Tik Tok वर ५ लाख फॉलोवर्स असलेल्या सेलिब्रिटीची गोळी झाडून हत्या

लोकल ते ग्लोबल
Updated May 22, 2019 | 10:38 IST | टाइम्स नाऊ मराठी

दिल्लीच्या नजफगढमधील एका जिम ट्रेनर तरुणाची काही हल्लेखोरांनी सात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा मृत तरुण टिक-टॉक अॅपवर सेलिब्रिटी होता.

MohitTikTok_instagram
Tik Tok वर ५ लाख फॉलोवर्स असलेल्या सेलिब्रिटीची हत्या  |  फोटो सौजन्य: Instagram

नवी दिल्ली: दिल्लीच्या नजफगढमध्ये एका Tik-Tok सेलिब्रिटीची काल (मंगळवार) संध्याकाळी गोळी मारून हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेल्या या तरुणाचं नाव मोहीत असल्याचं समजतं आहे. मोहित हा एक जिम ट्रेनर होता. हल्लेखोरांनी मोहितवर तब्बल सात गोळ्या झाडल्या. ज्यामध्ये मोहितचा जागीच मृत्यू झाला. बहादूरगढ येथे राहणारा मोहित हा नजफगढमधीलच एका जिममध्ये ट्रेनर म्हणून काम करीत होता. काल तो आपल्या मित्रासोबत त्याच्या काही कागदपत्रांचे फोटोकॉपी आणण्यासाठी एका दुकानात गेला होता. याचवेळी तीन बाईकस्वार युवकांनी दुकानात आलेल्या मोहितवर थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये मोहिताचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी तिथून तात्काळ पळ काढला. 

दरम्यान, या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ हा सीसीसटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या घटनेची पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर  त्यांनी मोहितचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. तसंच याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ तपास देखील सुरू केला आहे. प्राथमिक तपासानुसार पोलिसांच्या मते, ही हत्या वैयक्तिक वादातून झाली असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पोलीस मोहितच्या फोनचे कॉल रेकॉर्ड देखील तपासत आहेत. 

मोहित हा सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह होता. तसंच तो टिक-टॉक या अॅपवरील एक सेलिब्रिटी होता. कारण त्याचे तब्बल ५ लाखाहून अधिक फॉलोवर्स आहेत. याशिवाय इंस्टाग्रामवर देखील मोहितचे ३ हजाराहून अधिक फॉलोवर्स आहेत. त्यामुळेच मोहित सारख्या तरुणावर का आणि कोणी गोळीबार केला असावा याचा सध्या पोलीस कसून तपास करत आहेत. मात्र, आतापर्यंत पोलिसांच्या हाती एकही आरोपी लागलेला नाही. त्यामुळे सर्वात आधी या हल्लेखोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. 

दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच दिल्लीच्या दरियागंज परिसरात मित्रांसोबत टिक-टॉक व्हिडिओ शूट करताना एका मुलाकडून अचानक गोळीबार झाला होता. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता. 

तर दोनच दिवसांपूर्वी दिल्लीतील द्वारका रोड मेट्रो स्टेशन जवळ एका पांढऱ्या रंगाच्या कारमधील तरूणावर गोळीबार केला होता. भररस्त्यातील गोळीबाराचा हा प्रकार कॅमेऱ्यात कैदही झाला होता. तर त्याआधी दिल्लीतील रोहिणी या उच्चभ्रू परिसरात देखील एका तरुणावर तब्बल १७ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. पण त्यापैंकी फक्त चार गोळ्या तरुणाला लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यामुळे गेल्या काही दिवसात राजधानी दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
Tik Tok वर ५ लाख फॉलोवर्स असलेल्या सेलिब्रिटीची गोळी झाडून हत्या Description: दिल्लीच्या नजफगढमधील एका जिम ट्रेनर तरुणाची काही हल्लेखोरांनी सात गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा मृत तरुण टिक-टॉक अॅपवर सेलिब्रिटी होता.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola
Recommended Articles