कानपूरमध्ये तलावाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, 27 जणांचा मृत्यू

Tractor trolley overturns near lake in Kanpur, 27 dead : उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या साद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरथा गावात राहणारे भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीने फतेहपूरच्या चंद्रिका देवी मंदिरात गेले होते. परतत असताना साद आणि गंभीरपूर गावादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात ट्रॉली उलटून 27 जणांचा मृत्यू झाला

Tractor trolley overturns near lake in Kanpur, 27 dead
कानपूरमध्ये तलावाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, 27 जणांचा मृत्यू  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
 • कानपूरमध्ये तलावाजवळ ट्रॅक्टर ट्रॉली उलटली, 27 जणांचा मृत्यू
 • तलावात ट्रॉली उलटून 27 जणांचा मृत्यू झाला आणि 22 जण जखमी झाले
 • जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक

Tractor trolley overturns near lake in Kanpur, 27 dead : उत्तर प्रदेशमधील कानपूरच्या साद पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोरथा गावात राहणारे भाविक ट्रॅक्टर ट्रॉलीने फतेहपूरच्या चंद्रिका देवी मंदिरात गेले होते. परतत असताना साद आणि गंभीरपूर गावादरम्यान रस्त्याच्या कडेला असलेल्या तलावात ट्रॉली उलटून 27 जणांचा मृत्यू झाला आणि 22 जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. जखमींना  जवळच्या कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे नेण्यात आले आहे. काही जखमींना कानपूरच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. अपघाताची पोलीस चौकशी होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

मृतांमध्ये महिला आणि मुलांची संख्या मोठी आहे. उत्तर प्रदेश सरकारने घटनेची माहिती मिळताच शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० लाख रुपयांची मदत जाहीर केली. पंतप्रधान मोदींनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली. 

प्राथमिक माहितीनुसार एका मुलाचा मुंडन विधी होता. या विधीसाठी संबंधित मुलगा, त्याचे आई वडील आणि नातलग तसेच संबंधित कुटुंबाला ओळखणारे काही ग्रामस्थ चंद्रिका देवी मंदिरात गेले होते. परतत असताना अपघात झाला. अपघातात काही कुटुंबातील एक किंवा त्यापेक्षा जास्त सदस्यांचा मृत्यू झाला अथवा ते जखमी आहेत. यामुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. 


मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी वरिष्ठ मंत्री राकेश सचान आणि अजित पाल यांना घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेण्याच्या तसेच मदतकार्य वेगाने व्हावे यासाठी आवश्यक ते करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ परिस्थितीवर लक्षल ठेवून आहेत आणि प्रशासनाला सूचना देत आहेत. 

Online Shopping offer: या बँकेची मोठी ऑफर...ऑनलाइन शॉपिंगसाठी पैशांची तजवीज आणि करा जबरदस्त बचत

ज्या ठिकाणी अपघात झाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. ट्रॅक्टर ट्रॉलीचा चालक वेगाने पुढे जाण्यासाठी वाहनाचा वेग वाढवत होता. या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. वाहनात बसलेले थेट तलावाच्या खोल पाण्यात पडले होते. यामुळे मृतांची संख्या मोठी आहे.

Changes from 1st October 2022: आजपासून होणार हे 10 मोठे बदल...तुमच्यावर होणार थेट परिणाम, पाहा कोणते

ओळख पटविण्याची प्रक्रिया पूर्ण करून प्रशासनाने 24 मृतांची यादी जाहीर केली आहे. इतर मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.

 1. मिथलेश (५० वर्षे) - पती रामजीवन
 2. केशकली पती देशराज
 3. किरण आणि/. पिता शिवनारायण
 4. पारुलचे वडील रामधर
 5. अंजली डब्ल्यू/ओ रामजीवन
 6. रामजानकी आणि/.चिड्डू
 7. लीलावती पती रामदुलारे
 8. गुडियाचा पती संजय
 9. तारा देवी पाटी टिल्लू
 10. अनिता देवी पती बिरेंद्र सिंह
 11. सानवी फादर कल्लू
 12. शिवमचे वडील कल्लू
 13. नेहाचे वडील सुंदरलाल
 14. मनिसा फादर रामदुलारे
 15. उसा पती ब्रजलाल
 16. गीता सिंग, पती शंकर सिंग
 17. रोहितचे वडील रालदुलारे
 18. रवीचे वडील शिवराम
 19. जयदेवी, पती शिवराम
 20. मायावती, पती रामबाबू
 21. सुनिता, वडील प्रल्हाद
 22. शिवानी, वडील स्व. रामखिलावन
 23. फुलमती, पती स्वा सियाराम
 24. राणी, पती रामशंकर

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी