TMC Twitter : तृणमूल काँग्रेसचे ट्विटर हँडल हॅक

TMC Twitter account hacked, name changed to Yuga labs : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडल हॅक झाले. या ट्विटर हँडलचे नाव बदलून युगा लॅब्स असे करण्यात आले.

TMC Twitter
तृणमूल काँग्रेसचे ट्विटर हँडल हॅक  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • TMC Twitter : तृणमूल काँग्रेसचे ट्विटर हँडल हॅक
  • ट्विटर हँडलचे नाव बदलून युगा लॅब्स असे करण्यात आले
  • ट्विटर हँडलवरील डिस्प्ले पिक्चर अर्थात डीपी पण बदलण्यात आला

TMC Twitter account hacked, name changed to Yuga labs : ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress : TMC) पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडल हॅक झाले. या ट्विटर हँडलचे नाव बदलून युगा लॅब्स असे करण्यात आले. तसेच अधिकृत ट्विटर हँडलवरील डिस्प्ले पिक्चर अर्थात डीपी पण बदलण्यात आला. 

युगा लॅब्स काय आहे?

अमेरिकेत युगा लॅब्स नावाची एक कंपनी क्रिप्टोकरन्सी आणि डिजिटल मीडिया या क्षेत्रात काम करत आहे. पण तृणमूल काँग्रेसच्या ट्विटर हँडलचे हॅकिंग अमेरिकेतील युगा लॅब्सने केले की अज्ञाताने हॅकिंग केल्यानंतर या नावाचा वापर करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला हे अद्याप समजलेले नाही. तृणमूल काँग्रेसकडून अधिकृतरित्या या प्रकरणात अद्याप काहीही सांगण्यात आलेले नाही.

Holi : गोडधोड खाऊन पोट बिघडले तर करा हे उपाय

या लोकांना पपई खाल्ल्याने होईल नुकसान

हॅकिंगचा इतिहास

भारतात राजकीय पक्षांचे आणि महत्त्वाच्या नेत्यांचे अधिकृत ट्विटर हँडल हॅक होण्याचे प्रकार याआधी पण घडले आहेत. मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात (एप्रिल 2022) उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल काही काळ हॅक झाले होते. तसेच 10 डिसेंबर 2022 रोजी वायएसआर काँग्रेस पक्षाचे अधिकृत ट्विटर हँडल काही काळ हॅक झाले होते.

कच्ची पपई खा आणि अनेक आजारांपासून लांब राहा

जास्त चिकन खाल तर तब्येत बिघडवाल

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी