Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...; एलॉन मस्क यांनी बदलला ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड Logo;युजर्स हैराण

Twitter Logo: ट्विटरचे (Twitter) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk)हे त्यांच्या निर्णयांमळे नेहमी चर्चेत असतात.  ट्विटरची मालकी घेतल्यापासून मस्क हे झटपट आणि भन्नाट निर्णयांमुळे चर्चेत राहत आहेत. आता असाच एक नवा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांची सोशल मीडियावर (social media) खूप चर्चा आहे.

 Elon Musk Changes Twitter's Iconic Blue-Bird Logo
Twitter Logo: ट्विटरची चिमणी उडाली फुरुर फूर...;  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • एलॉन मस्क यांनी ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवला.
  • ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली आहे.
  • हा बदल सध्या ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अ‍ॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

Twitter Logo: ट्विटरचे (Twitter) सीईओ एलॉन मस्क (Elon Musk)हे त्यांच्या निर्णयांमळे नेहमी चर्चेत असतात.  ट्विटरची मालकी घेतल्यापासून मस्क हे झटपट आणि भन्नाट निर्णयांमुळे चर्चेत राहत आहेत. आता असाच एक नवा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे त्यांची सोशल मीडियावर (social media) खूप चर्चा आहे. ट्विटरमध्ये इतिहासातील सर्वात मोठा बदल झाला आहे. एलॉन मस्क यांच्या ट्विटरवरीवरील चिमणी उडाली आहे. हो अगदी खरं, एलॉन मस्क यांनी ट्विटरचा आयकॉनिक ब्लू-बर्ड (Blue Bird Logo) हटवला आहे. (Twitter Chimney Blown Furur Furur..; Elon Musk Changes Twitter's Iconic Blue-Bird Logo; Users Shocked)

अधिक वाचा  : छत्रपती शिवरायांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांना करा वंदन

पहाटेपासून ट्विटर सुरू करणाऱ्या अनेक युजर्सना हे पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आहे. ट्विटरच्या पेजला भेट दिल्यानंतर युजर्सना ट्विटरच्या लोगोऐवजी Dogeचा फोटो दिसत होता. जरी हा बदल ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि सध्या वापरकर्त्यांना ट्विटर मोबाईल अ‍ॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे.

अधिक वाचा  : WhatsApp, Facebook Messagesने द्या हनुमान जयंतीच्या शुभेच्छा

दरम्यान, एलॉन मस्कनं त्यांच्या अकाऊंटवर एका जुन्या पोस्टचा स्क्रीनशॉटही शेअर केला आहे. ज्यामध्ये ते एका अज्ञात अकाउंटशी चर्चा केली होती. यामध्ये ती व्यक्ती मस्क यांना ट्विटरच्या बर्ड लोगोच्या जागी Doge Image लावण्यास सांगत आहे. काही वेळापूर्वी केलेल्या ट्वीटमध्ये ही पोस्ट शेअर करताना एलॉन मस्क यांनी लिहिलं आहे की, 'As promised' म्हणजेच, जे वचन दिलं ते मी पूर्ण केलं.

Twitter होम बटणात बदल
  

मात्र, हा बदल सध्या ट्विटरच्या वेब पेजवर आहे आणि युजर्सना सध्या ट्विटर मोबाईल अ‍ॅपवर फक्त ब्लू बर्ड दिसत आहे. ट्विटरचं होम बटण म्हणून दिसणार्‍या ब्लू बर्डऐवजी आता युजर्सना डॉगीचं चित्र दिसत आहे आणि हा बदल काही तासांपूर्वीच झाला आहे.

अधिक वाचा  :  हनुमान जयंतीच्या मराठी शुभेच्छा Images

एलॉन मस्क यांचे मजेशीर ट्वीट 

ट्विटरचा आयकॉनिक लोगो बदलल्यानंतर एलॉन मस्क यांनी एक मजेशीर पोस्टही शेअर केली. त्यांनी आपल्या अकाउंटवर डॉगे मीम शेअर करत एक मजेशीर ट्वीटही शेअर केलं. या ट्वीटमध्ये त्यांनी ड्रायव्हिंग लायसन्स तपासणाऱ्या एका ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यानं ट्विटरच्या ब्लू-बर्डचं आयडी कार्ड हातात घेतलं आहे. तर कारमध्ये एक कुत्रा बसला आहे. तो त्या ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्याला सांगतोय की, "ड्रायव्हिंग लायसन्सवरील तो फोटो जुना आहे."

अधिक वाचा  : Hanuman Aarti: म्हणा हनुमानाची आरती मारुतीरायाला प्रसन्न करा

Doge Image नक्की आहे तरी काय? 

आयकॉनिक ब्लू-बर्डला हटवून एलॉन मस्क यांनी ठेवलेली Doge Image नेमकी काय आहे? असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल. डॉज  इमेज शिबू इनू, डॉजकॉइन ब्लॉकचेन, क्रिप्टोकरन्सीचं प्रतीक आणि लोगो आहे.  2013 मध्ये इतर क्रिप्टोकरन्सीसमोर एक विनोद म्हणून Doge Image लॉन्च करण्यात आलं होतं. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी