लेह, जम्मू आणि काश्मीर चीनचा भाग म्हणून दाखवल्याबद्दल ट्विटरने मागितली भारताची माफी

लोकल ते ग्लोबल
Updated Oct 29, 2020 | 16:33 IST | टाइम्स नाऊ मराठी

ट्विटरच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की ते भारताच्या सरकारचा आदर राखण्यास कटिबद्ध आहेत आणि या प्रकरणातील संवेदनशीलतेचा ते आदर करतात.

Twitter controversial live
लेह, जम्मू आणि काश्मीर चीनचा भाग म्हणून दाखवल्याबद्दल ट्विटरने मागितली भारताची माफी  |  फोटो सौजन्य: AP

थोडं पण कामाचं

  • ट्विटरच्या प्रवक्त्याने केले हे वक्तव्य
  • भारत सरकारने दर्शवली होती तीव्र नाराजी
  • ट्विटरची चूक अस्वीकारार्ह आणि बेकायदेशीर

नवी दिल्ली: एका थेट प्रक्षेपणादरम्यान (Live broadcast) लोकेशन टॅगमध्ये (location tag) लेह (Leh), जम्मू (Jammu) आणि काश्मीर (Kashmir) चीनचा भाग म्हणून दाखवल्याची (showed as part of China) घटना घडल्याच्या अनेक दिवसांनंतर ट्विटरने (Twitter) वैयक्तिक डेटा सुरक्षेवरच्या (personal data security) भारताच्या संयुक्त संसदीय समितीसमोर (Joint Parliamentary Committee) एक तोंडी माफीनामा (oral apology) दिला आहे. या प्रकाराबाबत कडक शब्दांत नाराजी व्यक्त (grave discontent) करत या पॅनेलने (panel) ट्विटरला एक लेखी माफीनामा (written apology) आणि शपथपत्र (affidavit) देण्यास सांगितले आहे.

ट्विटरच्या प्रवक्त्याने केले हे वक्तव्य

ट्विटरच्या एका प्रवक्त्याने म्हटले आहे की, ते भारत सरकारच्या सहकार्याने कार्य करण्यास कटिबद्ध आहेत आणि या प्रकरणातील संवेदनशीलतेचा ते आदर करतात तसेच याचे त्यांना भानही आहे. याआधी भारताचे सार्वभौमत्व आणि एकता यांचा अनादर केल्याबद्दल ट्विटरला कडक इशारा देताना केंद्र सरकारने लेह हा चीनचा भाग म्हणून दाखवल्याबद्दल आपली तीव्र नाराजीही व्यक्त केली होती.

भारत सरकारने दर्शवली होती तीव्र नाराजी

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने २२ ऑक्टोबर रोजी ट्विटरचे प्रमुख जॅक डॉर्सी यांना एक पत्र लिहिले होते आणि त्यांना आठवण करून दिली होती की लेह हे लदाख विभागाचे मुख्यालय आहे आणि लदाख, जम्मू आणि काश्मीर हे तीनही भारताचे अविभाज्य भाग आहेत जे भारतीय संविधानानुसार चालवले जातात.

ट्विटरची चूक अस्वीकारार्ह आणि बेकायदेशीर

या पत्रात इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अजय सॉहनी यांनी ट्विटरला भारतीय नागरिकांच्या संवेदनशीलतेचा आदर करण्यास सांगितले होते. भारताच्या नकाशांमध्येही प्रतिबिंबित होणारे त्याचे सार्वभौमत्व आणि एकता यांचा अनादर करणारी ही चूक पूर्णपणे अस्वीकारार्ह आणि बेकायदेशीर असल्याचे त्यांनी ट्विटरला बजावले होते. तसेच त्यांनी एक मध्यस्थ म्हणून ट्विटरचा निष्पक्षपातीपणा आणि सारासार विचारांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी