॉम्प्युटर प्रोग्रॅमर बनायचे आहे. 

काय असते आयक्यू लेव्हल

आयक्यू म्हणजे इंटलिजन्स कोशन्ट. आयक्यू स्कोअरवरून तुमच्या विचार करण्याची क्षमता आणि आकलनशक्ती यांचा दर्जा कळतो. आपला मेंदू कसा काम करतो, एखाद्या कामाला किती चांगल्या पद्धतीने करू शकतो, कोणत्याही समस्येवर किती लवकर उत्तर शोधू शकतो, एखाद्या प्रश्नाचे किती चटकन आणि अचूक उत्तर देऊ शकतो, हे आयक्यूमधून निष्पन्न होते. हल्ली अनेक वेबसाइटवर आयक्यू टेस्टची सुविधा उपलब्ध आहे. तुम्ही पाच मिनिटात तुमचा आयक्यू कॅल्क्युलेट करू शकता. अर्थात तज्ज्ञ या प्रकारे वेबसाइटवरील टेस्ट योग्य मानत नाहीत. तज्ज्ञांच्या मते सायकोलॉजिकल टेस्टमधूनच याबद्दलची योग्य माहिती मिळते.

आइन्स्टाइन या जगविख्यात शास्त्रज्ञाने विज्ञानाच्या क्षेत्रात जी उत्तुंग भरारी घेतली आणि जे संशोधन केले, जे शोध लावले, जे सिद्धांत मांडले त्यामुळे विज्ञानाची दिशा आणि आवाकाच बदलून गेला आहे. त्यामुळेच आइन्स्टाइन हे नाव बुद्धिमत्तेला पर्यायी शब्द बनले आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी