Vikram S Kirloskar Passes Away: 'टोयोटा'ला लोकप्रिय करणारे उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन; नेहमी प्रसिद्धी असायचे दूर

विक्रम किर्लोस्कर हे 25 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईतील Toyota Innova HyCross एका कार्यक्रमात शेवटचं उपस्थित होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते.विक्रम किर्लोस्कर यांनी 'एमआयटी'मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती.

Toyota Vice President Kirloskar Passed Away: Vikram S Kirloskar dies Know More
'टोयोटा' इंडियाचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचं निधन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन.
  • विक्रम किर्लोस्कर यांनी 'एमआयटी'मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती.
  • बंगळुरूमधील हेब्बल स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार

Toyota Vice President Kirloskar Passed Away: नवी दिल्ली : वाहन उद्योगातील अग्रणी उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 64 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता, त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम किर्लोस्कर यांनी आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने टोयोटाला भारतात वेगळ्या उंचीवर नेलं होतं. विक्रम किर्लोस्कर यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे. (Vice President of 'Toyota' India Vikram Kirloskar passed away)

अधिक वाचा  :  18 वर्षानंतर खुलणार धारावी झोपडपट्टीवासियांचे नशीब

विक्रम किर्लोस्कर हे 25 नोव्हेंबर 2022 रोजी मुंबईतील Toyota Innova HyCross एका कार्यक्रमात शेवटचे उपस्थित होते. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते.विक्रम किर्लोस्कर यांनी 'एमआयटी'मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती. किर्लोस्कर यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होतं. पण ते पण विक्रम किर्लोस्कर हे नेहमीच प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत होते. प्रसिद्धीच्या झोतापासून दूर राहत शांतपणे ते आपले काम करत असतं. 

टोयोटाचा चेहरा

टोयोटा किर्लोस्कर मोटर लिमिटेडमध्ये टोयोटाची 89 टक्के हिस्सेदारी आहे, तर किर्लोस्कर समूहाकडे केवळ 11 टक्के हिस्सादारी आहे. तरीही विक्रम किर्लोस्कर हे भारतातील टोयोटाचा चेहरा होते. कंपनीने क्वालिस 1999 मध्ये आणि कोरोला 2002 मध्ये लॉन्च केली. कंपनीने 2005 मध्ये इनोव्हा मिनीव्हॅन लाँच केली. 2007 मध्ये टोयोटाने 50,000 युनिट विक्रीचा टप्पा ओलांडला होता.

यानंतर कंपनीने 2009 मध्ये Fortuner SUV फॉर्च्युनर एसयूव्ही लाँच केली. जपानी दिग्गज टोयोटाशी किर्लोस्कर यांचे नाते केवळ ऑटोमोबाईल्सपुरते मर्यादित नव्हते. तर टेक्सटाइल यंत्र सामुग्री, विमा, रिअल इस्टेट आणि हेल्थकेअर मध्ये दोन्ही कंपनी भागीदार होत्या. 2020 मध्ये, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटलने त्यांना मेटलर्जिकल इंडस्ट्रीजमधील उत्कृष्टतेसाठी JRD टाटा पुरस्काराने सन्मानित केले.  गेले  . विक्रम किर्लोस्कर हे भारतीय वाहन उद्योगातील सर्वात स्पष्ट बोलणारे लोकांपैकी एक होते.

विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. 

अधिक वाचा  : नवरा-बाययकोच्या नात्याची कमकवूत नाळ घट्ट करायची आहे?

बंगळुरुमध्ये आज दुपारी अंत्यसंस्कार

टोयोटा इंडियाने ट्वीटद्वारे दिलेली माहितीनुसार, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे 29 नोव्हेंबर 2022 निधन झाले. या घटनेने आम्ही शोकमग्न आहोत. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो, अशी आम्ही प्रार्थना करतो. आमच्या संवेदना त्यांच्या कुटुंबीयांसोबत आहे. विक्रम किर्लोस्कर यांच्या पार्थिवालर आज, 30 नोव्हेंबर 2022 रोजी बंगळुरूमधील हेब्बल स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी