Road Accidents: 'या' देशात एकाच दिवशी दोन भीषण अपघात, 32 जणांचा मृत्यू; 52 हून अधिक जखमी

लोकल ते ग्लोबल
Pooja Vichare
Updated Aug 21, 2022 | 07:35 IST

Turkey Road Accidents: दोन भीषण रस्ते अपघात (Two Serious Road Accidents) झाले आहेत. या दोन्ही अपघातांमध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला तर 52 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय.

Turkey Accident News
मोठी भीषण अपघात  |  फोटो सौजन्य: Reuters
थोडं पण कामाचं
  • दोन भीषण रस्ते अपघात (Two Serious Road Accidents) झाले आहेत.
  • या दोन्ही अपघातांमध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला.
  • 52 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय.

तुर्कीस्तान:  Turkey Accident: आत्ताच्या घडीची सर्वांत मोठी बातमी समोर येत आहे. तुर्कीमध्ये (Turkey) दोन भीषण रस्ते अपघात (Two Serious Road Accidents)  झाले आहेत.  या दोन्ही अपघातांमध्ये आतापर्यंत 32 जणांचा मृत्यू झाला तर 52 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर येतेय. या दोन्ही अपघातानं देश चांगलाच हादरला आहे. 

तुर्कीमध्ये पहिला अपघात गझियानटेप येथे झाला. जिथे प्रवाशांनी भरलेल्या बसचा अपघात झाला. या बसच्या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, दुसरा अपघात मार्डिन शहरात घडला. या अपघातात एका अनियंत्रित ट्रकनं लोकांना चिरडलं आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला. ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक वाचा- कोकण फिरणं आलं जीवाशी, वाशिम जिल्ह्यातल्या तीन तरूणांचा ताम्हिणी घाटात मृत्यू

दोन वेगवेगळे रस्ते अपघात 

आग्नेय प्रांत गझियानटेपचे प्रादेशिक गव्हर्नर दावूत गुल यांनी या अपघातासंदर्भात माहिती दिली आहे. गुल यांनी सांगितलं की, अपघातस्थळी बस कोसळल्याने आपत्कालीन कर्मचारी आणि पत्रकारांसह सोळा जणांचा मृत्यू झाला. तर 20 जण जखमी झाले आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. 

पुढे त्यांनी सांगितलं की, जेव्हा अग्निशमन दल, वैद्यकीय पथक आणि इतर मदतनीस अपघाताच्या ठिकाणी मदत करत होते. तेव्हा  200 मीटर मागे दुसऱ्या बसचा अपघात झाला. याचा फटका मदत करणाऱ्या टीमला आणि जखमींना बसला.

अनेकांची प्रकृती गंभीर 

त्याच वेळी मार्डिनपासून 250 किमी अंतरावर एका ट्रकने लोकांच्या जमावाला चिरडले. यात 16 लोकांचा मृत्यू झाला. दोन्ही अपघातांमध्ये संबंध असल्याचं वृत्त नाही. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

अधिक वाचा- Mangala Aarti: मंगला आरती दरम्यान चेंगराचेंगरी, गुदमरून दोन भाविकांचा मृत्यू; 6 जखमी

तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी सांगितले की, दुसऱ्या अपघातात 29 जण जखमी झाले असून त्यापैकी आठ जणांची प्रकृती गंभीर आहे.  दक्षिण-पूर्व तुर्कीतील मार्डिनमधील डेरिक जिल्ह्यातील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी