दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ नोव्हेंबर २०१९:  उद्धव  ठाकरे मुख्यमंत्री ते अजित पवार भडकले

Headlines of the 28 November 2019: दिवसभरात अनेक घडामोडी घडतात अशावेळी जर आपल्याला महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर टाइम्स नाऊ मराठीच्या दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या पाहा. फक्त एका क्लिकवर... 

Daily news
दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ नोव्हेंबर २०१९  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • दिवसभरातील पाच महत्त्वाच्या बातम्या खास आपल्यासाठी
  • मोठ्या घडामोडींचा आढावा फक्त ५ जबरदस्त बातम्यांमधून
  • देशासह राज्यातील बातम्यांवर एक नजर

मुंबई: दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या, २८ नोव्हेंबर २०१९: आज दिवसभरामध्ये अनेक मोठ्या घडामोडी घडल्या. त्यावर आपण दिवसभरातील ५ जबरदस्त बातम्या या विशेष सदरातून एक नजर टाकूयात... आज  दिवसभरातील सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली बातमी म्हणजे... शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री ठरले आहेत.  उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दुसरी बातमी उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.  या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. तिसरी बातमी, महाराष्ट्रात महाविकासआघाडीची सत्ता अखेर स्थापन झाली आहे. आज पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नव्या आघाडीने आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला आहे. चौथी आजची बातमी, शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस ही महाविकासआघाडी मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. पाचवी बातमी, राज्यात महाविकास आघाडीत परतणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सकाळ पासून मीडियापासून नॉट रिचेबल होते.  पण यावेळी पत्रकारांनी तुम्ही केलेल्या बंडाबाबत काय सांगणार असे म्हटल्यावर अजितदादा पत्रकारांवर भडकले.  सर्व बातम्या सविस्तर वाचूया. 

राज्याच्या मुख्यमंत्रिपदी उद्धव ठाकरे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर राजकीय नेते, सेलिब्रेटी उपस्थित होते. ठाकरे यांच्यासह शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे प्रत्येकी दोनजणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा.  

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच मोदींनी म्हटलं... :  उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शिवतीर्थावर हा शपथविधी सोहळा पार पडला. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया आली आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ही आहेत महाराष्ट्राच्या महाविकासआघाडीची ‘महावचनं’: आज पार पडलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत नव्या आघाडीने आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी, भूमिपुत्रांना नोकऱ्या अशा अनेक बाबींचा समावेश यात करण्यात आला आहे. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

भाजपचे कृत्य लज्जास्पद, सोनियांचा भाजपवर निशाणा : शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस ही महाविकासआघाडी मिळून भाजपचा खोटेपणा उघड करू असे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.  सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

या प्रश्नावर अजित पवार भडकले : महाविकास आघाडीत परतणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सकाळ पासून मीडियापासून नॉट रिचेबल होते. पण अखेर ते मीडियासमोर आले आणि आपण कालही नाराज नव्हतो, आजही नाराज नाही आणि यापुढेही नाराज राहणार नाही. सविस्तर बातमीसाठी या लिंकवर क्लिक करा. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी