सिद्धू मूसेवालाची हत्या होणार हे एका आठवड्यापूर्वीच माहिती होती या व्यक्तीला, जाणून घ्या कोण आहे ही व्यक्ती

पंजाबी गायक (Punjabi singer) सिद्धू मूसेवाला (Sidhu moosewalaa ) हत्येप्रकरणी (murder) पोलीस रोज नवनवीन खुलासे करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) गुजरातमधून संतोष जाधवला(Santosh Jadhav) अटक केली आहे. याच दरम्यान सिद्धेश कांबळे उर्फ ​​महाकाळ नावाच्या गुन्हेगाराचा दावा आहे की, मुसेवाला यांचा खून होणार असल्याची माहिती आपल्याला आठवडाभरापूर्वीच मिळाली होती.

Mahakala knew the story of Musewala's murder before
महाकाळला आधी माहिती होती मूसेवालाच्या हत्येची कहाणी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • पुणे पोलिसांनी (ग्रामीण) मुसेवाला यांच्या हत्येनंतर एका आठवड्यानंतर महाकाळला अटक केली
  • मुसेवालाच्या हत्येच्या एक आठवडा आधी म्हणजेच २९ मे रोजी महाकाल हा विक्रम ब्रारच्या संपर्कात
  • बिश्नोई टोळीच्या तीनच कार्यकर्त्यांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचे पत्र पाठवले

नवी दिल्ली : पंजाबी गायक (Punjabi singer) सिद्धू मूसेवाला (Sidhu moosewalaa ) हत्येप्रकरणी (murder) पोलीस रोज नवनवीन खुलासे करत आहेत. पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) गुजरातमधून संतोष जाधवला(Santosh Jadhav) अटक केली आहे. याच दरम्यान सिद्धेश कांबळे उर्फ ​​महाकाळ नावाच्या गुन्हेगाराचा दावा आहे की, मुसेवाला यांचा खून होणार असल्याची माहिती आपल्याला आठवडाभरापूर्वीच मिळाली होती. महाकाळला पुणे पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी त्याने सांगितले होते की लॉरेन्स बिश्नोई गँगने सलमान खानला प्रसिद्धीसाठी धमकावले होते.

पुणे पोलिसांनी (ग्रामीण) मुसेवाला यांच्या हत्येनंतर एका आठवड्यानंतर महाकाळला अटक केली होती. महाकाल हा देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा हस्तक असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान सलमान खानला धमकावल्याप्रकरणी मुंबई क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे.  त्याचवेळी मूसवाला हत्याकांडात दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आणि पंजाब पोलिसांच्या टीमने प्रश्नोत्तरे केली आहेत.महाराष्ट्र पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महाकालचा या हत्याकांडात थेट सहभाग नव्हता, परंतु आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, त्याला मुसेवाला ठार होणार असल्याची माहिती होती. कारण कॅनडातून लॉरेन्स बिश्नोई गँग चालवणारा विक्रम ब्रार त्याच्याशी मूसवालाबद्दल अनेकदा बोलला होता. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, मुसेवालाच्या हत्येच्या एक आठवडा आधी म्हणजेच २९ मे रोजी महाकाल हा विक्रम ब्रारच्या संपर्कात होता. 

या टोळीचे गुंड आपापसात संवाद साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत होते आणि एन्क्रिप्टेड मेसेज अॅप्स वापरत असत आणि एजन्सींना त्यांचे संभाषण पकडता येऊ नये म्हणून कोडवर्डमध्ये बोलायचे, अशीही माहिती मिळाली आहे. पुणे पोलिसांचे पथक लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करण्यासाठी दिल्लीत आहे. संतोष जाधव हा देखील लॉरेन्स बिश्नोई टोळीचा शूटर असून त्याने सिद्धू मुसेवालाच्या हत्येमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली आहे आणि पुण्यातील एका खून प्रकरणातही तो आरोपी आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुजरातमधून त्याला ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी त्याच्याविरुद्ध मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या टोळीत महाराष्ट्रातील अ मधील किती लोक सामील आहेत, याचाही शोध पुणे पोलिसांना बिश्नोईकडून मिळणार आहे. 

Read Also : राज्यातल्या 'या' भागात पुढील 5 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

गुरुवारी सिद्धेश कांबळे उर्फ ​​महाकाळ याने मुंबई पोलिसांच्या चौकशीत सांगितले होते की, बिश्नोई टोळीच्या तीनच कार्यकर्त्यांनी सलमान खान आणि त्याच्या वडिलांना धमकीचे पत्र पाठवले होते. त्यांच्याकडून धमकावून पैसे वसूल करता यावेत यासाठी विक्रम ब्रारचा हा डाव होता. सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील मुख्य पात्र संदीप उर्फ ​​केकरा याला न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यानेच मूसेवालाची रेकी केली होती आणि परदेशात बसलेल्या गोल्डी बरारला याची माहिती दिली होती. चौकशीत योग्य मदत करत नाही. तपासात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याने त्याचा रिमांड देण्यात यावा, असे न्यायालयात पोलिसांनी सांगितले. 

Read Also : सिद्धांत ड्रग्ज प्रकरणात अडकल्यानंतर शक्ती कपूर म्हणाले...

आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, पंजाब पोलिसांच्या चौकशीत केकड्याने सांगितले आहे की, मूसेवालाची रेकी करण्यासाठी 15 हजार रुपयांची डील  झाली होती. रेकी करण्याासठी तो अनेकदा गेला होता.  एवढेच नाही तर गोल्डी ब्रारशी 13 वेळा केकडयाचे फोनवर बोलणे झाल्याचेही तपासात समोर आले आहे. 29 तारखेला, ज्या दिवशी सिद्धू मुसेवाला मारला गेला, त्या दिवशी केकडा हा एकमेव व्यक्ती होता ज्याने गोल्डी ब्रारला माहिती दिली होती. मूसेवाला घरातून बाहेर निघाल्याची आणि त्याच्यासोबत सुरक्षा नाही तसेच त्याच्याकडे बुलेटप्रूफ वाहनही नसल्याची माहिती बरारला केकडाने दिली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी