जवानांनी वाचवले बालकाचे प्राण: अवघ्या 40 मिनिटात बाहेर काढलं बोअरवेलमध्ये अडकेल्या दीड वर्षाच्या मुलाला, पहा व्हिडिओ

गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात मंगळवारी रात्री 8 वाजता शिवम हा दीड वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवम  खेळता-खेळता 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. ही घटना ध्रांगध्रा तालुक्यातील दुदापूर गावातील शेतात घडली आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे आई-वडील हे मजदुरी करतात. शिवम बोअरवेलमध्ये पडला त्यावेळी त्याचे आई-वडील शेताचे काम करत होते.

One and a half year old boy rescued by soldiers, watch the video
दीड वर्षाच्या मुलाला जवानांनी वाचवलं, पहा व्हिडिओ  |  फोटो सौजन्य: ANI
थोडं पण कामाचं
  • 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला शिवम 20-25 फूट खोलवर अडकला होता.
  • रात्री 10.45 वाजता मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले.

अहमदाबाद :  गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात मंगळवारी रात्री 8 वाजता शिवम हा दीड वर्षाचा मुलगा बोअरवेलमध्ये पडला. मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास शिवम  खेळता-खेळता 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला. ही घटना ध्रांगध्रा तालुक्यातील दुदापूर गावातील शेतात घडली आहे. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाचे आई-वडील हे मजदुरी करतात. शिवम बोअरवेलमध्ये पडला त्यावेळी त्याचे आई-वडील शेताचे काम करत होते, मुलगा दिसत नसल्याने त्यांनी धाव घेतली. आजूबाजूला पाहिले असता बोअरवेलमधून मुलाच्या रडण्याचा आवाज येत होता. 300 फूट खोल बोअरवेलमध्ये पडलेला शिवम 20-25 फूट खोलवर अडकला होता. आई- वडिलांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांना बोलावले. ग्रामस्थांनी पोलिस व प्रशासनाला घटनेची माहिती दिली.

माहिती मिळताच लष्कर, पोलीस, अहमदाबाद महानगरपालिका, जिल्हा प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नाने तो वाचला. यादरम्यान दक्षिण कमांडच्या जवानांनी अतिशय कठीण ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले आहे. रात्री 10.45 वाजता मुलाला बोअरवेलमधून बाहेर काढण्यात आले. मुलाची प्रकृती स्थिर असून सुमारे सुमारे 40 मिनिटांत सैनिकांनी आणि इतर यंत्रणेने मुलाला वाचवलं यामुळे सोशल मीडियावर त्यांचं कौतुक होत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ध्रंगधरा मिलिटरी स्टेशनच्या सहाय्यक पोलीस अधीक्षकांना दुदापूर गावात अरुंद बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलाला वाचवण्याची विनंती करणारा फोन आला. त्यानंतर क्विक रिऍक्शन टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी पाहिले की दीड वर्षाचा बालक शिवम 300 फूट खोल बोअरवेलमध्ये 25 फूट अडकला आहे.

तसेच मुलाच्या नाकातून पाणी येत होते, परंतु तरीही त्याला श्वास घेता येत होते आणि त्याच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या.  जवानांच्या टीमने हुशारीने काम करत धातूचा हुक बदलला आणि त्याला फायबर दोरीने बांधले आणि  जवानांनी ती दोरी बोअरवेलखाली सोडली. काही मिनिटांतच मुलाच्या टी-शर्टमध्ये हुक अडकला आणि शिवमला दोरीच्या सहाय्याने हळूहळू बाहेर काढण्यात यश आले.  वाचविण्यात आलेल्या शिवम या बालकाला तात्काळ सुरेंद्रनगर येथील सीयू शाह रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याची प्रकृती स्थिर आहे. 

दरम्यान बुधवारी, लष्कराच्या दक्षिण कमांडने 16 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला. यामध्ये जवानांच्या अत्यंत कठीण कामाचे कौतुक केले जात आहे. हे अत्यंत अवघड आणि कौशल्यपूर्ण ऑपरेशन कमांडच्या कोणार्क कॉर्प्सने यशस्वीपणे पार पाडल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी