Times Now Summitमध्ये असादुद्दीन ओवैसनी आणि बाबुल सुप्रियोमध्ये गरमागरम चर्चा, असा केला एकमेकांवर हल्ला 

  Times Now Summit :  टाइम्स नाऊ समिटमध्ये असादुद्दीन ओवैसी यांनी सांगितले की देश बहुसंख्याकवादाच्या दिशेने पुढे जात आहे. सध्याचे सरकार हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी काम करत आहे. याचे अनेक उदाहरण आहेत. 

times now summit 2020 asaduddin owaisi babul supriyo on is majoritarianism on the rise political news in marathi tsum 12
Times Now Summitमध्ये असादुद्दीन ओवैसनी आणि बाबुल सुप्रियोमध्ये गरमागरम चर्चा, असा केला एकमेकांवर हल्ला   |  फोटो सौजन्य: Times Now

नवी दिल्ली :  टाइम्स नाऊस समिट २०२० मध्ये 'काय बहुसंख्याकवाद वाढत आहे का?" या विषयावर AIMIM चे प्रमुख असादुद्दीन ओवैसी आणि केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी खूप इंटरेस्टिंग चर्चा केली. दोघांमध्ये खूप तिखट चर्चा झाली. चर्चेच्या सुरूवातील ओवैसी यांनी सांगितले की, नेहरू यांनी म्हटले होते की बहुसंख्यांकाचा जातीयवाद देशाला नष्ट करेल तर अल्पसंख्याकांची जातीयवाद हा समुदायाला नष्ट करेल. ओवैसी यांनी सांगितले की मेजोरिटेरिएनिझमच्या दिशेने देश पुढे जात आहे. सध्याचे केंद्र सरकार देशला हिंदू राष्ट्र बनविण्याचे काम करीत आहे. 

नागरिकता संशोधन कायदा (CAA)चा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, हा कायदा का आणण्यात आला. तर हा कायदा त्यांच्यासाठी आणला जे आसाममधील एनआरसीतून सुटले आहेत. आसाममधील एनआरसी ही भाजपच्या योजनेनुसार झाली नाही. महाराष्ट्रात पंतप्रधान म्हणतात, काय एक हिंदू दहशतवादी असू शकतो का? एक माजी केंद्रीय मंत्री मॉब लिंचिंगच्या आरोपींचे स्वागत करतो. तुम्ही पाहू शकतात की सुप्रीम कोर्ट यामुळे त्रस्त आहे की दिल्लीत एका आंदोलनात रोड ब्लॉक आहे. पण याने नाही की गेल्या ६ महिन्यांपासून काश्मीर बंद आहे. तुम्ही पाह कसे दिल्लीच्या उपमुख्यमंत्रीला एका उमेदवाराबद्दल सांगावे लागले की तो हिंदू राजपूत आहे. बहुसंख्यक मतांवर लक्ष्य ठेऊन हे बोलण्यात येते. ही एक मोठी लिस्ट आहे. पण मला आजही आशा आहे आणि आम्ही लढणार आहोत. मेजोरिटेरिएनिझम सिद्ध करण्यासाठी अनेक पुरावे आहेत. या सरकारकडून असे करण्यात येत आहे. 

ओवैसींना उत्तर देतना बाबुल सुप्रियो म्हणाले, मला वाटते ओवैसी यांनी एक जन नेता व्हायला पाहिजे, ना की अल्पसंख्याकांचे नेते. त्यांनी सांगितले की प्रत्येक पक्षाचे लोक चुकीचे विधान करू शकतात. पण यासाठी तुम्ही पंतप्रधानांना दोष देऊ शकत नाही. हे भीती पसरविण्याचे काम आहे. मोदीजी जननेता आहे तुम्ही जननेता नाही आहात. असादुद्दीन ओवैसी शिक्षित व्यक्ती आहे आणि त्यांना माहिती आहे की सीएए वास्तवात काय आहे. अडचण ही आहे की AIMIM प्रमुखांनी स्वतःला एक अल्पसंख्याक नेता म्हणून स्वतःला सीमित केले आहे. 

याचे उत्तर देताना ओवैसी यांनी सांगितले की, CAA भेदभावपूर्ण आहे. हे समजण्यासाठी तुम्हांला शेरलॉक होम्सची असण्याची गरज नाही. हा समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन करत आहे. मी पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून येणाऱ्या हिंदूंच्या विरुद्ध नाही. मी केवळ हे म्हणतो आहे की हा कायदा बनवून मूलभूत अधिकारांचे उल्लंघन करू शकत नाही. 

सुप्रियो यांनी सांगितले की सरकार आपले कर्तव्याचे पालन करत आहे. लोकांमध्ये भय निर्माण करण्याची काय गरज आहे. तर ओवैसीने सांगितले की एक भारतीय म्हणून मला अभिव्यक्ती स्वातंत्र्यता आहे. मी सरकारकडून उचलण्यात आलेल्या असंवैधानिक पाऊलांचे मी समर्थन करू शकत नाही. आसामच्या एनआरसीमध्ये जे हिंदू सुटले, त्यांना सरकार त्यांना सीएएच्या मदतीने नागरिकता देऊ शकते. पण मुसलमानांकडे काही पर्याय नाही. बाबुल सुप्रियोने ओवैसींवर आरोप लावला की ते कधीही ममता बॅनर्जींविरूद्ध बोलत नाही. कारण त्या बंगालमध्ये तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत. CAA-NRC आणि NPR बाबत लोकांना भ्रम पसरविणे बंद केले पाहिजे. 

बाबुल सुप्रियो म्हणाले, की त्यांनी बंगालमध्ये जाऊन ममता दीदींविरूद्ध बोलेले पाहिजे.  त्या ठिकाणी अशा मुस्लिमांसाठी बोलले पाहिजे, ज्यांचा फायदा दीदी फायदा उचलत आहेत.. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...