Tihar jail: जेलमध्ये चक्क कैद्याच्या पोटातून सापडला मोबाइल

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 25, 2019 | 17:17 IST | टाइम्स नाऊ हिंदी

tihar jail: सध्याचे अधिकारी संदीप गोयल यांच्यापुढे कैद्यांच्या हातातून मोबाईल कसे बाजूला करता येतील, याचे आव्हान आहे. सगळे उपाय करून झाल्यानंतरही कैद्यांकडून मोबाईल जप्त होण्याचा प्रकार काही संपलेला नाही.

Tihar Jail
तिहारमध्ये कैद्यांच्या हातात मोबाईल?  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • तिहार कारागृहात कैद्यांकडे सोपडतो मोबाईल
  • कारागृह क्रमांक चारमध्ये विपश्यना केंद्रात सापडला मोबाईल
  • मोबाईल रोखण्याचे कारागृह प्रशासनापुढे आव्हान

नवी दिल्ली: देशातीलच नव्हे तर, आशिया खंडातील सर्वांत मोठे कारागृह असलेले तिहारचे कारगृह वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असते. या तिहार कारागृहात अनेक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न तेथे नियुक्त अधिकाऱ्यांनी केला आहे. कोणी त्या कारागृहाला जगातील सर्वेोत्तम शाळा करण्याचा प्रयत्न केला तर, कोणी कारागृहाला आश्रमाचं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. तिहार कारागृहीचा धुरा हातात असताना किरण बेदी यांनी कैद्यांच्या मानसिक आरोग्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले होते. सध्याचे अधिकारी संदीप गोयल यांच्यापुढे कैद्यांच्या हातातून मोबाईल कसे बाजूला करता येतील, याचे आव्हान आहे. समजावून सांगून, कठोर भाषेत तसेच दंडुक्याच्या भाषेतही मोबाईल वापरावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न गोयल यांनी केला आहे. पण, कैद्यांकडून मोबाईल जप्त होण्याचा प्रकार काही संपलेला नाही. कधी त्यांच्या साहित्यातून, कधी शौचालयातून, तर कधी कपड्यांमधून मोबाईल जप्त करण्याचे अनेक प्रकार तिहारमध्ये घडले आहेत. सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे, एका कैद्याच्या पोटातून मोबाईल जप्त केल्याची घटनादेखील तिहारमध्ये घडली आहे.

जप्तीची कारवाई सुरूच

कैद्याच्या पोटातून मोबाईल जप्त करण्याचा किस्सा तिहारमध्ये घडला असल्याचं सांगितलं जातंय. पण, याहून आश्चर्याची बाब अशी की, कैद्याच्या पोटातून मोबाईल जप्त केला जाण्याची ही पहिली घटना नाही. काही दिवसांपूर्वी दिल्लीतीलच एका दुसऱ्या कारागृहात कैद्याच्या पोटात मोबाईल सापडला होता तो जप्त करण्यात आला. कारागृहातील अधिकाऱ्यांनी एक मोबाईल जप्त केल्याची माहिती दिली होती. पण, त्या व्यक्तीच्या पोटात चार मोबाईल होते, अशीही चर्चा होती. त्याला अर्थातच अधिकृत दुजोरा मिळाल नाही. दरम्यान, संदीप गोयल यांनी तिहारमध्ये कोणत्याही प्रकारची अराजकता नाही, सगळीकडे शांतता आहे, अशी माहिती दिली आहे. पण, तिहारच्या चार नंबरच्या कारागृहात कैद्याच्या पोटात मोबाईल सापडल्याची चर्चा आहे. ही चर्चा दिल्लीतील इतर कारागृहांपर्यंत पोहोचली आहे. तिहारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात १६ ऑगस्ट रोजी एका आधुनिक मोबाईल जप्त करण्यात आला. दुपारी एक ते तीन यावेळेत कारागृहातील सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ड्युटींमध्ये बदल होत असतात. त्यावेळी हा मोबाईल जप्त करण्यात आला आहे. अतिशय नाजूक आणि हलका असलेला मोबाईल कारागृहातील विपश्यना वॉर्डमध्ये जप्त करण्यात आला. मुळात या कारागृह चारमध्ये काही निवडक आणि हायप्रोफाईल खटल्यांमधील कैद्यांची व्यवस्था आहे. गोयल यांच्या कारागृहातील छापा पथकानेच हा मोबाईल जप्त केला आहे.

तिहारमध्ये मोबाईल पोहचवणे शक्य?

जप्त करण्यात आलेला मोबाईल कोणाचा आहे. याची चौकशी करण्यात आली. मात्र, कोणीही त्यावर अधिकार सांगितला नाही. त्यामुळे विपश्यना केंद्रापर्यंत हा मोबाईल पोहोचला कसा असा प्रश्न उपस्थित होत आहे. पण, या घटनेनंतर हे स्पष्ट झाले की, कितीही चोख बंदोबस्त असला तरी, तिहारमध्ये मोबाईल घेऊन जाणे शक्य आहे. तिहारमधील सूत्रांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. कारागृह प्रशासन या मोबाईल प्रकाराला कारागृहातून समूळ नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. आधीच्या तुलनेत मोबाईल जप्त होण्याची संख्या घटली असली तरी, अजूनही ते जप्त होत आहेत. विशेष म्हणजे, या जप्तीमुळे सुरक्षा रक्षकांच्या हातावर तुरी देऊन, आत आणण्यात आलेले महागडे मोबाईल जप्त झाल्याने कैद्यांच्या मोबाईलवरून अपराध करण्याच्या इराद्यांवर पाणी पसरले जात आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...