Mass suicide: तीन सख्ख्या बहिणींनी घेतला गळफास, मध्यरात्री असं काय घडलं? 

three sisters found hanging from tree: एकाच परिवारातील तीन मुलींचे एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

Representative Image
प्रातिनिधिक फोटो 
थोडं पण कामाचं
  • मध्यरात्री असं काय घडलं की तीन सख्ख्या बहिणींनी घेतला गळफास
  • आदिवासी समाजातील तिन्ही बहिणींचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला 
  • प्राथमिक तपासात सामूहिक आत्महत्या असल्याचा पोलिसांचा अंदाज

Mass suicide of three girls: एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या बहिणींचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आले आहेत. मध्यप्रदेशातील खंडवा जनपद येथे ही धक्कादायक घटना समोर आली आहे. तिन्ही बहिणींचे मृतदेह दोरीने झाडावर लटकलेल्या अवस्थेत होते. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (three tribal sisters found hanging to tree at khandwa madhya pradesh suspect of mass suicide)

पोलीस अधिक्षक विवेक सिंह यांनी म्हटलं की, ही घटना जावर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या भामगढ येथील कोटापेट फाल्या येथे घडली आहे. मंगळवारी रात्रीच्या सुमारासची ही घटना आहे. बुधवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार समोर आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि तिन्ही बहिणींचे मृतदेह झाडावरुन खाली उतरवले. पोलिसांना घटनास्थळावर कुठलीही सुसाईड नोट आढळून आलेली नाहीये.

अधिक वाचा : मेसेज वडिलांच्या मोबाइलवर 'सर तन से जुदा' मेसेज आला अन् तिकडे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याचा रेल्वे ट्रॅकवर मृतदेह आढळला

तिन्ही बहिणींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, मृतक मुलींचे कुटुंबीय या घटनेबाबत काहीही प्रतिक्रिया देत नाहीयेत. घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. सोनू, सावित्री आणि ललिता अशी मृतक मुलींची नावे आहेत. या तिन्ही बहिणींचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही सामूहिक आत्महत्या असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या मुलींच्या वडिलांचे निधन झाले आहे. कुटुंबातील ८ जणांमध्ये ५ बहिणी आणि ३ भाऊ आहेत. 

अधिक वाचा : गर्लफ्रेंडला इंप्रेस करण्याच्या नादात अंगावर घेतले 5 गुन्हे, पोलिसी खाक्याने दाखवले खरे जग

पोलीस अधिक्षक विवेक सिंह यांनी सांगितले की, घटनेनंतर मोठी बहीण चंपक हिला मोठा धक्का बसला आहे. तिने घटनेच्या काही वेळापूर्वी तिन्ही बहिणींसोबत फोनवर चर्चा केली होती. फोनवर त्या मला गावात बोलवत होत्या. मी म्हटलं की, अमावस्येला गावई येईल. त्यावर सोनू म्हणाली, तिचं हॉस्टेल सुरू झाल्यावर ती खंडवाला जाईल आणि त्यामुळे आजच ये.

चंपकने पोलिसांना सांगितले की, विश्वास बसत नाहीये की, तिन्ही बहिणी अशाप्रकारे आम्हाला सोडून निघून जातील. पोलीस अधिक्षकांनी सांगितले की, मृतक सोनू (२३) ही खंडवा येथील कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. तर सावित्री (२१) हिचा तीन महिन्यांपूर्वीच विवाह झाला होता आणि काही दिवसांपूर्वीच ती माहेरी आली होती. १९ वर्षीय ललिताने शिक्षण सोडलं होतं आणि कामावर जात असे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. कुटुंबीयांची सुद्धा चौकशी केली जात आहे. प्राथमिक तपासानुसार, ही सामूहिक आत्महत्या असल्याचं दिसत आहे. मात्र, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर अधिक माहिती समोर येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी