Times Now Summit 2021 | हवामान बदलावर दिया मिर्झाची भूमिका, फॅशनवर व्यक्त केले 'हे' परखड मत

Diya Mirza on Climate Change | टाइम्स नाऊच्या कन्सल्टिंग एडिटर (राजकीय) पद्मजा जोशी यांच्याबरोबर बोलताना दिया मिर्झा यांच्यासह पर्यावरणतज्ज्ञ वंदना शिवा यांनी भारतातील हवामान बदलाच्या संकटासंदर्भात आपली मते मांडली.

Diya Mirza on Climate change
पर्यावरणावर दिया मिर्झाचे मत 
थोडं पण कामाचं
  • प्लास्टिक फ्री देश बनवण्यासाठी आपल्याला स्थानिक वस्तूंना प्रोत्साहन देण्याची गरज
  • पर्यावरणात होत असलेल्या बदलामुळे कॅन्सरसारखे आजार वाढले
  • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याची गरज

Climate Change | मुंबई: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने (Bollywood Actress Diya Mirza) टाइम्स नाऊ समिट २०२१ (Times Now Summit 2021) मध्ये आपले परखड मत व्यक्त केले. टाइम्स नाऊ समिट २०२१ मध्ये पर्यावरणाच्या आणि हवामान बदलाच्या (Climate change) गंभीर मुद्द्यावर दिया मिर्झाने आपले मत स्पष्टपणे मांडले. यावेळी टाइम्स नाऊच्या कन्सल्टिंग एडिटर (राजकीय) पद्मजा जोशी (Times Now, Consulting Editor, Padmaja Joshi) यांच्याबरोबर बोलताना दिया मिर्झा यांच्यासह पर्यावरणतज्ज्ञ वंदना शिवा (Vandana Shiva) यांनी भारतातील हवामान बदलाच्या संकटासंदर्भात आपली मते मांडली. दिया मिर्झा ही हवामान बदलाच्या प्रश्नासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाची गुडविल अॅम्बेसेडरदेखील ( UN Goodwill Ambassador)आहे. (Times Now Summit 2021: Bollywood actress Diya Mirza expressed her views on environment)

दिया मिर्झाचा शालेय जीवनापासून पर्यावरणाकडील ओढा

दिया मिर्झाने सांगितले की 'ती १९८१मध्ये जन्मली. हा तोच काळ होता जेव्हा पहिल्यांदा पर्यावरण आणि हवामान बदल यासंदर्भातील चर्चा पहिल्यांदा सुरू झाली होती. दिया मिर्झा म्हणाली, मी जेव्हा शाळेत जाण्यास सुरूवात केली तेव्हा पृथ्वीशी असलेल्या आपल्या नात्याबद्दल जाणले. तेव्हा मला कळाले की पृथ्वी आणि पर्यावरणाशी आपला काय संबंध आहे. त्यानंतर चित्रपट सृष्टीत काम करताना मी अनेक स्वयंसेवी संस्थांसोबत काम करत राहिले. यामध्ये कॅन्सर पीडित रुग्णांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था देखील होत्या. त्यांच्यासोबत काम करताना मला जाणवले की कॅन्सर लहान मुले, तरुण आणि महिलांमध्ये किती वेगाने पसरतो आहे.'

पर्यावरणाबद्दल दृष्टीकोन कसा तयार झाला

दिया पुढे म्हणाली, 'मी जेव्हा यासर्व बाबींवर अभ्यास केला तेव्हा यामागे पर्यावरणात होत असलेले बदलच कारणीभूत असल्याचे लक्षात आले. प्रदूषित असलेली जमीन, प्रदूषित अन्न, प्रदूषित हवा, हवामान बदल, वायू प्रदूषण इत्यादी बाबी आपल्या आरोग्याशी निगडीत आहेत. तेव्हा मला असे वाटले की दैनंदिन आयुष्यात असा काय बदल केला पाहिजे की त्यामुळे या सर्व बाबी सुरळीत करण्यासाठी मी योगदान देऊ शकेन. मी स्वत:लाच विचारले की आपल्या पर्यावरणाला कसे वाचवायचे? अशा प्रकारे माझा प्रवास सुरू झाला.'

फास्ट फॅशनवर दिया मिर्झाचे रोखठोक मत

दिया मिर्झाने पर्यावरणावर बोलताना आपल्या दैनंदिन वापरातील वस्तूंकडे लक्ष वेधले. ती म्हणाली की फास्ट फॅशन आणि त्याचा प्रभाव यामुळे कसे पृथ्वीच्या पर्यावरणाला हानी पोचते आहे. आयुष्यातील छोट्या छोट्या बाबींबाबत आपण सजग होत निर्णय घेतले पाहिजेत. एक जोडी जीन्स बनवण्यासाठी २,००० लीटर पाण्याचा वापर होतो. यामुळे आपल्याला आपल्या निर्णयांबद्दल जागरुक व्हावे लागेल. दीया मिर्झा कपडे निवडण्यापासून ते भाजीपाला खाण्यापर्यत सर्वच बाबी निवडण्याबद्दल सजग असते.

प्लास्टिक फ्री होण्यासाठीचे काम

संयुक्त राष्ट्रसंघाची सदभावना राजदूत बनल्यानंतर दिया मिर्झाचा पहिला प्रश्न प्लास्टिकच्या वापरासंदर्भातील होता. कारण देशभर प्रत्येक ठिकाणी प्लास्टिकचा वापर होतो आहे. प्रत्येक गोष्ट पॅक करण्यासाठी प्लास्टिकचा वापर होतो. मात्र हे सर्व बंद करायचे तर याचे नियोजन कुठे आहे? दीया मिर्झा म्हणते की आपल्या देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लास्टिक बॅग बंद करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय कौतुकास्पद आहे. जर आपल्याला खरोखरच प्लास्टिक फ्री देश व्हायचे असेल तर आपल्याला स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन द्यायला हवे. आपण मोसमी फळे आणि भाजीपाला खाल्ला पाहिजे. आपण नैसर्गिक अन्नाला प्रोत्साहन दिले पाहिजे.

वंदना शिवांचे मत

या चर्चेत पर्यावरण तज्ज्ञ वंदना शिवा यांनी म्हटले की आपल्याला पुन्हा एकदा नैसर्गिक शेतीकडेच वळावे लागेल. यामुळे आपल्या जमिनीचा पोतच सुधारणार नाही तर आपल्याला रसायन मुक्त अन्नदेखील मिळेल. यामुळे मुलांना चांगले पोषण मिळेल. आज आपल्याला खते वापरून केलेली शेती चांगली वाटते. मात्र त्याच्या गुणवत्तेबाबत आपण प्रश्न विचारले आहे का? त्यामुळेच शेतकऱ्यांना शेतीची पारंपारिक पद्धतीच पुन्हा सुरू करावी लागेल. आपल्याला आपल्या टाकाऊ वस्तूंचे नियोजन करावे लागेल, जेणेकरून पर्यावरणाचे नुकसान होता कामा नये.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी