पाकिस्तानच्या साथीने अणूबाँब तयार करत आहे तुर्कस्तान, ग्रीसच्या तज्ञांनी दिला भारताला इशारा

Turkey Nuclear Bomb: इस्लामिक जगात वर्चस्व राखण्यासाठी तुर्कस्तानचे राष्ट्रपती रेसेप एर्दोगान हे पाकिस्तानच्या मदतीने अणूबाँब आणि क्षेपणास्त्रे तयार करत आहे. याचा इशारा ग्रीसच्या तज्ञांनी भारताला दिला आहे.

Turkey and Pakistan
पाकिस्तानच्या साथीने अणूबाँब तयार करत आहे तुर्कस्तान, ग्रीसच्या तज्ञांनी दिला भारताला इशारा  |  फोटो सौजन्य: Twitter

थोडं पण कामाचं

  • पाकिस्तान आणि तुर्कस्तानची वाढती जवळीक भारतासाठी डोकेदुखी
  • तुर्कस्तानला अणूबाँब आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान देत आहे पाकिस्तान
  • तुर्कस्तान आणि पाकिस्तानच्या मैत्रीमुळे भारताला दहशतवादाचा धोका

पाकिस्तान (Pakistan) आणि तुर्कस्तानच्या (Turkey) वाढत्या मैत्रीमुळे ग्रीसच्या (Greece) तज्ञांनी भारताला (India) इशारा (warning) दिला आहे. पाकिस्तान हा अणूबाँब (nuclear bombs) आणि क्षेपणास्त्र तंत्रज्ञान (missile technology) तुर्कस्तानला देत असल्याच्या बातम्या येत असतानाच हा इशारा आला आहे. तज्ञांनी म्हटले आहे की पाकिस्तान आणि तुर्कस्तानच्या मैत्रीमुळे ग्रीस आणि भारतात दहशतवाद (terrorism) आणि सीमासुरक्षेला (border security) मोठा धोका (threat) निर्माण झाला आहे.

ग्रीसच्या आंतरराष्ट्रीय विषयांवरील तज्ञांनी दिला इशारा

ग्रीसचे आंतरराष्ट्रीय तज्ञ प्रोफेसर जॉन नोमिकोस यांनी एका वेबिनारमध्ये बोलताना म्हटले की तुर्कस्तान आणि पाकिस्तानची मैत्री ही भारत आणि ग्रीससाठी मोठा धोका आहे. त्यांनी म्हटले आहे की पाकिस्तानी आणि चिनी गुप्तहेर संघटना या जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता पसरवण्यासाठी एकत्र काम करत आहेत. त्यांनी यावेळी बोलताना अमेरिकेच्या बायडेन सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी तुर्कस्तानच्या अणूशक्तीराष्ट्र बनण्याच्या स्वप्नाला लगाम घालावा.

भूमध्य सागरात आपली उपस्थिती भारताने वाढवावी

प्रोफेसर जॉन म्हणाले की तुर्कस्तान आणि पाकिस्तानला आळा घालण्यासाठी भारताला भूमध्य सागरात आपली हजेरी निश्चित करावी लागले. तर ग्रीसच्या पेंटापोस्टाग्मा या वृत्तसंस्थेचे संपादक एंद्रेस माऊंटजोउरोउलियास यांनी म्हटले आहे की जेव्हा पाकिस्तान तुर्कस्तानला अणूबाँबचे साहित्य पुरवत आहे तेव्हा भारत आणि ग्रीसमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित व्हावेत. दोन्ही देशांनी मिळून हत्यारे तयार करावीत. त्यांनी म्हटले की तुर्कस्तान हा शिष्यवृत्तीच्या नावाने भारतीय विद्यार्थ्यांना अमिष दाखवतो. तुर्कस्तानचे राष्ट्रपती खलीफा झाल्यानंतर जगाला मोठा धोका निर्माण झाला आहे.

अणूबाँब आणि क्षेपणास्त्रांसंबंधी दोन देशांचा गुप्त करार

आयएएनएस या वृत्तंसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान आणि तुर्कस्तान या दोन देशांदरम्यान अणूबाँब आणि क्षेपणास्त्रे तयार करण्याबाबत गुप्त करार गेल्या काही दिवसांत झाला आहे. या दोन देशांमध्ये 22-23 डिसेंबर रोजी एक भेट झाली होती. तज्ञांचे म्हणणे आहे की या भेटीत वेगाने बदलणाऱ्या भूराजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. इमरान खान यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या जोरावर तुर्कस्तानचे राष्ट्रपती अणूबाँब तयार करण्याचे आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या नादात आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी