भारतात ५ नोव्हेंबरला आणखी ३ राफेल येणार

Three more Rafale fighter jets to arrive in India on Nov 5 फ्रान्समधून आणखी तीन राफेल ५ नोव्हेंबर रोजी हरयाणातील अंबाला एअरबेसवर पोहोचणार. यामुळे भारताच्या ताफ्यातील राफेल विमानांची संख्या आठ होणार आहे.

Three more Rafale fighter jets to arrive in India on Nov 5
भारतात ५ नोव्हेंबरला आणखी ३ राफेल येणार 

थोडं पण कामाचं

  • भारतात ५ नोव्हेंबरला आणखी ३ राफेल येणार
  • एप्रिल २०२१ अखेरपर्यंत भारतातील राफेलची संख्या २१ होणार
  • राफेलच्या मदतीने पाकिस्तान आणि चीन जवळच्या हवाई सीमेचे रक्षण करणार भारत

नवी दिल्ली: फ्रान्समधून (France) आणखी तीन राफेल (Dassault Rafale or Rafale) विमानांचा ताफा ५ नोव्हेंबर रोजी हरयाणातील अंबाला एअरबेस (Ambala Air Force Station or Air base) येथे पोहोचणार आहे. याआधी २९ जुलै रोजी भारतात (India) पाच राफेल (Rafale Fighter Jets) दाखल झाली. आणखी तीन विमानांमुळे भारताच्या ताफ्यातील राफेल विमानांची संख्या वाढून आठ होणार आहे. (Three more Rafale fighter jets to arrive in India on Nov 5) 

भारताने फ्रान्सच्या दसॉल्ट (Dassault Aviation) कंपनीकडून ३६ राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी ५९ हजार कोटी रुपयांचा करार केला आहे. कोरोना संकटामुळे राफेल पुरवठ्याच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. मात्र भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सने राफेल विमानांचा पुरवठा शक्य तितक्या लवकर करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानुसार पाच राफेल भारतात कार्यरत झाली आहेत. आणखी ३ राफेल विमानांचा ताफा ५ नोव्हेंबर रोजी येत आहे. यामुळे भारतातील सक्रीय राफेलची संख्या आठ होणार आहे. 

फ्रान्समधून भारताला जुलै २०२० ते एप्रिल २०२१ अखेरपर्यंत २१ राफेल मिळणार आहेत. यामुळे भारतातील सक्रीय राफेल विमानांची संख्या २१ होणार आहे. आतापर्यंत पाच राफेल मिळाली असून ५ नोव्हेंबरला आणखी ३ मिळतील. यानंतर जानेवारी २०२१ मध्ये आणखी तीन तर मार्च २०२१ मध्ये आणखी तीन विमानांचा ताफा भारतात पोहोचेल. तसेच एप्रिल २०२१ मध्ये सात राफेल विमानांचा ताफा भारतात पोहोचणार आहे. राफेल विमानांमुळे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे.

पहिल्या टप्प्यात २९ जुलै रोजी भारतात दाखल झालेल्या पाच राफेल लढाऊ विमानांपैकी तीन एक-सीटर आणि दोन विमाने दोन सीटर होती. हरियाणातील अंबाला विमानतळावर १० सप्टेंबर रोजी झालेल्या विशेष सोहळ्यात भारतात आलेल्या पाच राफेल विमानांना औपचारिकरित्या हवाई दलात दाखल करुन घेण्यात आले. राफेल विमानांचा ताफा हवाई दलाच्या सतराव्या स्क्वाड्रनमध्ये दाखल झाला. ही स्क्वाड्रन गोल्डन अॅरो अर्थात सोनेरी किरणे (Golden Arrows squadron or No. 17 Squadron IAF) या नावाने ओळखली जाते. गोल्डन अॅरो स्क्वाड्रनने १९९९च्या कारगिल युद्धात चमकदार कामगिरी केली होती. या स्क्वाड्रनमधील मिग विमानांचा ताफा निवृत्त करण्याचा निर्णय घेऊन हवाई दलाने काही काळ गोल्डन अॅरो स्क्वाड्रनचा कारभार स्थगित केला होता. राफेल विमानांना दाखल करुन घेऊन गोल्डन अॅरो स्क्वाड्रन पुन्हा कार्यरत करण्यात आली.

भारत गोल्डन अॅरो या स्क्वाड्रनमध्ये अठरा राफेल लढाऊ विमानांचा ताफा सज्ज ठेवणार आहे. या व्यतिरिक्त इतर तीन राफेल विमानांचा ताफा चीनमुळे निर्माण झालेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी भारताच्या पूर्वेकडील हवाई सीमेचे रक्षण करणार आहे. हा ताफा उत्तर बंगालमधील अलीपुरद्वारमधील हाशिमारा एअरबेस (Hasimara Air Force Station or Air base) येथे ठेवला जाईल.

भारत-चीन तणाव वाढत असल्यामुळे लडाखमध्ये भारताच्या भूभागाची हवाई टेहळणी करण्याचे काम सुखोई आणि राफेल या लढाऊ विमानांच्या मदतीने सुरू आहे. ही टेहळणी सुरू झाल्यापासून चीनमध्ये अस्वस्थता आहे. भारत आणि चीन यांच्यात वारंवार चर्चा सुरू आहे. पण या चर्चेतून मार्ग निघालेला नाही. भारताने चीनला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्वीसारखी स्थिती निर्माण करण्यासाठी चिनी सैन्य मागे घेण्यास सांगितले. जोपर्यंत चिनी सैन्य मागे हटून पूर्वी सारखी परिस्थिती करणार नाही तोपर्यंत तणाव कमी होण्याची शक्यता नसल्याचे भारताने स्पष्ट केले. भारताच्या हद्दीत सुरू असलेली विकासकामं किंवा भारतीय हद्दीतल्या सैन्याच्या हालचाली याबाबत चिनी आक्षेप मान्य नसल्याचेही भारताकडून वारंवार सांगितले जात आहे.

भारताच्या अंतर्गत मुद्यावर चीनने भाष्य करणे टाळले नाही तर भारताला चीनमधील अंतर्गत मुद्यांवर जाहीरपणे बोलावे लागेल, असे संकेत केंद्र सरकारने चीनच्या जिनपिंग सरकारला दिले आहेत. भारताकडून चीनला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात आहे. भारतीय हवाई दलातील राफेलची संख्या ८ झाल्यावर देशाच्या सामर्थ्यात वाढ होणार आहे. भारत रशियातून मिळणार असलेल्या एस ४०० क्षेपणास्त्रांचा पुरवठा लवकर व्हावा यासाठी प्रयत्न करत आहे. रशियाने लवकरच एस-४०० क्षेपणास्त्रांची पहिली तुकडी भारताला पुरवणार असल्याचे आश्वासन दिले आहे. एस ४०० क्षेपणास्त्रांमुळे भारताचे हवाई संरक्षण आणखी भक्कम होणार आहे. लढाऊ विमानांचा ताफा आणि एस ४०० क्षेपणास्त्र यांच्या मदतीने संपूर्ण देशाचे हवाई संरक्षण भक्कम करण्याची केंद्र सरकारची योजना आहे. एकाच वेळेला चीन आणि पाकिस्तान या दोन देशांशी लढण्यासाठी भारतीय सैन्याची तिन्ही दले सज्ज होत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी