SD TIMES NOW Navbharat : HD पाठोपाठ 'Times Now नवभारत' न्यूज चॅनल SD रुपात लाँच

Times network hindi news channel TIMES NOW Navbharat launched in SD : लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल 'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) एचडी (High Definition - HD) पाठोपाठ एसडी (Standard Definition - SD) स्वरुपातही लाँच झाला आहे. यामुळे 'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) या न्यूज चॅनलच्या प्रेक्षक वर्गात वाढ होणार आहे.

Times network hindi news channel TIMES NOW Navbharat launched in SD
HD पाठोपाठ 'Times Now नवभारत' न्यूज चॅनल SD रुपात लाँच 
थोडं पण कामाचं
  • HD पाठोपाठ 'Times Now नवभारत' न्यूज चॅनल SD रुपात लाँच
  • 'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) हा न्यूज चॅनल ऑगस्ट २०२१ मध्ये एचडी स्वरुपात लाँच
  • SD रुपातील 'Times Now नवभारत'चे प्रक्षेपण १ जानेवारी २०२२ पासून सुरू

Times network hindi news channel TIMES NOW Navbharat launched in SD : नवी दिल्ली : लोकप्रिय हिंदी न्यूज चॅनल 'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) एचडी (High Definition - HD) पाठोपाठ एसडी (Standard Definition - SD) स्वरुपातही लाँच झाला आहे. यामुळे 'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) या न्यूज चॅनलच्या प्रेक्षक वर्गात वाढ होणार आहे.

'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) हा न्यूज चॅनल ऑगस्ट २०२१ मध्ये एचडी स्वरुपात लाँच झाला. 'अब बदलेगा भारत, बनेगा नवभारत' हे घोषवाक्य घेऊन लाँच झालेल्या या न्यूज चॅनलने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली. आता एसडी स्वरुपातील चॅनलमुळे लोकप्रियतेत आणखी वाढ होईल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 'Times Now नवभारत' (TIMES NOW Navbharat) हा न्यूज चॅनल १० नोव्हेंबर २०२१ रोजी एसडी स्वरुपात लाँच केला. यानंतर आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करुन चॅनलचे देशभरातील प्रक्षेपण शनिवार १ जानेवारी २०२२ पासून सुरू करण्याचा निर्णय झाला. नियोजनानुसार १ जानेवारीपासून 'Times Now नवभारत' एसडी स्वरुपात प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाली आहे. आता देशभरातील प्रेक्षकांकडे 'Times Now नवभारत' हा न्यूज चॅनल एचडी किंवा एसडी स्वरुपात निवडण्याचा पर्याय खुला झाला आहे. 

'टाइम्स नेटवर्क'च्या ग्रुप एडिटर आणि 'टाइम्स नाउ नवभारत'च्या एडिटर इन चीफ नाविका कुमार यांनी एचडी पाठोपाठ एसडी स्वरुपात चॅनल लाँच झाल्यानंतर संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. नागरिकांबाबतची आपली जबाबदारी यापुढेही 'टाइम्स नाउ नवभारत' व्यवस्थित पार पाडेल; असे नाविका कुमार यांनी सांगितले. 'टाइम्स नाउ नवभारत'चा उद्देश फक्त बातम्या दाखवणे एवढाच नाही तर जनजागृती करणे, समाजातील सर्व वर्गांशी मनमोकळा संवाद साधणे हा आहे; असेही नाविका कुमार यांनी सांगितले. 

'या' ठिकाणी SD स्वरुपात दिसेल 'Times Now नवभारत' 

  1. Airtel - चॅनल क्रमांक 323
  2. TataSky - चॅनल क्रमांक 529
  3. DishTV - चॅनल क्रमांक 666
  4. d2h - चॅनल क्रमांक 749
  5. SITI - चॅनल क्रमांक 299
  6. SUN Direct - चॅनल क्रमांक 584

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी