रात्री हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल अखेर पूर्ववत

Twitter account of Uttar Pradesh Chief Minister's Office, CMO was hacked on Saturday midnight : शनिवारी (९ सप्टेंबर २०२२) मध्यरात्री हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल अखेर पूर्ववत करण्यात आले.

Twitter account of Uttar Pradesh Chief Minister's Office, CMO was hacked on Saturday midnight
रात्री हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल अखेर पूर्ववत 
थोडं पण कामाचं
  • रात्री हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल अखेर पूर्ववत
  • हँडलचे सध्या ४० लाख फॉलोअर्स
  • हॅकरने डीपी आणि 'बायो'तील माहिती यात बदल केला होता, एक ट्युटोरियल ट्वीट केले

Twitter account of Uttar Pradesh Chief Minister's Office, CMO was hacked on Saturday midnight : लखनऊ : शनिवारी (९ सप्टेंबर २०२२) मध्यरात्री हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल अखेर पूर्ववत करण्यात आले. या हँडलचे सध्या ४० लाख फॉलोअर्स आहेत. हॅकरने ट्विटर हँडल हॅक करून तिथे डीपी (Display Picture - DP) म्हणून असलेला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा फोटो काढला आणि त्या जागेवर माकडाचे कार्टून अपलोड केले. ही बाब लक्षात येताच सायबर टीमने हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल पूर्ववत केले.

हॅकरने डीपी आणि 'बायो'तील माहिती यात बदल केला. तसेच BAYC / MAYC अॅनिमेशन कसे सुरू करावे अशा नावाचे एक ट्युटोरियल ट्वीट केले. 'बायो'मध्ये उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाने नमूद केलेली माहिती काढून त्या जागेवर हॅकरने को फाउंडर @BoredApeYC @YugaLabs असे नमूद केले. हा प्रकार लक्षात येताच सायबर टीमने हॅक झालेले उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर हँडल पूर्ववत केले. सर्व माहिती जशी आधी होती तशीच पूर्ववत केली आणि पासवर्ड बदलून ट्विटर हँडल सुरक्षित केले. 

काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांचे ट्विटर हँडल हॅक झाले होते. याआधीही भारतात नेत्यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याच्या काही घटना घडल्या आहेत. पण संबंधित नेत्यांच्या सायबर टीमने गडबड लक्षात येताच तातडीने ट्विटर हँडल पूर्ववत केले आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी