Twin Tower : ट्विन टॉवरच्या ८० हजार टनचे डेब्रिस वाया नाही जाणार, विटा आणि इतर वस्तूंची होणार निर्मिती

नोएडामधील ट्विन टॉवर उध्वस्त करण्यात आले आहे. या दोन इमारती पाडल्यानंतर त्यांचे ८० टन इतके डेब्निस सध्या उरले आहे. असे असले तरी हे डेब्रिस वाया जाणार नाहिये. त्याचा पुर्नवापर होणार आहे. हे संपूर्ण डेब्रिस नोएडाच्या सेक्टर-८० मध्ये वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये जाणार आहे. रॅमकी कंपनी हा प्लांट चालवत आहे. नोएडामध्ये दररोज जवळपास २५० ते ३०० मेट्रिक टन डेब्रिसचा पुर्नवापर या प्लांटमध्ये होतो. आता याच प्लांटमध्ये ट्विट टॉवरच्या डेब्रिस्वर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर होणार आहे.

twin tower
ट्विन टॉवर  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • नोएडामधील ट्विन टॉवर उध्वस्त करण्यात आले आहे.
  • या दोन इमारती पाडल्यानंतर त्यांचे ८० टन इतके डेब्निस सध्या उरले आहे.
  • असे असले तरी हे डेब्रिस वाया जाणार नाहिये.

Twin Tower : दिल्ली : नोएडामधील ट्विन टॉवर उध्वस्त करण्यात आले आहे. या दोन इमारती पाडल्यानंतर त्यांचे ८० टन इतके डेब्निस सध्या उरले आहे. असे असले तरी हे डेब्रिस वाया जाणार नाहिये. त्याचा पुर्नवापर होणार आहे. हे संपूर्ण डेब्रिस नोएडाच्या सेक्टर-८० मध्ये वेस्ट मॅनेजमेंट प्लांटमध्ये जाणार आहे. रॅमकी कंपनी हा प्लांट चालवत आहे. नोएडामध्ये दररोज जवळपास २५० ते ३०० मेट्रिक टन डेब्रिसचा पुर्नवापर या प्लांटमध्ये होतो. आता याच प्लांटमध्ये ट्विट टॉवरच्या डेब्रिस्वर प्रक्रिया करून त्याचा पुर्नवापर होणार आहे. (twin tower 80 thousand metric ton debris will recycle)

Twin Towers नंतर आता 'या' ग्रुपच्या इमारतींवर पडणार हातोडा?

डेब्रिस पासून बनणार विटा आणि इतर उत्पादन

डेब्रिसचा पुर्नवापर करण्यासाठी या प्लांटमध्ये दोन शिफ्टमध्ये काम होणार आहे. या प्लांटची क्षमता ८५० टन इतकी आहे. नोएडामध्ये इतका डेब्रिस आहे की त्यामुळे या प्लांटमध्ये मनुष्यबळ वाढवणार आहेत. या प्लांटमध्ये टाईल्स, क्लिंकर, विटा आणि इतर उत्पादन बनवले जाणार आहे. 

Supertech Twin Tower Noida : भारतातील सर्वात उंच ट्विन टॉवर ७० कोटी खर्चून बांधले आणि २० कोटी खर्चून पाडणार


राष्ट्रीय हरित लवादाच्या नियमांचे पालन

दररोज डंपरवरून २५० मेट्रिक टन डेब्रिज या प्लांटमधून आणला जाणार आहे. यासाठी २० डंपरची गरज लागणार आहे. एका डंपरची क्षमता १० ते १३ मेट्रिक टन आहे. या कामात राष्ट्रिय हरित लवादाच्या नियमांचे पालन केले जाणार आहे. एका ग्रीम शीटवर पाणी टाकले जाईल आणि त्यावर हे डेब्रिज टाकले जाईल त्यामुळे धूळ उडणार नाही आणि हवेत प्रदूषण होणार नाही. 

Supertech Twin Tower Demolition: भ्रष्टाचाराची माती झाली.. भारतातील ट्विन टॉवर पाडले, पाहा ऐतिहासिक Video

ट्विन टॉवर पाडल्यानंतर ८० टन डेब्रिस 

ट्विट टॉवर पाडल्यानंतर मोठ्या प्रमाणात डेब्रिज निर्माण झाले आहे. एकूण ८० हजार मेट्रिक टन डेब्रिस निर्माण झाले आहे. त्यापैकी ५२ हजार मेट्रिक टन डेब्रिस बेसमेंट भरण्यासाठी उपयोगात येणाअर आहे. तर २८ हजार मेट्रिक टन डेब्रिसचा पुर्नवापर होणार आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी