टोलनाक्यांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी, पाहा गडकरींनी काय केलं स्पष्ट!

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं की, चांगल्या दर्जाचे रस्ते हवे असतील तर त्यासाठी पैसेही मोजावे लागतील. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा करताना त्यांनी हे उत्तर दिलं.

toll-tax
टोलनाक्यांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी 

थोडं पण कामाचं

  • नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं की, टोल सिस्टम ही पुढेही कायम राहणार
  • 'श्रीमंतांकडून घेऊन गरीबांना द्या' असं गडकरी यावेळी म्हणाले
  • टोल हा कायमस्वरुपी बंद केला जाऊ शकत नसल्याचं प्रतिपादन गडकरींनी केलं.

नवी दिल्ली: केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी टोल टॅक्सबाबत एक अतिशय महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली आहे. गडकरींनी अतिशय स्पष्ट शब्दात म्हटलं आहे की, टोल टॅक्स घेणं हे यापुढेही सुरूच राहणार आहे. कारण यामधून मिळणारा पैसा हा रस्ते बांधणी आणि विकास कामांमध्येच लावला जात आहे. यावेळी गडकरी असं म्हणाले की, 'अमीरों से लो, गरीबों को दो' या विकास मॉडेलवर आमचं सरकार काम करत आहे. त्यामुळे आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की, यापुढेही राज्यासह देशभरात टोलनाके हे सुरुच राहणार. याचा फटका हा मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीयांना देखील बसणार आहे. 

नितीन गडकरींनी एक गोष्ट स्पष्ट केली आहे की, 'टोल सिस्टम ही सुरुच राहणार कारण की, सरकारकडे पुरेसा पैसा नाही. त्यामुळे टोलमधून मिळणारा पैसा हा ग्रामीण आणि डोंगराळ भागात रस्ते बनविण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे ज्या ठिकाणी टोल घेतला जाऊ शकतो तिथे टोल घेतला जावा. कारण टोल कायमचा बंद करता येणार नाही. हा एक गोष्ट आहे की, टोल कमी-जास्त केला जाऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टोलचा जन्मदाता मीच आहे.' गडकरी याबाबत लोकसभेत बोलत होते. 

यावेळी गडकरी असंही म्हणाले की, मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात जवळजवळ ४० हजार किमी लांबीचे रस्ते तयार केले. तसंच जागतिक स्तरावरील हायवे नेटवर्क तयार करण्यासाठी ४ लाख ३१ हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च केला.' यावेळी गडकरी असं म्हणाले की, 'एवढी प्रचंड कामं होत आहेत. पण तरीही आमच्यावर एकही रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप होत नाही. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, आमच्या सरकारने अजिबात भ्रष्टाचार केलेला नाही.' 

'पुढील अडीच ते तीन वर्षात फक्त १२ तासात मुंबईहून दिल्लीला जाणं शक्य होणार आहे. तशा पद्धतीचे रस्ते लवकरच निर्माण केले जातील.' असं आश्वासन देखील यावेळी गडकरींनी दिली. दरम्यान यावेळी त्यांनी भूमी अधिग्रहणाबाबतही वक्तव्य केलं. 'अनेक खासदारांनी काही मुद्दे उपस्थित केले आहेत. त्यांना मी सांगू इच्छितो की, ८० टक्के जमिन अधिग्रहीत केल्याशिवाय आम्ही रस्त्यांची कामं सुरु करू शकत नाही.' यावेळी गडकरींनी अशीही माहिती दिली की, आम्ही सध्या २२ ग्रीन एक्सप्रेस वे तयार करत आहोत. 

'ग्रीन एक्सप्रेस वेमध्ये दिल्ली-मुंबई हा एक्सप्रेस वे देखील आहे. या एक्सप्रेस वे मुळे दोन्ही शहरातील अंतर हे तब्बल १२० किमीने कमी होणार आहे. या ग्रीन हायवेसाठी जवळजवळ 60 टक्के कंत्राटांचं वाटपही झालं आहे. याच ग्रीन एक्सप्रेस वे मुळे पुढील तीन वर्षात मुंबई-दिल्ली हे अतंर फक्त १२ तासात पूर्ण करता येणार आहे.' असं गडकरी म्हणाले. 

'रस्ते बांधणीच्या कामासाठी सर्वोत्तम तंत्रज्ञान वापरलं जाणार आहे. त्यामुळे रस्ते विकासात कुठेही अडथळा येणार नाही.' यावेळी गडकरींनी रस्ते अपघाताबाबतही माहिती दिली. 'दर वर्षी रस्ते अपघातात जवळजवळ दीड लाख लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. यापैकी अर्ध्या लोकांच्या मृत्यूला तर रस्ते, त्यांचा डीपीआर आणि रस्ते इंजिनीअरच जबाबदार आहेत.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
टोलनाक्यांबाबत एक अतिशय महत्त्वाची बातमी, पाहा गडकरींनी काय केलं स्पष्ट! Description: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्पष्ट केलं की, चांगल्या दर्जाचे रस्ते हवे असतील तर त्यासाठी पैसेही मोजावे लागतील. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदान मागण्यांवर चर्चा करताना त्यांनी हे उत्तर दिलं.
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...