Today's Good News: कडुलिंबाने बरा होईल कॅन्सर, माशाप्रमाणे पोहून रचला विक्रम; भारताला मिळणार F-18 लढाऊ विमान 

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 07, 2022 | 11:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

Today's Good News । दिवसभरातील बातम्यांमध्ये तुम्ही काही गुड न्यूज देखील पाहात आहात. म्हणूनच हे बुलेटिन खास तुमच्यासाठी आमच्या टीमने तयार केले आहे. येथे तुम्ही पाहू शकता दिवसभरात कोणत्या चांगल्या घडामोडी घडल्या आहेत.

Today's Good News Neem will cure cancer, India will get F-18 fighter jet
या आहेत आजच्या गुड न्यूज   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • अमेरिकन कंपनी बोईंग F-18 सुपर हॉर्नेटची दोन विमाने भारताच्या नौदलाच्या लढाऊ विमानांमध्ये सामाविष्ट केली जाणार आहेत.
  • कडुलिंब कॅन्सरच्या उपचारासाठी मदत करू शकते.
  • नील शेकटकर नावाच्या मुलाने मुंबईच्या समुद्रात एलिंफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किमीचे अंतर २.४५ तासात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे.

Today's Good News । मुंबई : दिवसभरातील बातम्यांमध्ये तुम्ही काही गुड न्यूज देखील पाहात आहात. म्हणूनच हे बुलेटिन खास तुमच्यासाठी आमच्या टीमने तयार केले आहे. येथे तुम्ही पाहू शकता दिवसभरात कोणत्या चांगल्या घडामोडी घडल्या आहेत. चला तर म जाणून घेऊया काही महत्त्वाच्या बातम्या. (Today's Good News Neem will cure cancer, India will get F-18 fighter jet). 

१२ वर्षाच्या मुलाची कमाल 

यशाच्या वाटेत वयाचा अडथळा येऊ शकत नाही हे आता पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. नील शेकटकर नावाच्या मुलाने मुंबईच्या समुद्रात एलिंफंटा ते गेट वे ऑफ इंडिया हे १४ किमीचे अंतर २.४५ तासात पूर्ण करून विश्वविक्रम केला आहे. लक्षणीय बाब म्हणजे त्याच्या या विक्रमाची नोंद India Book Of World Record मध्ये करण्यात आली आहे. 

अधिक वाचा : एकनाथ खडसे यांना मुंबई पोलिसांचे समन्स

भारताला मिळणार F-18 सुपर हॉर्नेट 

अमेरिकन कंपनी बोईंग F-18 सुपर हॉर्नेटची दोन विमाने भारताच्या नौदलाच्या लढाऊ विमानांमध्ये सामाविष्ट केली जाणार आहेत. हे अमेरिकेचे प्रमुख फायटर प्लेन असल्याचे बोलले जाते, याच विमानाच्या मदतीने अमेरिकेने इराक, सीरिया, लिबिया आणि अफगाणिस्तावर बॉम्बहल्ला केला होता. 

कडुलिंब कॅन्सरशी लढण्यासाठी प्रभावी

बनारस हिंदू विद्यापीठाने (BHU) एका संशोधनावर दावा केला आहे की कडुलिंब कॅन्सरच्या उपचारासाठी मदत करू शकते. कडुलिंबातील बायोएक्टिव हा सक्रिय घटक म्हणून ओळखला गेला आहे जो ट्यूमर नियंत्रित करू शकतो. 

नीतू कपूर सोबत दिसणार रणबीर कपूर 

रणबीर आणि आलियाच्या लग्नाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रणबीर लवकरच आपल्या आईसोबत पडद्यावर दिसणार आहे. मात्र हा कोणताही चित्रपट नसून ही केवळ जाहीरात असेल. नीतू कपूरने स्वत: याबाबतीतची माहिती सोशल मीडियावर दिली आहे. 

हरियाणात VIP कल्चर होणार बंद 

लक्षणीय बाब म्हणजे हरियाणामध्ये वाहनांवरील व्हिआयपी क्रमांक बंद करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की, आतापासून खरेदी करण्यात येणाऱ्या सर्व वाहनांवर सर्व कॉमन नंबर असतील. त्याचबरोबर असे व्हिआयपी क्रमांकही ई-ऑक्शनद्वारे सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होतील. तसेच सर्वप्रथम मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी आपल्या ताफ्यातील चार वाहनांचे क्रमांक सोडण्याची घोषणा केली आहे. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी