पहिल्यांदाच काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेववर तिरंगा

जम्मू काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर तिरंगा फडकला. जम्मू काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर पहिल्यांदाच लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर तिरंगा फडकला.

Tri-colour hosted over Press Enclave at Lal Chowk Srinagar
पहिल्यांदाच काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेववर तिरंगा 

थोडं पण कामाचं

  • पहिल्यांदाच काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेववर तिरंगा
  • जम्मू काश्मीर: श्रीनगरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेववर तिरंगा
  • जम्मू काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर पहिल्यांदाच

श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर तिरंगा फडकला. जम्मू काश्मीर भारतात विलीन झाल्यानंतर पहिल्यांदाच लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर तिरंगा फडकला. Tri-colour hosted over Press Enclave at Lal Chowk Srinagar

श्रीनगरच्या लाल चौक आणि आसपासच्या भागात एखाद्या व्यक्तीने तिरंगा फडवण्याचा प्रयत्न केला तरी तणाव निर्माण होत होता. अनेक वर्ष ही परिस्थिती होती. मात्र मोदी सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर हळू हळू परिस्थिती बदलू लागली आहे. जम्मू काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर दिमाखात तिरंगा फडकत आहे. पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली.

जम्मू काश्मीरमधील दहशतवाद कमी होत आहे. भारत सरकार हे आपले सरकार आहे आणि ते आपल्या विकासाकरिता काम करत आहे ही भावना वाढीस लागली आहे. याच भावनेतून जम्मू काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर तिरंगा फडकत आहे.

सर्वात आधी लाल चौक येथे तिरंगा फडकावण्याचे काम भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले होते. त्यांनी १९९२ मध्ये ही कामगिरी केली होती. प्रजासत्ताक दिनी मुरली मनोहर जोशी यांनी लाल चौक येथे तिरंगा फडकावला होता. मुरली मनोहर जोशी यांनी डिसेंबर १९९१ मध्ये कन्याकुमारी ते श्रीनगर अशी एकता यात्रा सुरू केली. या यात्रेचा समारोप २६ जानेवरी १९९२ रोजी प्रजासत्ताक दिनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकावून झाला. देशातील अनेक राज्यांमधून एकता यात्रा गेली होती. जम्मू काश्मीर हे भारताचाच एक भाग आहे हा संदेश देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा यासाठी एकता यात्रा काढण्यात आली होती. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यावेळी एक कार्यकर्ता म्हणून यात्रेत सहभागी झाले. 

मोदी सरकारने कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतला. संसदेच्या दोन्ही सभागृहांची मंजुरी मिळाल्यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने ५ ऑगस्ट २०१९ रोजी हा निर्णय अंमलात आला. यानंतर लाल चौकात तिरंगा फडकावण्याची मागणी जोर धरू लागली. जो लाल चौक संकुचित राजकारण आणि दहशतवादाचे प्रतिक झाला होता तोच लाल चौक देशभक्तीचे प्रतिक व्हावा या उद्देशाने तिरंगा फडकावण्याची मागणी जोर धरू लागली. लेहचे खासदार जामयांग सेरिंग नांग्याल यांनी ऑगस्ट २०२० मध्ये ट्वीट करुन लाल चौक हा परिसर आता देशभक्तीचे प्रतिक होत असल्याचे मत व्यक्त केले होते. यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीरच्या लाल चौकातील प्रेस एन्‍क्‍लेव या इमारतीवर तिरंगा फडकला. याआधी मागच्या वर्षी भाजपच्या कार्यकर्त्यांनी श्रीनगरच्या लाल चौकात तसेच पीडीपी कार्यालय या दोन ठिकाणी तिरंगा फडकावला होता. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी