गुजरातमध्ये कोरोनामुळे तीन लाख रुग्णांचा मृत्यू - राहुल गांधी

three lakh people died due to corona in gujarat rahul gandhi केंद्र सरकारने ओमिक्रॉनचे संकट गांभीर्याने घेऊन त्यावर संवेदनशील भूमिका घ्यावी असेही गांधी यांनी नमूद केले आहे.

rahul gandhi
राहुल गांधी 
थोडं पण कामाचं
  • ओमिक्रॉनचे संकट गांभीर्याने घेऊन त्यावर संवेदनशील भूमिका घ्यावी
  • दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांपैकी ६ जण हे कोरोना पॉझिटिव्ह
  • पिंपरी चिंचवडमध्ये 2 नायजेरियन नागरिक कोरोना पॉझिटिव्ह

नवी दिल्ली: गुजरातमध्ये कोरोनामुळे तीन लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे असा दावा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. तसेच ओमिक्रॉन बदल भारताने जागरूक राहून संवेदनशील निर्णय घ्यावे असेही राहुल गांधी म्हणाले. three lakh people died due to corona in gujarat rahul gandhi

कार्यकर्त्यांनी दिली माहिती

गुजरातमध्ये कोरोनामुळे तीन लाख रुग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी ग्राऊंड रीपोर्टिंग करून ही माहिती मिळवली आहे असे गांधी म्हणाले. तसेच केंद्र सरकारने ओमिक्रॉनचे संकट गांभीर्याने घेऊन त्यावर संवेदनशील भूमिका घ्यावी असेही गांधी यांनी नमूद केले आहे.

 

 भारतात ओमिक्रॉनचे सापडले दोन रुग्ण

भारतात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले अहएत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने भारतात कोरोना नियमाण्चे अधिक सक्तीने पालन केले पाहिजे असे म्हटले आहे. तसेच भारतात लसीकरणाचा वेग आणखी वाढवला पाहिजे असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या सहा जण कोरोना बाधित

 दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांपैकी ६ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुण्यात एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 2 नायजेरियन  नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

केंद्राकडून राज्यांना महत्वाचे आदेश 

ओमायक्रॉनच्या दहशतीदरम्यान, केंद्र सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना हे सुनिश्चित करण्यास सांगितले आहे की जोखीम असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटी-पीसीआर चाचणी पहिल्याच दिवशी केली जावी. त्याला आठव्या दिवशी पुन्हा तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मंगळवारी राज्यांनी हलगर्जीपणा करू नये आणि बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवण्याचा सल्ला दिला.
नवीन नियमांनुसार, जोखीम असलेल्या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचण्या अनिवार्य आहे. चाचणीचे निकाल आल्यानंतरच त्यांना विमानतळ सोडण्याची परवानगी दिली जाईल. याशिवाय इतर देशांतून येणाऱ्या प्रवाशांपैकी पाच टक्के प्रवाशांची कोविड-19 साठी तपासणी केली जाईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी