Turkey-Syria earthquake । काळजाचा ठोका चुकवणारा Video, ढिगाऱ्याखाली दबलेल्या 7 वर्षांच्या मुलीने वाचवला लहान भावाचा जीव

video viral : व्हिडिओमध्ये मुलगी आणि तिचा लहान भाऊ कोसळलेल्या इमारतीच्या मोठ्या काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याचे दिसत आहे. यूएनचे प्रतिनिधी मोहम्मद सफा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे.

Turkey-Syria earthquake. A 7-year-old girl buried under the debris saved her younger brother's life, the video went viral
Turkey-Syria earthquake । काळजाचा ठोका चुकवणारा Video, ढिगाऱ्याखाली दबलेल्या 7 वर्षांच्या मुलीने वाचवला लहान भावाचा जीव  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपामुळे सुमारे 8000 लोकांचा मृत्यू
  • भाऊ-बहिण इमारतीच्या मोठ्या काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली अडकले
  • मदत आणि बचाव पथकाने सुखरुप सुटका केली.

Turkey-Syria earthquake : भूकंपाच्या धक्क्याने उद्ध्वस्त झालेल्या तुर्की आणि सीरियामध्ये सुमारे 8000 लोकांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली गाढलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीव सुरू आहे. मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान, एका सात वर्षांच्या मुलीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सात वर्षांची मुलगी ढिगाऱ्याखाली गाढलेल्या आपल्या लहान भावाला वाचवताना दिसत आहे. (Turkey-Syria earthquake. A 7-year-old girl buried under the debris saved her younger brother's life, the video went viral)

#आत्ताच आलं की

अधिक वाचा :  RBI Hike Repo Rate: आरबीआयने रेपो रेट वाढवला, कार आणि होम लोन पुन्हा महागणार

व्हिडिओमध्ये मुलगी आणि तिचा लहान भाऊ कोसळलेल्या इमारतीच्या मोठ्या काँक्रीटच्या ढिगाऱ्याखाली अडकलेले दिसत आहे. यूएनचे प्रतिनिधी मोहम्मद सफा यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओमध्ये ती मुलगी सांगत आहे की, ती अनेक तासांपासून अडकली होती.



भावंडांचा फोटो शेअर करत मोहम्मद सफाने ट्विट केले की, "एका 7 वर्षांच्या मुलीने तिच्या लहान भावाला 17 तास ढिगाऱ्याखाली वाचवले, त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले."

अधिक वाचा :  MHADA Lottery 2023 : मुंबईतील घराचे स्वप्न सत्यात उतरणार, म्हाडाच्या 2,683 घरासाठी लाॅटरी

मुलीच्या या धाडसाचे जगभरातून लोक कौतुक करत असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दुर्घटनेतील आणखी एका घटनेत सीरियातील एका महिलेने ढिगाऱ्याखाली एका मुलाला जन्म दिला. प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाला. मात्र, मदत आणि बचाव पथकाच्या लोकांनी त्या नवजात बाळाला वाचवले.

अधिक वाचा :  Congress: 'बाळासाहेबांची काँग्रेस' आणि 'नानांची काँग्रेस' काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील यांचं ट्वीट

आग्नेय तुर्की आणि उत्तर सीरियामध्ये सोमवारी पहाटे 7.8 तीव्रतेच्या भूकंपाच्या सलग दोन धक्क्यांनंतर, आणखी अनेक भूकंपांनी मोठ्या प्रमाणावर विध्वंस केला आहे. यामुळे हजारो लोक बेघर झाले आहेत. जगभरातील देशांनी तुर्की आणि सीरियाला मानवतावादी मदत पाठवली आहे, जेणेकरून ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना लवकरात लवकर बाहेर काढता येईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी