Pakistan | 'ही' आहे पाकिस्तानात सर्वाधिक विक्री होणारी कार, भारताच्या तुलनेत किंमत जाणून व्हाल थक्क!

Alto : पाकिस्तानात आपल्या शेजारील देशात कोणती कार (Popular car in Pakistan) सर्वाधिक पसंत केली जाते आणि तेथे कोणती कार सर्वाधिक विकली जाते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिथे लोकप्रिय असणाऱ्या कारची किंमत किती आहे, हे पाहूया. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३७,७२० गाड्यांची विक्री करून २०२१ मध्ये अल्टो (Alto) ही पाकिस्तानमधील सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे.

Popular Car in Pakistan
पाकिस्तानातील लोकप्रिय कार  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भारताकडून पाकिस्तानात अनेक वाहनांची निर्यात
  • भारताची मारुती अल्टो पाकिस्तानात प्रचंड लोकप्रिय
  • किंमत, सुटे भाग आणि रिसेलची किंमत यामुळे आहे डिमांड

Popular Car in Pakistan : नवी दिल्ली : पाकिस्तानबद्दल (Pakistan) एरवीदेखील उत्सुकता असतेच. भारतातील (Indian export to Pakistan) अनेक वस्तूंची पाकिस्तानात निर्यात होते. या वाहनांचाही समावेश आहे. पाकिस्तानात आपल्या शेजारील देशात कोणती कार (Popular car in Pakistan) सर्वाधिक पसंत केली जाते आणि तेथे कोणती कार सर्वाधिक विकली जाते, हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तिथे लोकप्रिय असणाऱ्या कारची किंमत किती आहे, हे पाहूया. २०२०-२१ या आर्थिक वर्षात ३७,७२० गाड्यांची विक्री करून २०२१ मध्ये अल्टो (Alto) ही पाकिस्तानमधील सर्वात जास्त विकली जाणारी कार ठरली आहे. भारताप्रमाणेच अल्टो पाकिस्तानातदेखील लोकप्रिय आहे. कमी किमतीमुळे, स्वस्त भाग आणि चांगले पुनर्विक्री मूल्य यामुळे, ही कार पाकिस्तानमधील ग्राहकांची पसंती आहे. पाकिस्तानमध्ये अल्टोची कोरोना महामारीचे संकट असूनही गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रीत २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (This Indian car is popular in Pakistan, see the price)

पाकिस्तानातील अल्टोची किंमत (Alto price in Pakistan)

पाकिस्तानमध्ये अल्टोची किंमत १२,७४,००० लाख पाकिस्तानी रुपयांपासून(PKR) पासून सुरू होते आणि १७,०४,००० लाख पाकिस्तानी रुपयांपर्यत जाते. पाकिस्तानात विकल्या जाणार्‍या अल्टोची किंमत भारतात विकल्या जाणार्‍या अल्टोच्या किंमतीपेक्षा खूप जास्त आहे. भारतातील अल्टोची किंमत ३,१५,००० रुपयां (एक्स-शोरूम) पासून सुरू होते.

अल्टोची वैशिष्ट्ये

भारतात विकल्या जाणार्‍या अल्टोच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, त्यात अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स वितरण प्रणाली (EBD) आहे. याशिवाय, नवीन अल्टोमध्ये रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स, ड्रायव्हर एअरबॅग, स्पीड अलर्ट सिस्टम आणि सीट बेल्ट रिमाइंडर (ड्रायव्हर आणि सह-प्रवासी) देखील मिळतात. नवीन BSVI इंजिनसह, आता नवीन अल्टोच्या नायट्रोजन ऑक्साईडमध्ये (NOx) २५ टक्क्यांपर्यंत घट होईल.

अल्टोचे इंजिन

मारुती अल्टोमध्ये ०.८ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे ७९६ सीसी इंजिन ४७ हॉर्सपॉवर जनरेट करते. अल्टो सीएनजी व्हर्जनमध्येही उपलब्ध आहे. सीएनजी मोडमध्ये हे इंजिन ४० एचपी पॉवर जनरेट करते. अल्टोमध्ये वापरलेले हे इंजिन अत्यंत विश्वासार्ह मानले जाते.

कारचा मायलेज

मारुती सुझुकीची ही छोटी कार उत्तम मायलेजसाठी ओळखली जाते. अल्टोचा सध्या देशातील टॉप ५ सर्वाधिक मायलेज देणाऱ्या कारमध्ये समावेश आहे. याचे मायलेज २२.०५ kmpl आहे. त्याच वेळी, सीएनजी मोडमध्ये या कारचे मायलेज ३१.५९ किमी प्रति किलो आहे. चांगल्या मायलेजमुळेही ही कार लोकांना आवडते.

भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक करणारी कंपनी मारुती सुझुकी सीएनजी सेगमेंटमध्ये आघाडीवर आहे. मारुती कंपनीने भारतीय बाजारपेठेत अनेक सीएनजी वाहने आणली आहेत, ज्यांची मागणी प्रचंड प्रमाणात आहे. कंपनी अल्टो (Alto), एस-प्रेसो S-Presso, वॅगनार (WagonR) आणि अर्टिगा (Ertiga) च्या सीएजनजी (CNG) आवृत्त्यांची विक्री करत आहे. दरम्यान याच महिन्याच्या शेवटी पर्यंत नव्या सीएनजी मॉडेलचे बाजारात आगमन होणार आहे. यासोबतच कंपनी स्विफ्ट आणि डिजायरच्या (Swift And Dzire) देखील सीएनजी आवृत्तीची चाचपणी करत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी