15 August Images: लडाखच्या पँगॉग तलावावर फडकला तिरंगा, पाहा स्वातंत्रदिनाचे फोटोज

लोकल ते ग्लोबल
Updated Aug 15, 2020 | 17:48 IST | टाइम्स नाऊ मराठी

देशभरात आज स्वातंत्र्यदिन धूमधडाक्यात साजरा होत आहे. ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिल्लीसह संपूर्ण देशात सणासारखे वातावरण आहे. या उत्सवाची अनेक सुंदर छायाचित्रे प्रसिद्ध होत आहेत.

Pangong Lake, Ladakh
लदाखच्या पँगॉंग तलावावर फडकला तिरंगा, बघा स्वातंत्र्याच्या जल्लोषाची इतर छायाचित्रे 

नवी दिल्ली: देशभरात शनिवारी ७४वा स्वातंत्र्यदिन मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जात आहे (74th Independence Day celebrated with enthusiasm) आणि सोबतच कोरोना व्हायरसपासून (corona virus precautions) बचावासाठी आवश्यक त्या निर्देशांचे (guidelines) पालन करत हे समारंभ मर्यादितही (limited celebrations) ठेवले जात आहेत. सार्वजनिक समारंभ कोरोनाच्या संकटामुळे न होऊ शकल्याने पूर्वीचा उत्साह काहीसा कमी झालेला दिसत आहे. लाल किल्ल्यावर (red fort) पंतप्रधानांच्या भाषणादरम्यानही (PM’s address to the nation) अनेक आसने रिकामीच होती. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे स्वातंत्र्यपर्व धूमधडाक्यात साजरे होत आहे.

लाल किल्ल्यावर आयोजित केलेल्या मुख्य समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ध्वजारोहण केले आणि त्यानंतर देशवासियांना संबोधित केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्याचा परिसर गर्दीने फुललेला असतो. पण यावेळी या कार्यक्रमादरम्यान अनेक आसने रिकामीच होती. यावेळी शारीरिक अंतराचीही पूर्ण काळजी घेण्यात आली होती.

स्वातंत्र्यदिन सोहळ्यात दरवर्षी चमकदार आणि रंगीबेरंगी पेहरावात दिसणाऱ्या मोदींनी या वर्षीही ७४व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ऐतिहासिक लाल किल्ल्यावर शनिवारी झालेल्या समारंभात केशरी आणि क्रीम रंगाचा पोषाख घातला होता. सोबत अर्ध्या बाह्यांचा कुर्ता आणि चुडीदार पायजमा घातला होता. लाल किल्ल्यावर आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या समारंभात दरवर्षी प्रचंड गर्दी असते, पण या वर्षी कोव्हिड-१९ च्या संकटामुळे निर्धारित सुरक्षा व्यवस्थांचे पालन करत लोकांची संख्या कमी ठेवण्यात आली होती.

भारतीय सैन्याने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हे छायाचित्र प्रसिद्ध केले आणि लिहिले, ‘सैनिक त्या मूल्यांनी प्रभावित असतात जी त्यांना स्वेच्छेने आव्हाने आणि कठीण परिस्थितीचा सामना करण्यास प्रेरित करतात.’

इंडो-तिबट बॉर्डर पोलीस (ITBP) दलाच्या जवानांनी लदाखमध्ये १४ हजार फुटांवरील पँगॉंग तलावाच्या किनारी तिरंगा फडकवून आनंद साजरा केला. यावेळची छायाचित्रे आयटीबीपीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले आहेत.

आयटीबीपीच्या जवानांनी यावेळी तिरंग्याला सलामी दिली आणि भारतमातेचा जयजयकार केला. ही छायाचित्रे सोशल मीडियावरही खूप व्हायरल होत आहेत आणि याचा व्हिडिओही व्हायरल होत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी