UP स्टेशनवर ट्रेन उभी करून चक्क झोपला ड्रायव्हर, प्रवाशांनी तब्बल अडीच तास पाहिली वाट

लोकल ते ग्लोबल
Updated Jan 24, 2022 | 12:42 IST | टाइम्स नाऊ मराठी

Railway Driver Sleep | उत्तर प्रदेशातील शाहजहांपुर रेल्वे स्थानकावर शुक्रवारी एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. तिथे बालामाऊ पॅसेंजर ट्रेनच्या ड्रायव्हरने झोप न लागल्याने ट्रेन चालवण्यास चक्क नकार दिला, त्यामुळे ही गाडी तब्बल अडीच तास स्टेशनवर उभी होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी साडेतीन तास उशिराने बालामाऊ पॅसेंजर ही गाडी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शाहजहांपुर रेल्वे स्थानकावर पोहोचली.

train driver stopped the train at balamau passenger and fell asleep The passengers waited for two and a half hours
स्टेशनवर ट्रेन उभी करून ड्रायव्हर झोपला  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • उत्तरप्रदेशातील बालामाऊ पॅसेंजर ट्रेनच्या ड्रायव्हरने झोप न लागल्याने ट्रेन चालवण्यास चक्क नकार दिला.
  • त्यामुळे ही गाडी तब्बल अडीच तास स्टेशनवर उभी होती.
  • चालकाला ही गाडी सकाळी बालमाऊ येथे परत न्यायची होती. मात्र रात्री उशिरा आल्याने ड्रायव्हरला झोप लागली नाही, त्यामुळे त्याने शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रेन माघारी नेण्यास नकार दिला.

Railway Driver Sleep | शाहजहांपुर  : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) शाहजहांपुर रेल्वे स्थानकावर (Shahjahanpur Railway Station) शुक्रवारी एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. तिथे बालामाऊ पॅसेंजर ट्रेनच्या ड्रायव्हरने झोप न लागल्याने ट्रेन चालवण्यास चक्क नकार दिला, त्यामुळे ही गाडी तब्बल अडीच तास स्टेशनवर उभी होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. महत्त्वाचे म्हणजे गुरुवारी साडेतीन तास उशिराने बालामाऊ पॅसेंजर ही गाडी रात्री एक वाजण्याच्या सुमारास शाहजहांपुर रेल्वे स्थानकावर पोहोचली. ज्या चालकाने बालमाऊ येथून गाडी आणली होती, त्याच चालकाला ही गाडी सकाळी बालमाऊ येथे परत न्यायची होती. मात्र रात्री उशिरा आल्याने ड्रायव्हरला झोप लागली नाही, त्यामुळे त्याने शुक्रवारी सकाळी ७ वाजता ट्रेन माघारी नेण्यास नकार दिला. त्याची झोप पूर्ण झाल्यावरच तो ट्रेन माघारी नेईल असे त्याने सांगितले. (train driver stopped the train at balamau passenger and fell asleep The passengers waited for two and a half hours). 

अधिक वाचा : म्हाडाच्या परीक्षेचं प्रवेशपत्र आलं, येथे करा डाऊनलोड

शाहजहांपुरचे रेल्वे अधीक्षक अमरेंद्र गौतम म्हणाले की, "रोझा जंक्शनवर रात्रीच्या विश्रांतीनंतर तोच ड्रायव्हर सकाळी परत ट्रेनला घेऊन जातो. रात्रीची विश्रांती पूर्ण न झाल्यामुळे ट्रेन चालकाने सकाळी ट्रेन नेण्यास नकार दिला होता. जेव्हा त्याची झोप पूर्ण झाली तेव्हा तो ट्रेन घेऊन निघाला."

रेल्वेच्या व्हिस्टाडोम कोच ट्रेनला प्रचंड प्रतिसाद

दरम्यान, दुसरीकडे पर्यटन वाढवण्याच्या उद्देशाने रेल्वेने नुकत्याच सुरू केलेल्या विस्टाडोम कोच गाड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या ट्रेनमधून हजारो प्रवासी प्रवास करत आहेत. तीन महिन्यांत आणखी २० हजार प्रवाशांनी व्हिस्टाडोम ट्रेनने प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेने (Cental Railway) दिली आहे, त्यामुळे मध्य रेल्वेला यातून बऱ्यापैकी कमाई झाली आहे.

 माहितीनुसार, ऑक्‍टोबर ते डिसेंबर २०२१ या तीन महिन्यांत तब्बल २०४०७ प्रवाशांनी मध्य रेल्वे अंतर्गत धावणाऱ्या व्हिस्टाडोम ट्रेनमधून प्रवास केला आहे. यादरम्यान मध्य रेल्वेला २.३८ कोटी रुपयांची कमाई झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मडगाव-सीएसएमटी (CSMT) जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांचा प्रतिसाद १००%  आहे, ज्यामुळे १.४० कोटी रुपयांची कमाई झाली आहे. याशिवाय सीएसएमटी-पुणे, सीएसएमटी-डेक्कन एक्स्प्रेसमध्ये ९०.४३ टक्के इतकी कारभार व्यवस्था राहिली आहे. यादरम्यान ७८१५ प्रवाशांनी प्रवास केला असून एकूण ५०.९६ लाख रुपयांची कमाई झाली आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी