Special Tourist Places | सुट्टी घेऊन फिरायला जावं, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. काहीजण वर्षातून एकदा तर काहीजण दर महिन्याला कुठे ना कुठे सहलीला जाणं पसंत करतात. आपल्या कुटुंबासोबत फिरायला जाणं आणि निसर्गरम्य ठिकाणी वेळ घालवणं सर्वांनाच आवडतं. अशा ठिकाणी आपण कितीही वेळा आणि कितीही दिवसांसाठी जाऊ शकतो. मात्र भारतात अशी काही पर्यटनस्थळं आहेत, जिथं फक्त मित्रमैत्रिणींसोबत जाणंच योग्य ठरतं. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे खरं आहे. भारतातील अशाच काही खास पर्यटनस्थळांविषयी जाणून घेऊया.
कुटुंबासोबत फिरायला जाण्यासाठी गोवा हा उत्तम पर्याय आहे. मात्र गोव्यातील काही बिचेस अशी आहेत जिथं कुटुंबासोबत जाल, तर शरमेनं अर्धमेले व्हाल. या बिचवर सनबाथचा आनंद लुटण्यासाठी अनेक विदेशी तरुण तरुणींची गर्दी असते. केवळ बिकीनी घातलेल्या तरुणी आणि अर्ध्या चड्डीतले तरुण यांचीच गर्दी या बिचवर असते. त्यामुळे इथे कुटुंबासोबत गेल्यावर अनेकांना अवघडून जायला होतं.
अधिक वाचा - विमानातून आला धूर, प्रवाशांची उडाली तारांबळ
गोकर्ण हे ठिकाण तिथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे, असा अनेकांचा समज असतो. ते खरंही आहे. पण मंदिरांइतकंच तिथल्या उत्तम बिचेससाठी गोकर्ण प्रसिद्ध आहे. इथल्या समुद्रकिनारी कुटुंबासोबत फिरताना जरा सावध राहिलेलंच बरं. मुक्त विहार करणारे अनेक कपल्स इथे दिसतात.
या ठिकाणी कोण, कशाला कुटुंबासोबत जाईल, असा प्रश्न तुम्हाला पडले. मात्र तरीही काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कसोलमध्ये कुटुंबासोबत फिरण्यासाठी अनेक चांगले स्पॉट आहेत. मात्र शक्यतो जिथे माणसांची वर्दळ असेल, तिथेच कुटुंबासोबत फिऱण्याचा सल्ला दिला जातो. इस्त्रायली कॅफे आणि रेस्टॉरंटसाठी कसोलची ओळख आहे. तिथं तुम्ही वेगळ्या प्रकारचं टेस्टी फूड ट्राय करू शकता.
अधिक वाचा - शिक्षकांसाठी खुशखबर ! आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 च्या अर्जाची वाढवली अंतिम मुदत
भारताच्या दक्षिणेला असलेला हा केंद्रशासित प्रदेश. स्वातंत्र्यपूर्व काळात फ्रेंच राज्यकर्त्यांचा प्रभाव असणारा हा प्रदेश आहे. आजही तिथे फ्रेंच संस्कृतीचा प्रभाव जाणवतो. वर्षभर इथे परदेशी आणि भारतीय प्रवाशांची गर्दी असते. पुदुच्चेरीतील वातावरण कायमच तारुण्यपूर्ण असतं. केवळ कपल्सची गर्दी आजूबाजूला दिसत असल्यामुळे तुमच्या कुटुंबीयांना इथं अवघडल्यासारखं होऊ शकतं.
शहरी धावपळीपासून दूरवर वसलेलं हिमाचल प्रदेशातील मलाणा हे अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आहे. मात्र ही जागा नशेबाजांसाठी अधिक प्रिय मानली जाते. इथे येणारे पर्यटक त्या धुंदीतच राहणं पसतं करतात. त्यामुळे तुम्ही घरातील ज्येष्ठ नागरिकांना घेऊन इथं येणार असाल, तर पुन्हा एकदा विचार करा.