Earthquake in Turkey : भूकंपामुळे तुर्कस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत ही आहे Latest Update

Turkey earthquake, 10 Indians stuck in remote areas but safe says External Affairs Ministry : तुर्कस्तान आणि सीरिया या 2 देशांमध्ये सोमवार 6 फेब्रुवारी 2023 रोजी भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. या भूकंपाचा फटका भारतीयांनाही बसला आहे.

Turkey earthquake
भूकंपामुळे तुर्कस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत ही आहे Latest Update  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • भूकंपामुळे तुर्कस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांबाबत ही आहे Latest Update
  • भूकंपात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त मृत्यू
  • मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती

Turkey earthquake, 10 Indians stuck in remote areas but safe says External Affairs Ministry : तुर्कस्तान आणि सीरिया या 2 देशांमध्ये सोमवार 6 फेब्रुवारी 2023 रोजी भूकंप झाला. या भूकंपात आतापर्यंत 16 हजारांपेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. मृतांच्या आणि जखमींच्या संख्येत वाढ होण्याची भीती आहे. भूकंपामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी झाली. लाखो नागरिक बेघर झाले. अनेक कुटुंबांची वाताहात झाली. या भूकंपाचा फटका भारतीयांनाही बसला आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने महत्त्वाची माहिती दिली आहे. या माहितीनुसार, तुर्कस्तानमध्ये भूकंपामुळे 10 भारतीय अडकले आहेत. पण ते सुरक्षित आहेत. तसेच 1 भारतीय बेपत्ता आहे. बेपत्ता असलेल्या भारतीय नागरिकाचा शोध सुरू आहे. भारत सरकार भूकंपामुळे अडचणीत सापडलेल्या 11 भारतीय नागरिकांच्या भारतातील कुटुंबियांच्या संपर्कात आहे. त्यांना वेळोवळी माहिती दिली जात आहे.

तुर्कस्तान आणि सीरियात भारताचे ऑपरेशन दोस्त

बाप रे बाप!, प्रलयकारी भूकंपानंतर उद्धवस्त तुर्कीचे pics पाहून तुम्हालाही रडू येईल!

तुर्कस्तान आणि सीरियात भूकंप, 11 हजारांपेक्षा जास्त मृत्यू

तुर्कस्तान आणि सीरियामध्ये भूकंपामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांसाठी भारताने 'ऑपरेशन दोस्त' #OperationDost ही मोहीम सुरू केली आहे. 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारताचे पथक तुर्कस्तान आणि सीरिया सरकार तसेच निवडक आंतरराष्ट्रीय संस्थांसोबत समन्वय साधून मदतकार्य करत आहे.

भूकंपामुळे किमान 2 कोटी 30 लाख (23 Million) नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (World Health Organization - WHO) हा अंदाज व्यक्त केला आहे. 

'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भारताने तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये फिल्ड हॉस्पिटल उभारण्यासाठी आवश्यक ते साहित्य पाठवले आहे. तसेच भारताने तुर्कस्तान आणि सीरिया या दोन्ही देशांमध्ये डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, औषधे आणि इतर वैद्यकीय साहित्य, भूकंपामुळे ढिगाऱ्यात अडकेल्यांना शोधून त्यांना वाचवण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके आणि आवश्यक उपकरणे, अन्न, पाणी अशा स्वरुपात मोठी मदत पाठवली आहे. भारतीय पथके मदतकार्यात गुंतली आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी