आवाज नाही, जनतेशी संबंधित विषयांवर बोलणार 'टाइम्स नाऊ नवभारत'; 'टाइम्स नेटवर्क'ची हिंदी वृत्तवाहिनी लॉन्च

'आज बदलणार भारत, बनणार नवभारत'... ही टॅगलाइन घेऊन भारताच्या आकांक्षा आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आला आहे 'टाइम्स नेटवर्क'चा हिंदी न्यूज चॅनल 'टाइम्स नाउ नवभारत'.

Times Now Navbharat Show Details
आवाज नाही, जनतेशी संबंधित विषयांवर बोलणार 'टाइम्स नाऊ नवभारत'; 'टाइम्स नेटवर्क'ची हिंदी वृत्तवाहिनी  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • आवाज नाही, जनतेशी संबंधित विषयांवर बोलणार 'टाइम्स नाऊ नवभारत'; 'टाइम्स नेटवर्क'ची हिंदी वृत्तवाहिनी
  • आज बदलणार भारत, बनणार नवभारत
  • चॅनलवर बातम्यांसह दररोज दिवसभरातील मोठी बातमी, महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण आणि निवडक प्राइम शो

नवी दिल्ली: 'आज बदलणार भारत, बनणार नवभारत'... ही टॅगलाइन घेऊन भारताच्या आकांक्षा आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आला आहे 'टाइम्स नेटवर्क'चा हिंदी न्यूज चॅनल 'टाइम्स नाउ नवभारत'. आज सकाळी ही वृत्तवाहिनी लॉन्च करण्यात आला आहे. वृत्तवाहिन्यांच्या भाऊगर्दीत गोंधळ आणि आरडाओरडा, मोठा आवाज यापासून दूर असेल हा चॅनल. फक्त जनतेशी संबंधित विषयांची पत्रकारिता करेल आणि जनतेचा आवाज होईल. आपल्या पत्रकारितेने 'टाइम्स नाउ नवभारत' लोकांसमोर सत्य मांडेल आणि नव्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगले वातावरण निर्माण करेल. बातम्यांमधून मनोरंजन करणार नाही तर सत्य आणि असत्य सांगून प्रश्नांच्या मुळापर्यंत जाईल. वापरुन जुने झालेले न्यूज फॉरमॅट वापरण्याऐवजी नव्या पद्धतीने प्रभावी, वेगवान, अचूक बातमीदारी करणे हीच असेल 'टाइम्स नाउ नवभारत'ची ओळख. 'टाइम्स नेटवर्क'चा इंग्रजी न्यू चॅनल TIMES NOW च्या ग्रुप एडिटर नाविका कुमार 'टाइम्स नाउ नवभारत'च्या एडिटर इन चीफ म्हणून नेतृत्व करतील. या चॅनलवर बातम्यांसह दररोज दिवसभरातील मोठी बातमी, महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण आणि निवडक प्राइम शो असतील. या प्राइम शो ची थोडक्यात ओळख....

Times Now Navbharat कुठे बघाल टाइम्स नाउ नवभारत?

1. 5 PM - अँकर - सुशांत सिन्हा

शो - राष्ट्रवाद

टॅग लाइन - देश से बढकर कुछ नहीं

शो ची शैली - डिबेट/चर्चा

'राष्ट्रवाद' एक डिबेट (चर्चा) शो आहे. यात देशातील ज्वलंत मुद्द्यांवर चर्चा आणि वादविवाद होतील. या शो चा मुख्य उद्देश तत्कालीन महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा घडवून सर्वसमावेशक तोडगा सर्वांसमोर आणणे. देशाला पुढे घेऊन जाणारे मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे. या डिबेट (चर्चा) शो मध्ये आरडाओरडा, मोठा आवाज, गोंधळ नसेल पण तोडगा काढण्याचा प्रयत्न असेल.

