फक्त 7 वर्षांत 35 मुलांचा बाप झाला हा व्यक्ती, जाणून घ्या कसे

अमेरिकेचा नागरिक असलेला काईल गॉर्डी हा जगातील सर्वात यशस्वी शुक्राणू दाता झाला आहे. तो सर्वात कमी वयाचा शुक्राणू दाताही आहे. फक्त 7 वर्षांत तो तब्बल 35 मुलांचा बाबा झाला आहे आणि त्याचा प्रवास चालूच आहे.

Kyle Gordy
फक्त 7 वर्षांत 35 मुलांचा बाबा झाला हा इसम, जगातील सर्वात यशस्वी शुक्राणू दाता जो घेत नाही पैसे  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • रोज दान करतो एक डझनपेक्षा जास्त शुक्राणू
  • शुक्राणू दान करण्याचे पैसे घेत नाही काईल गॉर्डी
  • फेसबुक पेजद्वारे गॉर्डीपर्यंत पोहोचतात लोक

लोक विवाह (Marriage) करतात, आपले कुटुंब (family) वाढवतात आणि आपला संसार सुखी (happy) करण्याचे स्वप्न (dream) पाहतात. काहींना मुलांची आवड असल्यामुळे त्यांचे कुटुंब मोठे असते तर काही लोक नव्या युगातील (new era) अडचणी (problems) पाहता एक किंवा दोनच मुलांना जन्म देणे योग्य मानतात. मात्र अमेरिकेत (United States of America) राहणाऱ्या 29 वर्षीय काईल गॉर्डी (Kyle Gordy) याला यामुळे काही फरक पडत नाही. गॉर्डी हा गेल्या 7 वर्षांत 35 मुलांचा बाबा झाला आहे आणि यापैकी एकाचीही जबाबदारी त्याच्यावर नाही.

रोज दान करतो एक डझनपेक्षा जास्त शुक्राणू

यामुळे गोंधळून जाऊ नका. काईल गॉर्डी हा अमेरिकेचा नागरिक जगातील सर्वात व्यस्त आणि सर्वात यशस्वी शुक्राणू दाता आहे जो रोज एका डझनापेक्षाही जास्त शुक्राणू दान करतो. दर महिन्याला पाच महिलांना त्याच्यामुळे आई होण्याचा आनंद मिळतो आणि या कामातून काईलला आनंद मिळतो असे तो सांगतो. त्याचे म्हणणे आहे की त्याचा मुख्य पेशा हा अकाऊंटिंगचा आहे, पण त्याला या कामामुळे आनंद मिळतो, कारण त्याला लहान मुले आवडतात. त्याच्या मदतीने जर जोडप्यांना संततीचे सुख मिळत असेल तर त्याला दिलासा मिळतो.

शुक्राणू दान करण्याचे पैसे घेत नाही काईल गॉर्डी

ब्रिटनच्या स्काय न्यूज टीव्हीला मुलाखत देताना गॉर्डीने शुक्राणूदाता (sperm donor) म्हणून आपल्या आयुष्यातील अनेक रहस्ये सांगितली. त्याने सांगितले की तो शुक्राणू दानाचे काहीही शुल्क आकारत नाही. पण त्याच्याकडून शुक्राणू घेणारे लोक त्याच्या प्रवासाचा खर्च उचलतात जे त्याच्यासाठी पुरेसे आहे. तो अनेक देशांमध्येही फिरतो, तिथल्या पदार्थांचा आस्वाद घेतो जे त्याला आनंद देते आणि एका साहसयात्रेसारखे वाटते.

फेसबुक पेजद्वारे गॉर्डीपर्यंत पोहोचतात लोक

गॉर्डी ऑनलाईन शुक्राणू दात्यांना शोधणाऱ्या इच्छुक पालकांना मदत करतात. त्याच्याकडे दोनतीन फेसबुक पेज आहेत ज्यांद्वारे लोक त्याच्यापर्यंत पोहोचतात. कोरोनाच्या काळात त्याचे काम वाढले होते कारण थकव्यामुळे लोकांना या प्रक्रियेत अडचणी येत होत्या, लोकांना एकमेकांना भेटता येत नव्हते, डेटवर जाता येत नव्हते, लग्नेही कमी झाली आणि लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले होते. त्यामुळे गॉर्डी बराच व्यस्त होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी