लँगली: Canada Langley Shooting Three People Dead: कॅनडा (Canada) गोळीबाराच्या (shooting) घटनांनी हादरलं आहे. कॅनडातील पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हँकुव्हरच्या उपनगरात सामूहिक गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया येथील लँगली येथे सोमवारी पहाटे गोळीबार झाला. या गोळीबारात एका संशयितासह तीन जणांचा मृत्यू झाला.
रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी ही माहिती दिली आहे. रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील लँगली या व्यस्त भागात गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी पोलिसांच्या हवाल्यानं सांगितले की, गोळीबारात दोघांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी आहेत. नंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात संशयित मारला गेला आहे. त्याचीही ओळख पटली आहे.
अधिक वाचा- Maharashtra Voter ID: राज्य निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करणार
पोलिसांकडून अलर्ट जारी
सोमवारी, पोलिसांनी सकाळी 6.30 वाजता परिसरात सतर्कतेचा इशारा दिला. लोकांना संबंधित भागात जाणं टाळावं असाही सल्ला दिला. शहरातील वर्दळीच्या भागात जाणाऱ्या रस्त्याचा मोठा भाग पोलिसांकडून बंद करण्यात आला आहे. लँगली व्हँकुव्हरच्या आग्नेयेस 48 किलोमीटर अंतरावर आहे.
पोलिसांनी आपत्कालीन अलर्ट जारी केला होता ज्यामध्ये असे सांगण्यात आले होते की लँगले शहरात अनेक ठिकाणी गोळीबार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक लोकांनी सतर्क राहून त्या भागात जाणं टाळावं.
पोलिसांचं म्हणणं आहे की, या भागातील बेघर लोकांना लक्ष्य करण्यात आलं आहे. पोलिसांनी त्यांच्या सुरुवातीच्या निवेदनात सांगितलं की एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती मात्र नंतर सांगितले की संशयिताला गोळी मारून ठार करण्यात आलं आहे. गोळीबारामागचे कारण अद्याप समजू शकलं नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. गोळीबारात ठार झालेले लोकं आणि हल्लेखोर यांचा काही संबंध होता की नाही हे देखील अद्याप समजू शकलेलं नाही.
अधिक वाचा- पुणेकरांना झटका; रिक्षा प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, जाणून घ्या नवे दर
पोलीस अधिकारी रेबेका पार्सलॉ यांनी सांगितलं की, त्यांना अद्याप जीवितहानीबद्दल अचूक माहिती मिळालेली नाही. पोलिसांनी सोमवारी सकाळी 6.30 वाजता परिसरात सतर्कतेचा इशारा दिला, लोकांना संबंधित भागात जाण्याचे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. शहरातील वर्दळीच्या भागात जाणाऱ्या रस्त्याचा मोठा भाग पोलिसांनी बंद केला.