2. 6 PM - अँकर - अंकित त्यागी

शो - लोग तंत्र

टॅग लाइन - क्योंकि आप मायने रखते हैं

शो ची शैली - न्यूज

न्यूज स्वरुपातील हा शो देशातील नागरिकांसाठी आहे. या शो मध्ये देशातील नागरिकांशी संबंधित विषयांवर ग्राउंड रिपोर्टिंग असेल. या शो मध्ये रिपोर्टर विषयांच्या मुळापर्यंत जातील आणि त्या विषयांशी संबंधित लोकांशी चर्चा करतील. नागरिकांशी संबंधित प्रश्नांवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न होईल. बातमीदारीत हल्ली नाट्याला महत्त्व आले आहे. या अशा काळात 'लोग तंत्र' शो 'टाइम्स नाउ नवभारत' जनतेच्या प्रश्नांशी संबंधित आमची मूळ भावना सांगेल. हा शो लोकांशी संवाद साधेल आणि परिवर्तनासाठी असेल.

3. 7 PM - अँकर - पद्मजा जोशी

शो - धाकड़ एक्सक्लूसिव

टॅग लाइन - खबर जो कहीं नहीं

शो ची शैली - न्यूज

'टाइम्स ग्रुप'च्या 'न्यूज ब्रेक्स हिअर फर्स्ट'च्या धर्तीवर 'धाकड़ एक्सक्लूसिव' शो दिवसभरातील महत्त्वाच्या एक्सक्लूसिव बातम्यांवर चर्चा करेल.

4. 8 PM - अँकर - नविका कुमार

शो - सवाल पब्लिक का

टॅग लाइन - सवाल पूछने की बारी अब आपकी है

शो ची शैली - डिबेट (चर्चा)

न्यूज विश्वातील हा पहिला शो आहे ज्यात नागरिक घरबसल्या लाइव्ह डिबेट (चर्चा) शो मधील पाहुण्यांना, तज्ज्ञांना थेट प्रश्न विचारू शकतील. 'सवाल पब्लिक का' हा डिबेट (चर्चा) शो च एक नवा प्रयोग आहे. आतापर्यंतच्या डिबेट (चर्चा) शो ची व्याख्या हा शो बदलून टाकेल.

5. 9 PM - अँकर - सुशांत सिन्हा

शो - न्यूज़ की पाठशाला

टॅग लाइन - यहां सबकी क्लास लगेगी

शो ची शैली - न्यूज अॅनॅलिसिस

'न्यूज़ की पाठशाला' या शो मध्ये बातम्यांचे लोकांना सहज समजेल अशा सोप्या आणि आकर्षक पद्धतीने विश्लेषण केले जाईल. बातमी सादर करण्याच्या जुन्या परंपरागत पद्धती टाळून अभिनव प्रयोग केले जातील. या शो साठी निश्चित असे स्क्रिप्ट नसेल. पण प्रत्येकवेळी हा शो लोकाभिमुख असेल. या शो मध्ये गुंतागुंतीचे मुद्दे लोकांना समजतील अशा पद्धतीने मांडले जातील. न्यूज सादर करण्याचा हा एक अभिनव प्रयोग आहे. या पद्धतीने आजपर्यंत जगात कुठेही बातम्यांचे सादरीकरण झालेले नाही.

6. 10 PM - अँकर - मीनाक्षी कंडवाल

शो - ओपिनियन इंडिया का 

टॅग लाइन - न्यूज़ का पब्लिक मीटर

शो ची शैली - न्यूज़

ते दिवस गेले जेव्हा लोकं फक्त न्यूज (बातम्या) बघायचे. 'टाइम्स नाउ नवभारत' लोकांसाठी एक अशी संधी घेऊन येत आहे ज्यात बातमीतला प्रत्येक मुद्दा पाहून लोकं स्वतःची मत मांडू शकतील. त्यांना काय हवे आणि कसे हवे हे सांगण्याची संधी नागरिकांना मिळेल. 'ओपिनियन इंडिया का' या शो मधील 'न्यूज का पब्लिक मीटर' लोकांना ही संधी मिळवून देईल. प्रत्येक बातमीवर नागरिक त्यांची प्रतिक्रिया देऊ शकतील. स्वतःचे रेटिंग देऊ शकतील. यातून देशातील नागरिकांच्या मनात काय सुरू आहे याचा अंदाज येऊ शकेल. हा राष्ट्र भावनेचा वेध घेणारा शो आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी