Asteroid 2005 RX3 : अरे बापरे! स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा मोठा लघुग्रह उद्या पृथ्वीवर धडकण्याची शक्यता...

Space Science : अवकाशात (Space) मुक्तपणे फिरणारे धुमकेतू आणि लघुग्रह ग्रहांवर किंवा ताऱ्यांवर धडकत असतात. त्यातून मोठे स्फोट होतात. अवकाश म्हणजे अद्भूत गोष्टींचा खजिना आहे. इथे लाखो सुर्यमाला, ग्रह, तारे आणि त्यांच्या जोडीला कोट्यवधी लघुग्रह, धुमकेतू यांचा समावेश आहे. पृथ्वीवर झेपावणारा हा लघुग्रह गुजरातमधील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा आकाराने मोठा आहे. या लघुग्रहाला, Dubbed 2005 RX3 असे नाव देण्यात आले आहे.

Asteroid 2005 RX3
पृथ्वीच्या दिशेने येतोय लघुग्रह 
थोडं पण कामाचं
  • उद्या म्हणजे 18 सप्टेंबरला लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने झेपावणार
  • नासाचे (NASA)शास्त्रज्ञ या लघुग्रहावर (Asteroid)लक्ष ठेवून आहेत.
  • पृथ्वीवर झेपावणारा हा लघुग्रह गुजरातमधील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा आकाराने मोठा आहे

Asteroid headed towards Earth : न्यूयॉर्क : पृथ्वीवासियांना काळजी वाटावी अशी घटना उद्या म्हणजे 18 सप्टेंबरला घडणार आहे. उद्या एक लघुग्रह पृथ्वीच्या (Earth) दिशेने झेपावणार आहे. नासाचे (NASA)शास्त्रज्ञ या लघुग्रहावर (Asteroid)लक्ष ठेवून आहेत. अवकाश म्हणजे अद्भूत गोष्टींचा खजिना आहे. इथे लाखो सुर्यमाला, ग्रह, तारे आणि त्यांच्या जोडीला कोट्यवधी लघुग्रह, धुमकेतू यांचा समावेश आहे. एरवी आपली पृथ्वी अगदी शांतपणे सुर्याभोवती आपली प्रदक्षिणा पूर्ण करत असते. इतर ग्रहदेखील आपापल्या प्रदक्षिणा पूर्ण करत असतात. त्यामुळे कोणालाच कोणापासून धोका नसतो. मात्र अवकाशात (Space) मुक्तपणे फिरणारे धुमकेतू आणि लघुग्रह ग्रहांवर किंवा ताऱ्यांवर धडकत असतात. त्यातून मोठे स्फोट होतात. काहीवेळा यातून ग्रहांची प्रदक्षिणा बदलते किंवा जर स्फोट खूपच प्रचंड असेल तर त्या ग्रहाच्या अस्तित्वावरच बेतू शकते. पृथ्वीवर उद्या धडकण्याची शक्यता असणारा लघुग्रह किती आकाराचा आहे आणि त्याचा परिणाम कसा असेल याबद्दल जाणून घेऊया.( Tomorrow Asteroid 2005 RX3 headed towards earth)

अधिक वाचा : जगातले एकमेक शंभर टक्के शाकाहारी शहर

लघुग्रहाचा आकार आणि वेग

उद्या पृथ्वीवर झेपावणारा हा लघुग्रह गुजरातमधील सर्वात उंच पुतळा असलेल्या सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीपेक्षा आकाराने मोठा आहे. हा लघुग्रह या आठवड्यात पृथ्वीच्या दिशेने निघाला आहे. हा लघुग्रह सुमारे 210 मीटर आकाराचा आहे. शास्त्रज्ञ या लघुग्रहाला, Dubbed 2005 RX3 म्हणत आहेत आणि तो 18 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येईल. हा लघुग्रह ताशी 62,820 किलोमीटर वेगाने पृथ्वीजवळ येत आहे. हा लघुग्रह पृथ्वीच्या  47,42,252 किलोमीटर इतकी जवळ येईल. वैश्विक स्केलवर हे अंतर पाहिल्यास तुलनेने तो पृथ्वीच्या जवळच असणार आहे. 

2005 RX3 18 सप्टेंबर रोजी पृथ्वीवरून जाईल. त्याचबरोबर आणखी चार लघुग्रहदेखील पृथ्वीच्या दिशेनेच मार्गक्रमण करत आहेत. नासा त्यांच्या कक्षीय हालचालींचा मागोवा घेत आहे.

अधिक वाचा : Video : PM मोदींनी लिव्हर फिरवताच चित्ता झाला स्वतंत्र, कुनो राष्ट्रीय उद्यानात फिरू लागला

चार लघुग्रह पृथ्वीच्या दिशेने

या आठवड्यात पृथ्वीच्या दिशेने चार लघुग्रहांची वाटचाल सुरू आहे. शास्त्रज्ञ या लघुग्रहांवर लक्ष ठेवून आहेत. हे चार लघुग्रह पुढीलप्रमाणे आहेत.
2020 PT4: लघुग्रह ताशी 39,024 किलोमीटर वेगाने पृथ्वीच्या 71,89,673 किलोमीटर इतक्या जवळ येईल.
2022 QD1: लघुग्रहाचा आकार सुमारे 130 मीटर आहे आणि 16 सप्टेंबर रोजी तो 34,200 किलोमीटर प्रति तास या वेगाने पृथ्वीवरून धडकेल अशी अपेक्षा आहे.
2022 QB37: लघुग्रह 18 सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या जवळ येईल आणि ग्रहाच्या 65,16,483 किलोमीटर इतक्या जवळ येईल.
2022 QJ50: लघुग्रह या आठवड्याच्या अखेरीस पृथ्वीच्या दिशेने मार्गस्थ होईल आणि ताशी 33,156 किलोमीटर वेगाने पुढे जाईल.

अधिक वाचा : Viral Video : मेट्रोतील मोबाईल चोर मुलगी

लघुग्रह काय असतात

लघुग्रह हे सुमारे 4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्यमालेच्या निर्मितीपासून शिल्लक राहिलेले खडकाळ तुकडे आहेत. नासा जॉइंट प्रोपल्शन लॅबोरेटरी (Nasa Joint Propulsion Laboratory) नुसार जेव्हा एखादा लघुग्रह पृथ्वीपासून सूर्यापर्यंतच्या अंतराच्या 1.3 पट कमी असतो तेव्हा त्याचे वर्गीकरण पृथ्वीच्या जवळची वस्तू म्हणून केले जाते. पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतर सुमारे 9.3 कोटी मैल आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी