चिंताजनक !  २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या पार, १,६१९ जणांचा मृत्यू  

देशात कोरोना व्हायरस जलदगतीने पसरत आहे. मागील चार दिवसापासून २ लाखपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. यासह मृत पावणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.

two lakh corona patients in last 24 hours 1619 die  due to corona virus
चिंताजनक !  २४ तासात कोरोना रुग्णांची संख्या २ लाखांच्या पार, १,६१९ जणांचा मृत्यू    |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • गेल्या २४ तासात मृत्यू १,६१९ जणांचा मृत्यू
  • कोरोनामधून बरे होण्याचे प्रमाण ८६ टक्के
  • देशातील १२ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आले आहे.

नवी दिल्ली: देशात कोरोना व्हायरस जलदगतीने पसरत आहे. मागील चार दिवसापासून  २ लाखपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडत आहेत. यासह मृत पावणाऱ्यांची संख्याही वाढू लागली आहे.सगळीकडे रुग्ण आणि नातेवाईकांची बेड आणि ऑक्सिजनसाठी धडपड सुरू असून, आरोग्य व्यवस्थेची झोप उडवणारी रुग्णवाढ सोमवारी समोर आली आहे. आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७३ हजार ८१० झाली आहे. या संख्येमुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एकूण १ कोटी ५० लाख ६१ हजार ९१९ झाली आहे. रविवारी दिवसभरात १ लाख ४४ हजार १७८ रुग्ण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. 

कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या वाढली असून १ हजार ६१९ जणांचा गेल्या २४ तासात मृत्यू झाला आहे. यानंतर कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची संख्या एकूण १ लाख ७८ हजार ७६९ झाली आहे.दरम्यान देशात कोरोनाच्या लसीकरणाचे प्रमाण ही वाढत आहे. देशात एकूण १२ कोटी ३८ लाख ५२ हजार, ५६६ लोकांना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली आहे.  महाराष्ट्र, कर्नाटक, छत्तीसगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, या पाच राज्यात कोरोना संसर्ग असून कोरोना ग्रस्तांची टक्केवारी ५८ टक्के आहे. 

या पाच राज्यात कसे आहे लसीकरण 


कोविड-१९ चे वाढत्या रुग्णांची संख्या रोखण्यासाठी महाराष्ट्रात युद्ध पातळीवर प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत - १ कोटी,२२लाख,७३ हजार, ९७३ 
कर्नाटक -  ७२ लाख ९६ हजार ७७१
दिल्ली  - २६ लाख २१ हजार २९१
छत्तीसगड  - ४९ लाख ५७ हजार १५७ 
उत्तर प्रदेश -  १ कोटी ७ लाख १८ हजार, ३७५.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी