अमृतसर : पंजाबमधील (Punjab) अमृतसर (Amritsar) येथील ऐतिहासिक जालियनवाला बाग (Jallianwala Bagh) पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. मात्र आता पर्यटकांना (Tourists) जालियनवाला बागच्या विहिरीत नाणी टाकता येणार नाहीत. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने (union Ministry of Culture) जालियनवाला बागेच्या शहीदी विहिरीत (martyr's well) पैसे टाकण्यास बंदी घातली असून बागेच्या ऐतिहासिक विहिरीचा वरचा भाग बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी विहिरीबाहेर सूचना फलकही लावण्यात आला होता. यामध्ये विहिरीत नाणी टाकू नका, असे आवाहनही करण्यात आले, तरीही पर्यटक पैसे फेकून देत होते.
शहीदांच्या सन्मानार्थ पर्यटक येथे पैसे टाकत असत. जालियनवाला बागेतील हुतात्म्यांना आदरांजली वाहताना देश-विदेशातून येणारे पर्यटक विहीर पाहायचे आणि सन्मानार्थ नाणी टाकायचे. 2019 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाच्या शताब्दीच्या संदर्भात, केंद्र सरकारने त्याचे नूतनीकरण केले होते.
Read Also : 100 कोटीला राज्यसभा सीट देणाऱ्या चौघांना अटक
विहिरीत पैसे टाकणे बंद करावे व येथून दर महिन्याला किती पैसे काढले जातात, या पैशाचा हिशेब कोठे आहे आणि हा पैसा कुठे वापरला जातो. याची विचारणा अमृतसरचे वकील आणि आरटीआय कार्यकर्ते अॅडव्होकेट पीसी शर्मा यांनी केली होती. यासाठी त्यांनी भारत सरकार, केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय आणि पीएमओला पत्र लिहिले होते. आरटीआय अंतर्गत विहिरीत टाकलेल्या नाण्यांबाबत माहिती मागविण्यात आली होती. परंतु विहिरीत नाणी टाकल्याचा कोणताही हिशेब सापडला नाही. यामुळे आता मंत्रालयाने नाणी फेकण्यावर बंदी घातली आहे.
Read Also : देसी तूप आणि काळी मिरी खाण्याचे आहेत अतुलनीय फायदे
नूतनीकरणानंतर उद्यान 28 ऑगस्ट 2021 रोजी उघडण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार केलेल्या तपासादरम्यान 28 ऑगस्टपासून बागेतील विहिरीतून साडेआठ लाख रुपये काढून ते जालियनवाला बाग मेमोरियल ट्रस्टच्या खात्यात जमा केल्याचे समोर आले आहे. आता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाला (ASI) विहिर बंद (बुजण्याचे) आदेश देण्यात आले आहे.