IAS टीना दाबीचे पती IAS प्रदीप गावंडेंची अचानक झाली बदली

IAS Officer Tina Dabi Husband: IAS अधिकारी टीना दाबी यांचे पती IAS प्रदीप गावंडे यांची बिकानेरच्या वसाहत विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. टीना दाबी, देशातील सर्वात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक आहे. ज्या सध्या राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आहेत.

transfer of ias officer tina dabis husband ias pradeep gawande government of rajasthan
IAS टीना दाबीचे पती IAS प्रदीप गावंडेंची अचानक झाली बदली  |  फोटो सौजन्य: Instagram
थोडं पण कामाचं
  • राजस्थानमध्ये 30 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या
  • आयएएस अधिकारी टीना दाबी यांचे पती प्रदीप गावंडे यांची बदली
  • प्रदीप गावंडे यांची बिकानेरच्या वसाहत विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती

IAS Officer Tina Dabi Husband: जयपूर: राजस्थान सरकारने (Rajasthan Government) शुक्रवारी प्रसिद्ध IAS अधिकारी टीना दाबी (Tina Dabi)  यांचे पती IAS प्रदीप गावंडे (Pradeep Gawande) यांच्यासह 30 IAS अधिकार्‍यांची  (IAS Officers) बदली करण्यात आली आहे. यासोबतच चार जिल्हाधिकाऱ्यांच्याही बदली करण्यात आल्या आहेत. राजस्थानच्या कार्मिक विभागाने बदलीबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत. अंतर सिंह नेहरा यांना राजस्थानची राजधानी जयपूरचे विभागीय आयुक्त बनवण्यात आले आहे. (transfer of ias officer tina dabis husband ias pradeep gawande received responsibility now)

आयएएस अधिकारी टीना दाबी यांचे पती प्रदीप गावंडे यांची बदली

IAS नवीन महाजन यांना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रधान सचिव पदावरून हटविण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव वैभव गलरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसरीकडे, संदीप वर्मा यांना माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव करण्यात आले आहे. 

अधिक वाचा: IAS टीना डाबी होणार महाराष्ट्राची सून; 'कबुल' अमान्य झाल्यानंतर 'सावधान' म्हणत मराठी अधिकाऱ्यासोबत घेणार सातफेरे

याशिवाय आनंद कुमार यांना गृह आणि संरक्षण विभागाचे प्रधान सचिव करण्यात आले आहे. कार्मिक विभागाने जारी केलेल्या बदलीच्या आदेशानुसार, गंगानगर, प्रतापगड, हनुमानगड आणि डुंगरपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे.

प्रदीप गावंडे हे बिकानेरच्या वसाहत विभागाचे आयुक्त

त्याचवेळी प्रसिद्ध आयएएस अधिकारी टीना दाबी यांचे पती आयएएस प्रदीप गावंडे यांची बिकानेरच्या वसाहत विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

देशातील सर्वात चर्चेत असलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपैकी एक, टीना दाबी सध्या राजस्थानच्या जैसलमेरच्या जिल्हाधिकारी आहेत. गेल्या आठवड्यात टीना दाबींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये त्या दिवाळीत फटाके वाजवताना दिसत होत्या.

अधिक वाचा: UPSC Result : देशात पहिली आलेल्या श्रुती शर्माला 54.57% गुण, युपीएससी 2021च्या निकालाची गुणांची यादी upsc.gov.in वर जाहीर

टीना दाबी आणि डॉ. गावंडे यांचा विवाह या वर्षाच्या सुरुवातीला जयपूरमध्ये झाला होता. त्यांचा साखरपुडा, लग्न आणि रिसेप्शनचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. टीना दाबी यांचे सोशल मीडियावर बरेच फॉलोवर्स आहेत. ज्यांना त्यांच्या लग्नाचे फोटो फार आवडले होते. 

टीना दाबी 2015 मध्ये UPSC मध्ये प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर प्रसिद्धीझोतात आल्या होत्या. त्यांनी दुसरा क्रमांक मिळवलेल्या अतहर अमीर खानशी लग्न केले होते. मात्र, लग्नानंतर साधारण वर्षभरानंतर त्यांचा घटस्फोट झाला. 

अधिक वाचा: UPSC Exam पास झाल्याचा आनंद गगनात मावेना, सत्य बाब समजताच कुटुंबाने मागितली माफी; जाणून काय आहे हा प्रकार

अतहर आमिर खानने यांनीही याच वर्षी डॉक्टर मेहरीन काझीशी लग्न केले आहे. डॉ. प्रदीप यांनी भारतीय प्रशासकीय परीक्षेत येण्यापूर्वी वैद्यकीय डॉक्टर म्हणून काम केले आहे.  त्यांनी 2012 मध्ये आयएएस उत्तीर्ण होऊन 478 वा अखिल भारतीय रँक मिळवला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी