भारतीय हवाई दलात दाखल होणार आणखी ३ राफेल

फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीने तयार केलेली आणखी तीन राफेल लढाऊ विमानं जानेवारी २०२१मध्ये भारतात दाखल होतील.

three more Rafale fighter jets flying for india in next month
भारतीय हवाई दलात दाखल होणार आणखी ३ राफेल 

थोडं पण कामाचं

  • भारतीय हवाई दलात दाखल होणार आणखी ३ राफेल
  • भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या ११ होणार
  • जवानांसाठी नवी कार्बाइन

नवी दिल्ली: फ्रान्सच्या दसॉल्ट कंपनीने तयार केलेली आणखी तीन राफेल लढाऊ विमानं जानेवारी २०२१मध्ये भारतात दाखल होतील. या विमानांच्या पाठोपाठ मार्च महिन्यात आणखी तीन तर एप्रिल महिन्यात आणखी सात राफेल विमानं भारतात दाखल होणार आहेत. भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांच्या खरेदीचा करार केला आहे. या करारांतर्गत टप्प्याटप्प्याने फ्रान्सकडून राफेल विमानांचा पुरवठा सुरू आहे. (three more Rafale fighter jets flying for india in next month)

भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या ११ होणार

भारत-चीन तणाव वाढला असताना पाच राफेल विमानांची पहिली तुकडी २८ जुलै रोजी भारतात पोहोचली. या विमानांना औपचारिकरित्या १० सप्टेंबर २०२० रोजी भारताच्या हवाई दलात दाखल करण्यात आले. याप्रसंगी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली, चीफ ऑफ डीफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल आरकेएस भदुरिया उपस्थित होते. यानंतर ४ नोव्हेंबर रोजी आणखी तीन राफेल विमानांचा ताफा भारतीय हवाई दलात दाखल झाला. राफेल विमानांची तिसरी तुकडी जानेवारी २०२१मध्ये भारतात दाखल होणार आहे. यामुळे भारतात दाखल झालेल्या राफेल विमानांची संख्या ११ होणार आहे. 

लढाऊ विमानांचा मोठा ताफा आणि उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सामर्थ्य

भारतीय हवाई दलात राफेल, सुखोई, एलसीए तेजस, मिराज २०००, मिग या लढाऊ विमानांचा मोठा ताफा आहे. या व्यतिरिक्त हवाई दलात अॅपाचे, चिनूक हेलिकॉप्टर आहेत. मालवाहतूक तसेच सैन्याच्या तुकड्यांची वाहतूक करण्यासाठी हवाई दलाकडे सी १३० आणि सी १७ ग्लोबमास्टर ही विमानं आहेत. एएलएच रुद्र, एमआय ३५ ही हेलिकॉप्टर तसेच आयएल ७६ गजराज हे मालवाहक विमान आहे. आक्रमक लढाऊ विमानांचा मोठा ताफा तसेच उच्च क्षमतेची रडार हे भारतीय हवाई दलाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे.

हॅमर करणार शत्रूवर जोरदार प्रहार

राफेल विमान मीटियोर, स्कल्प आणि हॅमर या शस्त्रसामुग्रीमुळे खूप घातक होणार आहे. हॅमरची मारा करण्याची क्षमता २० ते ७० किमी इतकी आहे. हिमालयातील तसेच अन्यत्र पर्वतांमध्ये असलेले शत्रूचे बंकर, लपण्याची ठिकाणी नष्ट करणे हॅमरमुळे सोपे होणार आहे. भारताने फ्रान्ससोबत हॅमरसाठी करार केला आहे. हॅमरची पुरवठ्याची प्रक्रिया सुरू आहे.

जवानांसाठी नवी कार्बाइन

डीआरडीओने जवानांसाठी नवी कार्बाइन गन विकसित केली आहे. पुण्याच्या लॅब आर्मामेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट या संस्थेने नव्या कार्बाइनची रचना (डिझाइन) केली आहे. ही कार्बाइन जुन्या ९ एमएम कार्बाइनची जागा घेईल. नवी कार्बाइन एका हातात धरुन चालवणे शक्य आहे. हलक्या वजनाच्या या कार्बाइनमधून एका मिनिटात ७०० गोळ्या झाडता येतील. 'शॉर्ट रेंज'साठी (कमी पल्ला) ही कार्बाइन अतिशय प्रभावी आहे. प्रामुख्याने दहशतवादी, नक्षलवादी यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी जवान नवी कार्बाइन वापरतील. नव्या कार्बाइनसाठी पुण्याच्या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यात गोळ्यांची निर्मिती होणार आहे. (DRDO prepares 'carbine gun', will fire 700 rounds in a minute)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी