कसा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागानं वर्तवला अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे.

normal monsoon
कसा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागानं वर्तवला अंदाज  

नवी दिल्लीः देशातील शेतकऱ्यांसह सामान्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला आहे.  त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं.

दिल्लीत आज झालेल्या पत्रकार परिषदेत हवामान विभागाने मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज जाहीर केला.  मान्सून यंदा सरासरी 100 टक्के होईल असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. देशात कोरोना व्हायरसचं संकट आणि लॉकडाऊन असताना मान्सूनचा अंदाज अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे.

भारतात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता 21 टक्के आहे तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता 20 टक्के आहे. मान्सून 1 जूनच्या आसपास केरळच्या तिरुअनंतपूरममधून आगमन करेल, असाही अंदाज IMD ने वर्तवला. मात्र यामध्ये 3 ते 7 दिवस पुढे-मागे होऊ शकतात, असेही संकेत आहेत. 

चेन्नईत 4 जून, पणजीमध्ये 7 जून, हैदराबादमध्ये 8 जून, पुण्यात 10 आणि मुंबईत 11 जूनपर्यंत दाखल होईल अशा अंदाज  आहे. दक्षिण पश्चिम मान्सून जून ते सप्टेंबर या चार महिन्यात बरसतो. केरळमधून मान्सूनला सुरुवात होऊन, पुढे तो देशभर पसरतो. 

हवामान विभागानं बुधवारी मान्सूनचं पूर्व अनुमान जारी केलं आहे. मागच्या वर्षी मान्सून उशिरा आला होता आणि पाऊस कमी पडल्यानं शेतकऱ्यांची पेरणीही लांबली होती. मोठं नुकसान झालं होतं यंदा मात्र मान्सून वेळेत येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आयएमडीच्या या अंदाजाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पेरणी वेळेत होईल याचा दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी