ICSI CS Result June 2022 : आयसीएसआय (इन्स्टिट्युट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया) सीएस (कंपनी सेक्रेटरीज) जून २०२२ प्रोफेशनल आणि एक्झीक्युटिव्ह परीक्षेचा निकाल आज (गुरुवार २५ ऑगस्ट २०२२) दुपारी ११ वाजता जाहीर होणार आहे. दुपारी २ वाजल्यापासून निकाल ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.
निकाल icsi.edu या वेबसाइटवर उपलब्ध होणार आहे. निकाल ऑनलाइन बघण्यासाठी संबंधित परीक्षार्थीला योग्य परीक्षा निवडून नंतर त्याचा रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर हे दोन्ही नमूद करून सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत परीक्षार्थींना निकालाची अधिकृत छापील प्रत मिळणार आहे.
आयसीएसआय सीएस जून २०२२ प्रोफेशनल परीक्षा उत्तीर्ण होणारे व्यावसायिकदृष्ट्या कंपनी सेक्रेटरीज म्हणून काम करू शकतील. तर आयसीएसआय सीएस जून २०२२ एक्झीक्युटिव्ह परीक्षा उत्तीर्ण होणारे पुढील टप्प्याच्या अभ्यासक्रमासाठी नोंदणी करू शकतील.
आयसीएसआय सीएस जून २०२२ परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षार्थीला प्रत्येक विषयात किमान ४० टक्के आणि सर्व विषयांत मिळून किमान ५० टक्के गुण मिळवावे लागतील.