दोन मुलांची आई पडली 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात, घरी भेटायला बोलावले आणि घडला मोठा कांड

Love affair: दोन मुलांची आई एका अल्पवयीन मुलाच्या प्रेमात पडली आणि त्यानंतर असं काही झालं की....

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • सोशल मीडियात झाली दोघांची ओळख
  • एकमेकांसोबत चॅटिंग करता-करता 35 वर्षीय महिला पडली 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात
  • महिलेने 15 वर्षीय मुलाला घरी बोलावले आणि रात्री दोघांना पतीने रंगेहात पकडलं

Two childrens mother fall in love with minor child: सध्याच्या काळात जवळपास सर्वचजण हे सोशल मीडियाचा वापर करताना दिसून येतात. सोशल मीडियाचा वापर नागरिक वेगवेगळ्या पद्धतीने करत असतात मात्र, याच सोशल मीडियामुळे अनेकदा वाईट घटनाही घडताना दिसून येतात. त्यातच आता एक वेगळीच बातमी समोर आली आहे. दोन मुलांची आई असलेली 35 वर्षीय महिला एका 15 वर्षीय मुलाच्या प्रेमात पडल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? 

ही घटना आहे बिहारमधील जमुई जिल्ह्यातील एका गावातील. येथील 35 वर्षीय महिला 15 वर्षांच्या मुलाच्या प्रेमात पडली. फेसबूकवर एकमेकांची ओळख झाली होती आणि त्यानंतर दोघांत प्रेमसंबंध तयार झाले. अल्पवयीन मुलगा हा जहानाबाद येथील निवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्रेयसीने भेटायला बोलवल्याने तो जहानाबाद येथून तिला भेटण्यासाठी जमुईला पोहोचला.

हे पण वाचा : मुंबईत ऑरेंज अलर्ट, लोकलही स्लो; 'हे' आहेत लेटेस्ट अपडेट्स

महिलेच्या घरी पोहोचताच...

35 वर्षीय प्रेयसीने भेटायला बोलवल्याने अल्पवयीन मुलगा आपलं घर सोडून तिच्या घरी पोहोचला. त्यावेळी या महिलेने शेजारच्यांना या मुलाची ओळख आपल्या माहेरील नातेवाईक असल्याचं सांगत घरात थांबवलं. त्याच दरम्यान महिलेचा पती घरी आला आणि त्याने दोघांनाही रंगेहात पकडलं. यानंतर या महिलेच्या पतीने अल्पवयीन मुलाला मारहाण केली.

हे पण वाचा : मुंबईत ऑरेंज अलर्ट, लोकलही स्लो; 'हे' आहेत लेटेस्ट अपडेट्स

या घटनेनंतर संपूर्ण गावात गदारोळ झाला आणि मग दोघांनाही गावातील मंदिरासोर आणण्यात आले. तेथे मारहाण करण्यात आली. स्थानिक नागरिकांना मध्यस्थी केल्याने हे प्रकरण थोडं शांत झालं. या मारहाणीचा व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

फेसबूकवर झालं होतं प्रेम 

जमुई येथील 35 वर्षीय महिलाची ओळख 15 वर्षीय मुलासोबत फेसबूकवर झाली होती. फेसबूक मॅसेंजरवर चॅटिंग करता करता दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला या मुलासोबत तासंतास मॅसेंजरवरुन व्हिडिओ चॅटिंग करत असे. दोघांमधील संभाषण इतकं वाढलं की एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर दोघांनी एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेतली.

रात्री एकमेकांसोबत संबंध आणि...

एकमेकांना भेटण्याची इच्छा इतकी वाढली की, या महिलेने एकेदिवशी मुलाला आपल्या घरीच बोलावून घेतले आणि घरातच राहण्यासाठी थांबवले. रात्रीच्या सुमारास दोघे एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवत असताना महिलेच्या पतीने त्यांना रंगेहात पकडले आणि हे प्रकरण उघडकीस आलं.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी