Mahua Moitra : महागाईच्या चर्चेदरम्यान खासदार महुआ मोईत्रा यांनी लपवली लाखो रुपयांची बॅग; भाजप नेत्यांनी केले ट्रोल, मोईत्रा यांनी दिले उत्तर

संसदेत महागाईवर चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपली दीड लाख रुपयांची बॅग लपवली. याचा व्हिडीओ व्हायरल होऊन भाजपच्या नेत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली. आता मोईत्रा यांनी यांनी ट्विट करून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

mahua moitra
महुआ मोईत्रा  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • संसदेत महागाईवर चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी आपली दीड लाख रुपयांची बॅग लपवली.
  • याचा व्हिडीओ व्हायरल होऊन भाजपच्या नेत्यांनी त्यांना ट्रोल करण्यास सुरूवात केली.
  • आता मोईत्रा यांनी यांनी ट्विट करून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : संसदेत (Parliament) महागाईवर (Inflation) चर्चा सुरू असताना तृणमूल काँग्रेसच्या खासदार (trinamool congress) महुआ मोईत्रा (mahua moitra) यांनी आपली दीड लाख रुपयांची बॅग लपवली. याचा व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होऊन भाजपच्या नेत्यांनी (BJP Leader) त्यांना ट्रोल (Trolling) करण्यास सुरूवात केली. आता मोईत्रा यांनी यांनी ट्विट (tweet) करून ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिले आहे. (tmc mp mahua moitra answers to trollers after hiding expensive bag in parliament during debate on inflation)

Inflation rate: भाजपशासित राज्यांत महागाई कमी अन् इतर राज्यांत जास्त? खासदाराने आकडेवारीच केली जाहीर

भाजप नेते पूनावाला यांनी केले ट्रोल

भाजप नेते शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडीओ ट्विट करून म्हटले होते की महुआ मोईत्रायांनी महागाईवर चर्चा सुरू असताना आपली लाखो रुपयांची बॅग लपवली. यालाच दुटप्पीपणा म्हणतात. त्यांचा तृणमूल पक्ष काँग्रेससोबत सत्तेत होता त्यांनी कर कमी केले आणि महागाई वाढवली होते असेही पूनावाला यांनी म्हटले होते. 

Nancy Pelosi Taiwan visit : चीनच्या धमक्यांना भीक न घालता अमेरिकेच्या Nancy Pelosi तैवान दौऱ्यावर, तैवानमध्ये युद्धाचे ढग​
 

महुआ मोईत्रा यांचे सडेतोड उत्तर

मोईत्रा यांनी पूनावाला आणि भाजपच्या ट्रोलर्संना सडेतोड उत्तर दिले आहे. मोईत्रा यांनी आपल्या आवडत्या बॅगसोबतचे फोटोंचा कोलाज पोस्ट केला आहे आणि म्हटले आहे की २०१९ पासून संसदेत एक झोलेवाला फकीर आहे. झोला लेके आए थे झोला लेके चल पडेंगे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात ‘हम फकीर आदमी है, झोला उठाके चल पडेंगे असे म्हटेल होते. याच वाक्याचा संदर्भ घेऊन त्यांनी विरोधकांना उत्तर दिले आहे. 

Armed Force Vacancy : सशस्त्र दलात ८४ हजार पदं रिक्त, डिसेंबर २०२३ पर्यंत भरणार; केंद्र सरकारची माहिती

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी