Total Solar & Lunar Eclipse in 2022 : वर्षभरात २ खंडग्रास सूर्यग्रहण आणि २ खग्रास चंद्रग्रहण

Total Solar & Lunar Eclipse in 2022 : 2 Solar & 2 Lunar Eclipse in 2022 : ज्योतिष आणि खगोलशास्त्रानुसार यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ या वर्षात २ खंडग्रास सूर्यग्रहण (आंशिक सूर्यग्रहण) आणि २ खग्रास चंद्रग्रहण (पूर्ण चंद्रग्रहण) आहेत. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण भारताच्या ज्या भागांमध्ये दिसेल त्याच भागातील धर्म, अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असलेल्या नागरिकांसाठी सूतककाळ आहे.

Total Solar & Lunar Eclipse in 2022 : 2 Solar & 2 Lunar Eclipse in 2022
वर्षभरात २ खंडग्रास सूर्यग्रहण आणि २ खग्रास चंद्रग्रहण 
थोडं पण कामाचं
  • वर्षभरात २ खंडग्रास सूर्यग्रहण आणि २ खग्रास चंद्रग्रहण
  • भारतातून एक सूर्यग्रहण आणि एक चंद्रग्रहण दिसणार
  • सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण भारताच्या ज्या भागांमध्ये दिसेल त्याच भागांमध्ये सूतककाळ

Total Solar & Lunar Eclipse in 2022 : 2 Solar & 2 Lunar Eclipse in 2022 : नवी दिल्ली : ज्योतिष आणि खगोलशास्त्रानुसार यंदाच्या वर्षी म्हणजेच २०२२ या वर्षात २ खंडग्रास सूर्यग्रहण (आंशिक सूर्यग्रहण) आणि २ खग्रास चंद्रग्रहण (पूर्ण चंद्रग्रहण) आहेत. एप्रिल २०२२ मध्ये होणार असलेले सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. पण ऑक्टोबर २०२२ मध्ये होणार असलेले सूर्यग्रहण भारताच्या अनेक भागांतून दिसेल. तसेच मे २०२२ मध्ये होणार असलेले चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. पण नोव्हेंबर २०२२ मध्ये होणार असलेले चंद्रग्रहण भारताच्या निवडक भागांमधून दिसेल. सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण भारताच्या ज्या भागांमध्ये दिसेल त्याच भागातील धर्म, अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्रावर विश्वास असलेल्या नागरिकांसाठी सूतककाळ आहे. 

२ खंडग्रास सूर्यग्रहण (आंशिक सूर्यग्रहण), भारतातून एकच दिसणार

  1. ३० एप्रिल २०२२, शनिवार : हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही. उत्तर आणि दक्षिण अमेरिका, प्रशांत (पॅसिफिक) आणि अटलांटिक महासागराच्या दक्षिणेकडील भाग येथे हे सूर्यग्रहण दिसेल आणि त्याचा परिणाम जाणवेल. भारतीय वेळेनुसार हे सूर्यग्रहण रात्री १२.१५ वाजता सुरू होईल आणि पहाटे ०४.०७ वाजता संपेल. ग्रहणकाळ सुमारे चार तासांचा असेल.
  2. २५ ऑक्टोबर २०२२, मंगळवार : हे सूर्यग्रहण दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आहे आणि भारताच्या अनेक भागांतून दिसेल. यामुळे भारतीयांसाठी हे ग्रहण महत्त्वाचे आहे. दिवाळीच्या लक्ष्मी पूजनात सूर्यग्रहणाचा व्यत्यय येणार नाही. हे सूर्यग्रहण युरोप, उत्तर आफ्रिका, पश्चिम आशिया, उत्तर अटलांटिक महासागर, उत्तर हिंद महासागर येथे दिसेल. ऑक्टोबर महिन्यात होणार असलेले हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतीय वेळेनुसार दुपारी ०२.२८ वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी ०६.३२ वाजता संपेल. ग्रहणकाळ सुमारे चार तासांचा असेल.

२ खग्रास चंद्रग्रहण (पूर्ण चंद्रग्रहण), भारतातून एकच दिसणार

  1. १६ मे २०२२, सोमवार : हे खग्रास चंद्रग्रहण भारतीय वेळेनुसार सकाळी ७.५७ वाजता सुरू होईल आणि सकाळीच ११.२५ वाजता संपेल. हे चंद्रग्रहण भारतातून दिसणार नाही. सुमारे तीन तासांचे हे चंद्रग्रहण पश्चिम युरोप, पूर्व आणि मध्य आफ्रिका, दक्षिण अमेरिका, अंटार्कटिका, अटलांटिक आणि प्रशांत (पॅसिफिक) महासागर येथे दिसेल. 
  2. ८ नोव्हेंबर २०२२, मंगळवार : हे खग्रास चंद्रग्रहण कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आहे आणि भारताच्या अनेक भागांतून दिसेल. यामुळे भारतीयांसाठी हे ग्रहण महत्त्वाचे आहे. ग्रहणाचा रात्रीच्या दीपदान आणि पूजेच्या विधीत व्यत्यय येणार नाही. ग्रहणाची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी २.३८ वाजता होईल. हे ग्रहण संध्याकाळी ०६.१९ वाजता संपेल. भारताव्यतिरिक्त उत्तर आणि दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया, उत्तर प्रशांत (पॅसिफिक) महासागर, हिंद महासागर येथे हे ग्रहण दिसेल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी