Indian Railways tickets Rules ,मुंबई : भारतीय रेल्वेचे असे खूप नियम आहेत जे आपल्याला माहिती नाहीत. कधी कधी घाईच्या वेळी रेल्वेचं कन्फर्म तिकिट मिळणं कठीण होऊण जाते. कधी कधी तत्काळ तिकिट आरक्षण सिस्टममध्येही कन्फर्म तिकिट मिळत नाही. तुम्ही कधी अडचणीत असाल आणि तुमच्याकडे फक्त रेल्वे प्रवास हा पर्याय आहे, तर एक मार्ग आहे ज्यामुळे विना कन्फर्म तिकिट तुम्ही रेल्वे प्रवास करू शकता. (Travel now without confirm tickets read in marathi)
अधिक वाचा : Happy Teddy Day 2023 Wishes in marathi : 'टेडी डे' निमित्त शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी Messages
जर तुम्हाला काही कारणास्तव तिकिट नाही मिळू शकली, तरी भारतीय रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही वेटिंग तिकिटचा वापर करून प्रवास करू शकता
हा पर्याय वापरण्यासाठी तुम्हाला वेटिंग तिकिट हे तिकिट खिडकीवरून घ्यावे लागेल. ऑनलाइन तिकिट जर कन्फर्म नसेल तर या तुम्हाला प्रवास करता येत नाही. ऑनलाइन अप्रमाणित तिकीट प्रवाशांना ट्रेन मधून प्रवास करायला परवानगी देत नाही. कारण ट्रेन सुटण्याच्या वेळेपर्यंत सीट कन्फर्म न केल्यास तिकिटाचे पैसे प्रवाशांना परत केले जातात. म्हणूनच ऑनलाइन तिकिट काढणाऱ्या लोकांसाठी याचा फायदा होत नाही.
अधिक वाचा : Happy Teddy Day Shayari in Marathi: व्हॅलेटाइन वीकमध्ये टेडी डेच्या मराठी शायरीतून शुभेच्छा
त्यामुळे, तिकीट खिडकीवरून वेटिंग लिस्ट किंवा चालू बुकिंग तिकीट मिळाल्यानंतर चार्ट तयार केल्यानंतरही कोणतीही सीट रिक्त आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रवासी ट्रेनच्या टीटीईशी संपर्क साधू शकतात. जर तुमच्याकडे जर हे तिकिट असेल तर तिकिट चेकर तुम्हाला अडवू शकत नाहीत. पण जर टीटीईकडे जर ट्रेनमध्ये सीट शिल्लक नसेल तर तुम्हाला सीट नाही मिळणार.