दिल्लीत जैशच्या २ दहशतवाद्यांना अटक

Two Jaish-e-Mohammed terrorists arrested दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दिवाळीच्या दिवसांत घातपात करण्यासाठी दहशतवादी आले होते. पोलिसांनी हा डाव हाणून पाडला.

Two Jaish-e-Mohammed terrorists arrested by Delhi Police's special cell
दिल्लीत जैशच्या २ दहशतवाद्यांना अटक 

थोडं पण कामाचं

  • दिल्लीत जैशच्या २ दहशतवाद्यांना अटक
  • अटक केलेले दोघे २० ते २२ या वयोगटातले तरुण
  • दहशतवाद्यांकडून दोन सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल आणि दहा जीवंत काडतुसे जप्त

नवी दिल्ली: दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दिवाळीच्या दिवसांत घातपात करण्यासाठी दहशतवादी आले होते. पोलिसांनी हा डाव हाणून पाडला. स्पेशल सेलचे डीसीपी (Deputy Commissioner of Police  - DCP) संजीव कुमार (DCP Sanjeev Kumar Yadav, Special Cell Delhi Police) यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली. गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीआधारे पोलिसांनी कारवाई केली. (Two Jaish-e-Mohammed terrorists arrested by Delhi Police's special cell)

दिल्लीच्या (Delhi) 'सराय काले खां' (Sarai Kale Khan) परिसरातून सोमवारी (१६ नोव्हेंबर २०२०) रात्री सव्वादहाच्या सुमारास पोलिसांनी 'जैश-ए-मोहम्मद'च्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. दोन्ही दहशतवादी मूळचे जम्मू काश्मीरचे रहिवासी आहेत. अब्दुल लतिफ मिर (abdul latif mir) आणि मोहम्मद अशरफ (mohammad ashraf) अशी त्यांची नावं आहेत. अब्दुल बारामुल्लातील डोरुचा (Doru Village, Baramulla) तर मोहम्मद कुपवाडातील हट मुल्लाचा (Hat Mulla Village, Kupwara) रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. दोघे २० ते २२ या वयोगटातले तरुण आहेत. दहशतवाद्यांकडून दोन सेमी ऑटोमॅटिक पिस्तुल (Pistols) आणि दहा जीवंत काडतुसे (cartridges) जप्त करण्यात आली.

गुप्तचरांनी दिलेल्या माहितीआधारे पोलिसांनी दिवाळीतील पाडव्याच्या रात्री कारवाई केली. पकडलेल्या दहशतवाद्यांना नेमके कोण मदत करत होते याचा तपास सुरू आहे. दहशतवादी दिल्लीत घातपात करण्याच्या उद्देशाने आले होते. आधी मोठा स्फोट करायचा, नंतर गोळीबार करायचा अशा स्वरुपाचा कट अंमलात आणण्याची तयारी दहशतवादी करत होते पण पोलिसांनी त्यांचा डाव हाणून पाडल्याचे प्राथमिक वृत्त आहे. या प्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. 

दहशतवादी भाड्याच्या घरात मुक्काम करत होते. त्यांना मिलेनियम पार्क जवळून अटक करण्यात आली. दहशतवाद्यांनी ज्यांच्याकडून घर भाड्याने घेतले होते, त्या व्यक्तीची तसेच भाडे कराराशी संबंधित अन्य कोणी असल्यास त्यांची चौकशी होणार असल्याचे संकेत दिल्ली पोलिसांनी दिले. दहशतवाद्यांचे मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मोबाइलची तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी सुरू आहे. तसेच दोन्ही दहशतवाद्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

याआधी ऐन धनत्रयोदशीच्या दिवशी (शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२०) पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारताच्या दिशेने मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. मॉर्टर आणि तोफगोळ्यांचा मारा करण्यात आला. पाकिस्तानच्या या कृतीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या कारवाईत पाकिस्तानचे काही बंकर तसेच दहशतवाद्यांचे नियंत्रण रेषेजवळचे लाँचपॅड उद्ध्व्स्त झाले. भारताने जबर दणका दिला. प्राथमिक वृत्तानुसार पाकिस्तानच्या किमान ११ जवानांचा मृत्यू झाला आणि १६ जवान जखमी झाले. काही दहशतवादीही ठार झाले. भारत-पाकिस्तान यांच्यातील धुमश्चक्रीत भारताचे ४ जवान हुतात्मा झाले. तीन जवान चकमकीत हुतात्मा झाले तर जखमी झालेल्या एका जवानाला संध्याकाळी उपचार सुरू असताना वीरमरण आले. पाकिस्तानच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवान आणि नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत देण्यात आली. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी