Citzenship Bill Passed in Rajya Sabha: नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर

लोकल ते ग्लोबल
Updated Dec 11, 2019 | 20:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं.कॉंग्रेस पक्षाकडून दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांतून विरोध केला. या विधेयकाविरोधात आज राज्यसभेतही निर्दशनं करण्यात आली. शिवसेनेच्या खासदारांनी सभात्याग केला.

today will having a discussion about the citizenship amendment bill in rajyasabha,the news in marathi google batmya
नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर  |  फोटो सौजन्य: ANI

मुंबई : Citzenship Bill Passed in Rajya Sabha: नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूनं ११७ मतं पडली तर विधेयकाच्या विरोधात ९२ मत पडली. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी विधेयक आज राज्यसभेत मांडलं. शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रश्नावरून मोदी सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला. ईशान्य भारतातील नागरिकांनी या विधेयकाला जोरदार विरोध दर्शवला. अनेक ठिकाणी सकाळपासून निदर्शनं करण्यात आली. अमित शहा यांच्या नेतृत्त्वाखाली नागरिकत्व सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. लोकसभेत ३११ मतांनी हे विधेयका पारित झालं होतं. राज्यसभेत विधेयक पारित करण्यासाठी केंद्र सरकारला अग्निपरीक्षा द्यावी लागली. 

 नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत लाईव्ह अपडेट्स:

 1. नागरिकत्व सुधारणा विधेयक राज्यसभेत मंजूर
 2. थोड्याच वेळात विधेयकावर अंतिम मतदान होणार
 3. सदस्यांच्या सूचनेवर राज्यसभेत मतदानाला सुरूवात
 4. विरोधकांनी सुचवलेल्या सूचनांवर मतदान सुरू, विधेयकावर सदस्यांच्या 14 सूचना
 5. नागरिकत्व विधेयक मंजुरीाठी भाजपकडे पुरेसं संख्याबळ
 6. विधेयक चिकित्सा समितीकडे जाणार नाही
 7. मतदानादरम्यान राज्यसभेतून शिवसेनेच्या तीन खासदारांचा सभात्याग
 8. नागरिकत्व सुधारणा विधेयकाचा राज्यसभेतला मार्ग सुकर
 9. विधेयक चिकित्सा समितीकडे पाठवण्याविरोधात मतदान
 10. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाच्या आक्षेपांवर राज्यसभेत मतदान
 11. राज्यसभेत विरोधकांच्या मागणीनंतर मतदानाला सुरूवात
 12. मानवतेच्या विचारातून चर्चा व्हायला हवी. त्याचबरोबर जबरदस्ती धर्मांतर केलं जातयं - संजय राऊत
 13. धर्माच्या आधारामुळे, आपल्या भारत देशाचं विभाजन झालं होतं - जेपी नड्डा
 14. अन्याय होणाऱ्या लोकांसाठी, हा सम्मानाने जगण्याचा मार्ग आहे - जेपी नड्डा
 15. कोणत्याही पक्षाचे घोषणापत्र, हे भारतीय संविधानापेक्षा मोठं नाही - आनंद शर्मा
 16. संविधानाच्या परीक्षेत नागरिकत्व सुधारणा विधेयक फोल ठरलं आहे. कारण संविधानात धर्म,जात आणि रंगाच्या आधारावर भेदभाव केलं जातं नाही - आनंद शर्मा
 17. नागरिकत्व मिळेपर्यंत दीर्घावधी व्हिसा आणि कार्यकारी आदेशांच्या आधारावर सुविधा देणार - अमित शहा
 18. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला मी उत्तर देणार आणि नागरिकत्व दुरूस्ती विधेयक मुस्लिमविरोधी नाही - अमित शहा
 19. परदेशातून येणाऱ्या मुस्लिमांना नागरिकत्व का द्यावं - अमित शहा
 20. धर्मामुळे त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना न्याय मिळेल - अमित शहा
 21. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत, कोट्यवधी लोकांना आशा - अमित शहा
 22. शेजारी देशातील अल्पसंख्याक कमी होत आहेत - अमित शहा
 23. अन्याय झालेल्या लोकांना न्याय मिळवून देणार - अमित शहा
 24. पाकिस्तान,बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशातील अल्पसंख्यांक नागरिकांना समानता मिळत नव्हती - अमित शहा
 25. राज्यसभेत विधेयकावर चर्चेला सुरूवात
 26. भाजपा अध्यक्ष अमित शहांनी विधेयक राज्यसभेत मांडलं
 27. विधेयकावरून राज्यसभेत गदारोळ होण्याची शक्यता आहे.
 28. नागरिकत्व सुधारणा विधेयकावर भाजपच्या बाजूनं १२५ सदस्य
 29. प्रकृतीच्या कारणानं राज्यसभेतील ४ खासदारांना सुट्टी मंजूर
 30. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत, कॉंग्रेस विरोधात मतदान करणार
 31. थोड्याच वेळात नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत, राज्यसभेत चर्चेला होणार सुरूवात
 32. नागरिकत्व सुधारणा विधेयकाबाबत आम्ही मानवतेची भूमिका घेऊ, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 33. राज्यसभेत सगळं वेगळं असेल. तसचं सेनेवर कुणीही दबाव टाकु शकत नाही - संजय राऊत
 34. राज्यसभेत सेनेची सत्ताधारी आणि विरोधक दोघांनाही गरज - संजय राऊत
 35. आज राज्यसभेत मोदी सरकारची अग्निपरीक्षा
 36. नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी