Azaan Ban: लाऊडस्पीकरवर अजान बंद करा नाहीतर...; ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांची मागणी

लोकल ते ग्लोबल
Updated Apr 08, 2022 | 13:10 IST | टाइम्स नाऊ मराठी

Arun Paudwal | ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनीही अजान विरूद्ध हनुमान चालिसा या वादात उडी घेत आपले मत व्यक्त केले आहे. भारतात अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर आता बंद व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले.

 Turn off Azaan on loudspeakers Demand of veteran singer Anuradha Paudwal
लाऊडस्पीकरवर अजान बंद करा - अनुराधा पौडवाल   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्येष्ठ गायिका यांनी लाऊडस्पीकरवर अजान बंद करण्याची मागणी केली आहे.
  • मशिदींवरील लाऊडस्पीकर बाबत वक्तव्य केल्यामुळे सोनू निगमला मुंडन करावे लागले होते.
  • राज ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी अशी मागणी केली होती.

Arun Paudwal | नवी दिल्ली : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनीही अजान विरूद्ध हनुमान चालिसा या वादात उडी घेत आपले मत व्यक्त केले आहे. भारतात अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर आता बंद व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले. खरं तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा वाजवण्याविरूद्ध इशारा दिल्यानंतर ज्येष्ठ गायिका पौडवाल यांचे हे विधान समोर आले आहे. (Turn off Azaan on loudspeakers Demand of veteran singer Anuradha Paudwal). 

अधिक वाचा : आता १२ तारखेलाच रस्त्यावर होणार 'राज'गर्जना!

लक्षणीय बाब म्हणजे मशिदींवरील लाऊडस्पीकर बाबत वक्तव्य केल्यामुळे सोनू निगमला मुंडन करावे लागले होते. आता अनुराधा यांच्या वक्तव्यावर काय गदारोळ होतो हे पाहण्याजोगे असेल. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ज्येष्ठ गायिका यांनी म्हटले की, "मी जगात अनेक ठिकाणी गेली आहे. मी भारतात असे कुठेही पाहिले नाही. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण भारतात जबरदस्तीने त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे त्यांना लाऊडस्पीकर वापरता येत असतील तर आपण का नाही, असा प्रश्न इतर समाजातील लोक उपस्थित करतात."

अधिक वाचा : शहराध्यक्षपदावरून हटवल्यानंतर वसंत मोरेंची 'फिलिंग इमोशनल'

मध्यपूर्वेत लाऊडस्पीकरवर बंदी 

पौडवाल यांनी आणखी म्हटले की, "मिडील ईस्टमध्ये लाऊडस्पीकरवर पूर्णपणे बंदी आहे. मुस्लिम देशांमध्ये लाऊडस्पीकरवर अजान वाजवू दिली जात नाही, तर भारतात का दिली जाते? देशात अशाच प्रकारे लाऊडस्पीकरवर अजान चालू राहिल्यास लोक हनुमान चालीसाही अशाच प्रकारे वाजवतील याचा काय फायदा होणार आहे. तसेच भारतातील तरुण पिढीला देशाची संस्कृती शिकवली पाहिजे. तरुण पिढीला भारताचा इतिहास आणि संस्कृतीची माहिती देणे ही ज्येष्ठ मंडळीची जबाबदारी आहे." असे त्यांनी अधिक म्हटले. 

कायदा असेल तर तो सर्वांसाठी समान असला पाहिजे. त्यांनी पुन्हा याच मुद्द्याचा पुनरुच्चार केला आणि म्हणाल्या की, कायदा असेल तर तो सर्वांसाठी सारखा असला पाहिजे. एकाने जोरात वाजवणे आणि दुसऱ्याने थांबणे चुकीचे आहे. शेवटी त्यांनी म्हटले, जर अजानपासून काही अडचणी येत नसतील तर आमचे देखील प्रबोधन सुरू झाले पाहिजे.

भोंगे न उतरवल्यास हनुमान चालिसा लावू - राज ठाकरे 

मशिदींमध्ये अजानच्या वेळी लाऊडस्पीकरचा वापर करण्याच्या मुद्द्यावरून सध्या देशभरात तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच अजानचा मुद्दा उपस्थित करत राज ठाकरे यांनी लाऊडस्पीकरवरून अजान बंद न केल्यास लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठणही करू अशी भरसभेत घोषणा केली होती. यानंतर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी मशिदींना नोटिसा बजावल्या जात आहेत ज्या आवाजाला परवानगी आहे त्याच आवाजात लाऊडस्पीकर लावण्यास सांगितले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी