दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०९ ऑक्टोबर २०१९: राज ठाकरेंची सभा रद्द ते वॉर सिनेमाची कमाई

Headlines of the 09th October 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर...

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०९ ऑक्टोबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून 
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, ०९ ऑक्टोबर २०१९:    आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी आहे ते म्हणजे राज ठाकरे यांच्या सभेसंदर्भातली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा पुण्यात होणार होती. पण ती पावसामुळे रद्द करावी लागली आहे. पुण्यात सध्या जोरदार पाऊस सुरू झाला आहे. दुसरी बातमी आहे, भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे यांची.  नितेश राणे ट्रोल होत आहेत. या ट्रोल झालेल्या फोटोमध्ये नितेश राणे संघाच्या शाखेत एका सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे बसलेले दिसत आहेत. त्यावर पहिल्यांदा नितेश राणे यांनी भाष्य केले आहे.  तिसरी महत्त्वाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्याची. मोदी सरकारनं केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीचं गिफ्ट दिलं आहे. सरकारनं कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली आहे. चौथी आजची बातमी साताऱ्यातली आहे. साताऱ्यात एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. पाचवी बातमी मनोरंजन क्षेत्रातली आहे. हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉरनं कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड रचला आहे. या सिनेमानं एका झटक्यात सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहिद कपूरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या बातम्या सविस्तर स्वरूपात वाचूया. 

  1. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली सभा पावसामुळे रद्दः आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पहिली प्रचारसभा रद्द करण्यात आली आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे ही सभा रद्द केली आहे. राज यांची ही पहिली प्रचारसभा होणार होती. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  2. संघाच्या शाखेत गेल्यावर झालेल्या ट्रोल फोटोवर नितेश राणे पहिल्यांदा बोलले असं काहीः  सध्या सोशल मीडियावर भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आणि भाजपचे कणकवलीचे उमेदवार नितेश राणे ट्रोल होत आहेत. ट्रोल होण्याचे कारण जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
  3. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढः मोदी सरकारनं सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट दिलं आहे. सरकारनं महागाई भत्ता 5 टक्क्यांनी वाढून 17 टक्के करण्याची घोषणा केली आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  4. 'यासाठी' बापाकडून पोटच्या दोन मुलांची हत्या, गाडीतून मृतदेह नेणाऱ्या आरोपीला 'असं' पकडलंः साताऱ्यात एका व्यक्तीने आपल्या दोन्ही मुलांची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
  5. वॉर सिनेमानं रचला इतिहास, 7 दिवसात कमावले इतके कोटीः  हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफच्या वॉरनं कमाईच्या बाबतीत नवीन रेकॉर्ड रचला आहे. या सिनेमानं एका झटक्यात सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि शाहिद कपूरचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. बातमी सविस्तर स्वरूपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...