VIDEO: ट्रिंबर ट्रेल कॅबर कार रोपवेच्या मध्यभागी अडकली; ११ जणांचा जीव हवेत

Timber Trail Accident । हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथे केबल कार ट्रिंबर ट्रेल रोपवेच्या मध्यभागी अडकली आहे. यामध्ये एकूण ११ जण हवेत अटकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Trimber Trail Caber car stuck in the middle of the ropeway, watch video 
कॅबर कार रोपवेच्या मध्यभागी अडकली, पाहा व्हिडीओ  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे
  • ट्रिंबर ट्रेल कॅबर कार रोपवेच्या मध्यभागी अडकली.
  • ११ जणांचा जीव हवेत अडकला.

Timber Trail Accident । सोलन : हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तिथे केबल कार ट्रिंबर ट्रेल रोपवेच्या मध्यभागी अडकली आहे. यामध्ये एकूण ११ जण हवेत अटकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या या लोकांना वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. सोलन येथील टीटीआर रिसॉर्ट परवानू येथे तांत्रिक बिघाडामुळे गेल्या दोन तासांपासून ही केबल कार अडकली आहे. (Trimber Trail Caber car stuck in the middle of the ropeway, watch video). 

दरम्यान, या घटनेबाबत कॉंग्रेसचे स्थानिक आमदार कर्नल धनी राम शांडिल यांनी माहिती दिली की, त्यांनी डीसीशी चर्चा केली आहे. लवकरच अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यात येईल, असे आश्वासन आमदारांनी दिले. त्यासाठी लष्कराचीही मदत घेतली जाणार आहे.

अधिक वाचा : राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मतदान करणार पण...

लक्षणीय बाब म्हणजे  केबल कारमध्ये अडकलेल्या लोकांचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये ते स्वत:ला वाचवण्याचे आवाहन करताना दिसत आहे. केबल कारमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, तो गेल्या दोन तासांपासून केबल कारमध्ये अडकला आहे. कोणतीही मदत मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

तर परवानूचे डीएसपी प्रणव चौहान यांनी या घटनेबाबत सांगितले की, केबल कारमधील तांत्रिक बिघाडामुळे केबल कारच्या ट्रॉलीमध्ये दोन ज्येष्ठ नागरिक आणि चार महिलांसह एकूण ११ जण गेल्या दीड तासापासून अडकले आहेत. तसेच त्यांच्या बचावासाठी बचावकार्य सुरू आहे. लवकरच सर्वांना सुखरूप बाहेर काढले जाईल, असे ते म्हणाले.

३० वर्षांपूर्वी घडली होती अशीच घटना

३० वर्षांपूर्वी देखील या रोपवेवर मोठा अपघात झाला होता. १९९२ मध्ये या रोपवेवर केबल कारमध्ये तीन दिवस सुमारे १० जणांचे जीव अडकले होते. त्यानंतर लष्कर आणि हवाई दलाच्या जवानांनी जीवाची बाजी लावून अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. मात्र या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी