वाहतूक नियमांचं उल्लंघन, वाहनचालकाला तब्बल २ लाखांचा दंड

लोकल ते ग्लोबल
Updated Sep 12, 2019 | 23:42 IST | टाइम्स नाऊ डिजीटल

नवीन मोटार वाहन नियम लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. आता अशाच प्रकारे एका वाहन चालकाला तब्बल दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Rs 2 lakh fine to truck driver for traffic rules violation in delhi
वाहतूक नियमांचं उल्लंघन, वाहनचालकाला तब्बल २ लाखांचा दंड  

थोडं पण कामाचं

  • दिल्लीत ट्रक चालकाला वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठोठावला दोन लाखांचा दंड
  • राम किशन नावाच्या ट्रक ड्रायव्हरला २ लाख ५०० रुपयांचा दंड भरावा लागला
  • राम किशन यांच्या ट्रकमध्ये रेती भरलेली होती. तसेच ट्रक ओव्हरलोडेड होता आणि ट्रक चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हतं

नवी दिल्ली: नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने वाहतूक नियमांचं उल्लघन करणाऱ्यांवर अधिक रकमेचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारने लागू केलेल्या नव्या मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांकडून दुप्पट ते पाचपट दंडाची रक्कम वसूल करण्याचं म्हटलं आहे. त्यानुसार, आता दिल्लीतील एका वाहनचालकाला नियमांचं उल्लंघन करणं चांगलंच महागात पडलं आहे. कारण, नियमांचं उल्लंघन केल्यामुळे या ट्रक चालकाला तब्बल दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

बुधवारी रात्री दिल्ली पोलिसांनी राम किशन नावाच्या ट्रक ड्रायव्हरवर कारवाई करत त्याला २,००,५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानुसार राम किशन या ट्रक ड्रायव्हरने ही दंडाची रक्कम भरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राम किशन हा दिल्लीतील मुकरबा चौक येथून भलस्वाच्या दिशेने जात असताना त्याच्यावर वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. 

हरियाणातील या ट्रकमध्ये रेती भरलेली होती मात्र, ट्रकमध्ये असलेली रेती ही क्षमतेपेक्षा अधिक असल्याने ओव्हर लोडिंग नुसार वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. यासोबतच ट्रक चालकाकडे लायसन्स, आरसी बूक, फिटनेस सर्टिफिकेट, पीयूसी यापैकी कुठलेच कागदपत्रे उपलब्ध नव्हती. दिल्ली वाहतूक पोलिसांनी राम किशन या ट्रक चालकाला वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावला. त्यानंतर राम किशन याने रोहिणी कोर्टात ही दंडाची रक्कम जमा केली आहे. 

असं म्हटलं जात आहे की, नव्या मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून आतापर्यंत वाहतूक पोलिसांनी एका वाहन चालकाला ठोठावलेली ही सर्वाधिक दंडाची रक्कम आहे. 

यापूर्वी राजस्थानमध्ये एका ट्रक मालकाला ५ सप्टेंबर रोजी ओव्हरलोडमुळे दंडात्मक कारवाई केली होती. या ट्रक मालकाला पोलिसांनी १,४१,७०० रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर त्याने ९ सप्टेंबर रोजी ही दंडाची रक्कम भरली होती. ट्रकमध्ये क्षमतेपेक्षा अधिक सामान असल्याने वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली होती. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...